शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

या चार राशींपैकी एक तुमचा नवरा असेल तर तुम्हीच मान्य कराल- नवरा असावा तर असा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 5:55 PM

1 / 5
मुलींना, स्त्रियांना समजून घेणं फार अवघड असतं असा गैरसमज पसरवला गेला आहे. तो काही अंशी खरा असला तरी पूर्णपणे बरोबर नक्कीच नाही! कारण सोपं आहे, मुलींना समजून घ्यायचे असेल तर किंवा तिचे मन जिंकायचे असेल तर दोन मंत्र लक्षात ठेवा - तू म्हणशील तसं आणि हिला विचारून सांगतो! मग काय, बायकोला कायम मुठीत ठेवण्याऐवजी ती मिठीत आनंदाने राहते की नाही बघा! हे सूत्र या चार राशींच्या पुरुषांना बरोबर उमगलेले असते.
2 / 5
या राशीचा पती घराची प्रत्येक जबाबदारी सांभाळण्यात पत्नीला पूर्ण सहकार्य करतो आणि आर्थिकदृष्ट्याही खूप सक्षम असतो. ते काही वेळा कठोर वाटत असेल तरी प्रत्यक्षात तो घराची काळजी वाहणारा आणि घरच्यांवर खूप प्रेम करणारा असतो. फणसारखे हे व्यक्तिमत्त्व आतून सुकोमल असते याची प्रचिती त्यांच्या बायकोला नेहमी येते. त्यामुळे त्यांचा संसार सुखाने होतो.
3 / 5
सिंह राशीचे पुरुष डरकाळी फोडायला पुढे असतात. कठोर आणि कणखर मानले जातात मात्र बायकोच्या बाबतीत आयाळ बाजूला ठेवून अर्थात रागाचा मुखवटा बाजूला काढून सहृदय होतात. तिच्याशी खूप प्रेमळपणे आणि प्रामाणिकपणे वागतात. ते आपल्या जोडीदाराच्या आनंदाची पूर्ण काळजी घेतात. बाकी जगासमोर त्यांचा रुबाब असला तरी घरात वाद विवादाच्या प्रसंगी ते माघार घेऊन वाद मिटवून टाकतात.
4 / 5
या राशीचे पुरुष प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीत पत्नीच्या पाठीशी उभे राहतात. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या करिअरमध्ये त्यांना पुढे नेण्यासाठी ते खूप सहकार्य करतात. ते अतिशय भावुक असल्यामुळे पटकन नमते घेतात. वाद विकोपाला जाण्याआधी सामंजस्य दाखवून घरात खेळीमेळीचे वातावरण ठेवतात.
5 / 5
मीन राशीचे पुरुष खूप चांगले पती सिद्ध होतात. ते नेहमी आपल्या जोडीदाराची काळजी घेतात. आपल्या पत्नीला सर्व प्रकारची भौतिक सुखं देण्यासाठी ते दिवस रात्र झटतात. घर आणि मुलांची काळजी घेण्यात हातभार लावतात. पत्नीला घरकामात मदत करतात. मुख्य म्हणजे कोणत्याही निर्णयात ते पत्नीचा विचार घेऊन तिच्या सहमतीने काम करतात. एकमेकांना मान दिल्या घेतल्याने त्यांचा संसार गुण्यागोविंदाने होतो. आता या चार राशींपैकी तुम्ही एक नसाल, तर वाईट वाटून घेऊ नका. या चार राशींचे गुण आत्मसात करा आणि लाखात एक नवरा बनून स्वतःला सिद्ध करा!
टॅग्स :Astrologyफलज्योतिष