कुंभमेळ्यासाठी जाणार असाल, प्रयागराजमधील 'या' मंदिरांना नक्की भेट द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 19:38 IST2024-12-25T19:32:54+5:302024-12-25T19:38:40+5:30

Famous Temples in Prayagraj: प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू होत असून, देशविदेशातून लाखो भाविक दाखल होणार आहेत. प्रयागराज शहराला ऐतिहासिक वारसा असून, अनेक प्रसिद्ध मंदिरं आहेत.

13 जानेवारी २०२५ पासून महाकुंभमेळा सुरू होत आहे. प्रयागराजमध्ये होत असलेल्या या कुंभमेळ्यात देशविदेशातून भाविक येणार असून, मोठी तयारी सुरू आहे. घाटांवर व्यवस्था केली जात आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या शहरात काही प्रसिद्ध मंदिरे आहेत. त्यापैकी काही मंदिरांबद्दल जाणून घेऊयात...

संकटमोचन हनुमान मंदिर, हे एक मंदिर प्रयागराजमधून जाणाऱ्या गंगेच्या काठावर आहे. हनुमानाची मूर्ती झोपलेल्या अवस्थेत आहे. दर्शन घेण्यासाठी देशभरातून लोक येथे येतात.

वेणी माधव मंदिर - प्रयागराजचे पहिले देव म्हणून वेणी माधवांना मानले जाते. हे मंदिर दारगंज स्थित आहे. अशी कथा आहे की, ब्रह्मदेवाने भगवान विष्णूला प्रार्थना करून इथल्या सुरक्षिततेसाठी याची स्थापना केली होती.

पातालपुरी मंदिर - या मंदिरात भगवान अर्धनारी नटेश्वर अवतारात विराजमान झालेले आहेत.

नागवासुकी मंदिर - प्रयागराज हे मंदिर प्रसिद्ध आहे. नागांचे राजा वासुकी इथे विराजमान आहेत. प्रयागराजमध्ये येणाऱ्या भाविकांची तीर्थयात्रा तोपर्यंत पूर्ण होत नाही, जोपर्यंत ते नागवासुकी मंदिरात जाऊन दर्शन घेत नाही, अशी मान्यता आहे.

सरस्वती कूप आणि अक्षय वट - प्रयागराजमधील अक्षय वट आणि सरस्वती कूपलाही भेट देऊ शकता. अशी लोककथा आहे की, येथील वडाचे झाड चार युगांपासून अस्तित्वात आहे. वनवासादरम्यान प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीता येथे आले होते. त्यांनी या झाडाखाली विश्रांती घेतली होती.

प्रयागराजला गेल्यानंतर या मंदिरांना भेट दिल्यानंतर वेगळी अनुभूती येते. प्रयागराजमध्ये इतरही अनेक ऐतिहासिक मंदिरे आहेत.