लक्ष्मी देवी होणार मेहेरबान! ‘या’ ५ राशींना पुढील काळ ठरेल वरदान; मिळतील नानाविध लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 10:28 AM2022-07-11T10:28:29+5:302022-07-11T10:32:48+5:30

या महिन्यातील काही शुभ योगांमुळे लक्ष्मी देवीची विशेष कृपा काही राशीच्या व्यक्तींवर होऊ शकेल, जाणून घ्या...

जुलै महिना ज्योतिषीय दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. जुलै महिन्यात अनेक शुभ योग जुळून येत असून, धार्मिक दृष्टिनेही हा महिना विशेष ठरणारा आहे.

उत्तर भारतीय पंचांगानुसार, १४ जुलैपासून त्यांच्याकडे चातुर्मासातील पावन काळ मानला जाणारा श्रावण महिना सुरू होत आहे. महाराष्ट्रासह अन्य भागात सण-उत्सव, व्रत-वैकल्यांची रेलचेल असणारा श्रावण महिना २९ जुलैपासून सुरू होणार आहे.

तत्पूर्वी या महिन्यातील काही शुभ योगांमुळे लक्ष्मी देवीची कृपा काही राशीच्या व्यक्तींवर असेल, असे सांगितले जात आहे. करिअर, धनधान्य, सुख-समृद्धी, नोकरी, कुटुंब यांबाबतीत उत्तम काळ ठरू शकेल. तुमची रास कोणती? जाणून घेऊया...

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आगामी कालावधी धनलाभदायक ठरू शकेल. या काळात गरजू व्यक्तीला मदत केल्याने दूरगामी फायदा होऊ शकतो. न्यायालयीन प्रकरणात सकारात्मक वार्ता मिळू शकेल, असे सांगितले जात आहे.

सिंह राशीच्या व्यक्तींना आगामी कालावधी सकारात्मक ठरू शकेल. मान-सन्मानात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच अचानक आर्थिक लाभ झाल्याने मन प्रसन्न राहील. आरोग्य उत्तम राहील. या काळात केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल.

तूळ राशीच्या व्यक्तींना आगामी कालावधी अनुकूल ठरू शकेल. बोलण्यात गोडवा ठेवल्याने समाजात मान-सन्मान वाढू शकेल. लक्ष्मी देवी आणि सरस्वती देवींचे शुभाशिर्वादांचा वर्षाव होणार आहे. राजकारणात नशीब आजमावायचा असेल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे.

धनु राशीच्या व्यक्तींना आगामी कालावधी खूप चांगला जाणार आहे. काही नवीन कामाची जबाबदारी मिळू शकते. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. मालमत्ता खरेदी करण्यासाठी आणि नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी सदर काळ अनुकूल ठरू शकेल.

मीन राशीच्या व्यक्तींवर देवी लक्ष्मीची कृपा बरसणार आहे. दानधर्म करण्यासाठी हा महिना चांगला आहे. त्याच वेळी, जर तुम्ही वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेत असाल तर ही वेळ तुमच्यासाठी उत्तम आहे, असे सांगितले जात आहे.

सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.