३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 06:56 IST2025-11-07T06:43:05+5:302025-11-07T06:56:16+5:30

Kartik Sankashti Chaturthi November 2025: तुमची रास कोणती? संकष्ट चतुर्थीचा कालावधी तुमच्यासाठी कसा असू शकेल? कोणत्या राशींना कसे लाभ मिळू शकतील, ते जाणून घ्या...

Kartik Sankashti Chaturthi November 2025: कार्तिकी एकादशीला चातुर्मास समाप्ती झाली आहे. यानंतर श्रीविष्णू पुन्हा एकदा ब्रह्मांडाचा कारभार आपल्या हाती घेतात, असे म्हटले जाते. कार्तिकी पौर्णिमेनंतर संकष्ट चतुर्थी व्रत येते. कार्तिक महिन्यातील संकष्ट चतुर्थी व्रताला अनन्य साधारण असे महत्त्व असल्याचे पाहायला मिळते. संकष्ट चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे.

संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकते. संकष्ट चतुर्थीचे व्रत इच्छापूर्तीच्या उद्देशाने केले जाते. मनोभावे हे व्रत केले असता, गणरायाची कृपादृष्टी लाभून इच्छापूर्ती होते, असा भाविकांचा अनुभव आहे. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते.

शनिवार, ०८ नोव्हेंबर २०२५ रोजी कार्तिक महिन्यातील संकष्ट चतुर्थी आहे. या दिवशी अत्यंत शुभ मानले गेलेले काही राजयोग जुळून येत आहेत. या राजयोगांचा काही राशींना सर्वोत्तम लाभ प्राप्त होऊ शकेल. गणपती बाप्पासह देवी लक्ष्मीचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतील. जीवनातील अनेक आघाड्यांवर यश, प्रगती साध्य करता येऊ शकेल. जाणून घेऊया...

मेष: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. पैसे मिळतील आणि ते खर्चही होतील. कायद्याची बंधने पाळण्यात हयगय करू नका. परिस्थिती आटोक्यात येईल. अनेक अडचणी दूर होतील. विवाहेच्छूसाठी अनुकूल काळ आहे. चांगल्या स्थळांचे प्रस्ताव समोर येतील. प्रेमात असणाऱ्यांना भेटवस्तू मिळतील. महत्त्वाची कामे हातावेगळी कराल. उलाढालीत अचानक मोठा फायदा होईल.

वृषभ: कशात ना कशात व्यस्त राहाल. नोकरीत कामाचा ताण राहील, वरिष्ठांशी आणि सहकारी वर्गाशी वाद होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. प्रत्येक छोटी-छोटी गोष्ट मनाला लावून घेऊ नका. मनात सकारात्मक विचार राहतील, असे प्रयत्न करा. एखाद्या व्यवहारातून हाती पैसा येईल. मात्र, कुणाला उसने पैसे देताना विचार करून द्यावे. काहींना अचानक प्रवास करावा लागेल. दिलासा देणाऱ्या घटना घडतील. अडचणी दूर होतील.

मिथुन: एखाद्या चांगल्या घटनेने दिलासा मिळेल. अडचणी हळूहळू दूर होतील. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. नोकरीत कामाचा ताण वाढेल. वेळ वाया जाणार नाही, अशा पद्धतीने कामे करा. नाही तर प्रलंबित कामे पिच्छा सोडणार नाहीत. अनपेक्षितपणे कामे होतील. लोकांचे सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होतील. काही अडचणी येतील. कुणाला जामीन राहणे शक्यतो टाळा.

कर्क: अनुकूलता जास्त प्रमाणात अनुभवायला मिळेल. फार धावपळ करू नका. वाहन जपून चालवा. परिस्थिती तुमच्या आटोक्यात येईल. मात्र, काही लोक तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न करतील. कामाचे स्वरूप बदलेल. पगारवाढ व तत्सम लाभ होतील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना योग्य संधी मिळेल. समाजात महत्त्व वाढेल. धनलक्ष्मीची कृपा राहील. मित्र-मैत्रिणींच्या भेटी होतील.

सिंह: थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. मनातील नकारात्मक विचारांवर प्रयत्नपूर्वक मात केली पाहिजे. वाहन हळू चालवा. आरोग्याकडे लक्ष द्यावे. खाण्या-पिण्याचे पथ्ये पाळा. परिस्थिती नियंत्रणात येईल. सामाजिक मान-सन्मान प्राप्त होईल. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. मनावरील दडपण निघून जाईल. नोकरीत अचानक मोठी संधी मिळेल. पगारवाढ व इतर अनेक लाभ होतील. व्यवसायात भरभराट होईल.

कन्या: काही कटू तर काही गोड अनुभव येतील. महत्त्वाची कामे करणे टाळा. त्यामुळे दगदग होणार नाही. अनावश्यक खर्चही टळेल. काही लोक विरोधात गुप्तपणे कारवाया करतील. व्यवसायात सतत व्यस्त राहाल. इतरांच्या भानगडीत पडू नका. कुणाकडून वाहवा मिळवण्याच्या नादात आपली दमछाक होऊ शकते. अनुकूलता अनुभवायला मिळेल. अनेक अडचणी दूर होतील.

तूळ: जनसंपर्क चांगला राहील. मात्र, लोकांकडून फार मोठ्या अपेक्षा ठेवू नका. काही लोक हरभऱ्याच्या झाडावर चढवून त्यांची कामे करून घेण्याचा प्रयत्न करतील. जवळचे कोण आणि दूरचे कोण हे ओळखून त्यानुसार निर्णय घ्यावेत. आपल्या योजनांच्या बाबतीत गुप्तता बाळगली पाहिजे. त्या दृष्टीने सावध राहा. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. भेटवस्तू देण्यास हरकत नाही. अचानक धनलाभ होईल. वाहन सावकाश चालवा.

वृश्चिक: थोडी व्यस्तता, थोडी फुरसत असे ग्रहमान राहील. सुरुवातीला एखाद्या नवीन जबाबदारीत गुंतलेले राहाल. सहकारी वर्गाशी जुळवून घेणे योग्य ठरेल. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आरोग्याची काळजी घ्यावी. चांगले अनुभव येतील. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. मात्र, प्रेमात गैरसमज होऊ शकतात. चैनीवर अतिरिक्त खर्च केला जाईल.

धनु: ग्रहमानाची अनुकूलता बाजूने राहील. आपली महत्त्वाची कामे झटपट आटोपून घ्यावी. मात्र, लोकांशी गोडीत बोलून कामे करून घेतली पाहिजे. त्यामुळे वेळ वाया जाणार नाही आणि स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळेल. अधिकारी वर्गाचे चांगले सहकार्य मिळेल. क्षुल्लक कारणावरून अडलेली सरकारी कामे मार्गी लागतील. भेटवस्तू व आर्थिक लाभ होतील. वैवाहिक जीवनात अडचणी येतील. मुलांशी प्रेमाने वागा.

मकर: चंद्राचे भ्रमण लाभदायक ठरेल. मात्र, आपलेच खरे हा हेका सोडायला हवा, अन्यथा वडीलधाऱ्या मंडळींचा रोष ओढवून घ्याल. घरातील लोकांना गृहीत धरून चालू नका. प्रत्येकाच्या भावनांचा आदर राखा. घरात मंगलमय वातावरण राहील. काहींना जवळच्या प्रवासाचा योग येईल. नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. पगारवाढ व तत्सम लाभ होतील. काहींना उच्च पद मिळू शकते. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील.

कुंभ: विविध आघाड्यांवर सफलता मिळेल. अनेक अडचणी आपोआप दूर होतील. मनात सकारात्मक विचार राहतील. वडीलधाऱ्या मंडळींकडून आशीर्वाद मिळतील. धनलक्ष्मीची कृपा राहील. मालमत्तेच्या व्यवहारात स्पष्टता ठेवा. व्यवसायात भरभराट होईल. जवळच्या प्रवासाचा योग येईल. नोकरीत अचानक मोठी संधी मिळेल. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. फक्त लोकांना फटकळपणे बोलून नाराज करू नका. ओळखीचे फायदे होतील.

मीन: परिस्थिती नियंत्रणात राहील. ग्रहमानाची अनुकूलता अनुभवायला मिळेल. जीवनसाथीशी वागण्या-बोलण्यात स्पष्टपणा पाहिजे. त्यामुळे विनाकारण गैरसमज होणार नाहीत. प्रेमात असणाऱ्यांनी सावधपणे वागण्याची गरज आहे. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. भावंडांशी गैरसमज होतील. जवळच्या प्रवासात सतर्क राहा. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.