शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

तुमच्यावर कोणी करणी केलीय का? घरावर बाहेरची शक्ती कार्य करतेय का? कसे ओळखाल? ४ संकेत मिळतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 11:08 IST

1 / 10
भारतीय संस्कृतीत अनेक समजुती प्रचलित असतात. श्रद्धा आणि अंधश्रद्धा याबाबत अनेक लोक मान्यता समाजात आजही असलेल्या दिसतात. काहींच्या मते श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात पुसट रेषा असते, ती ओळखण्यासाठी विवेक महत्त्वाचा असतो. एखादी श्रद्धा कधी अंधश्रद्धा होईल, हे त्या व्यक्तीलाही अनेकदा समजून येत नाही.
2 / 10
काही वेळेस घरात सातत्याने काही घडत असतात. काही केल्या कामे होत नाहीत. अडचणी येत राहतात. संकटे दूर होत नाहीत. समस्या संपत नाहीत. कितीही प्रयत्न केले, तरी व्यथा दूर होत नाहीत. सकारात्मक विचार केला, तरी अगदी साध्या-साध्या गोष्टी होत नाहीत. यश येत नाही. प्रगती होत नाही. पैसा टिकत नाही. अधोगतीकडे जीवन जाते, असे वाटू लागते.
3 / 10
अशा परिस्थिती कुणी करणी केली आहे का, घरावर वाईट शक्तींचा प्रभाव आहे का, बाहेरची शक्ती कार्य करत आहे का, अशी पुसट शंका अनेकांच्या मनात येऊ लागते. वास्तविक अनेकांच्या मते करणी वगैरे या गोष्टी मानसिक आहेत. त्याला आधार नाही. परंतु, अनेक जण या गोष्टी मानणारे असतात.
4 / 10
या गोष्टी सहज लक्षात येत नाहीत. पण याचे प्रभाव आणि परिणाम अधिक असू शकतात, अशीही मान्यता आहे. घरात नकारात्मक शक्ती असतील, तर काही सामान्य संकेत मिळण्यास सुरुवात होते, असे काही दावे केले जातात. हे संकेत तुम्हाला जाणवू शकतात, असेही म्हटले जाते. यासंदर्भात या क्षेत्रातील काही जाणकार कोणते दावे करतात? तुम्हालाही घरात असा अनुभव येतो का? या काही गोष्टी जाणवतात का? जाणून घेऊया...
5 / 10
सातत्याने आजारपण येत राहते. घरातील एखादी व्यक्ती आजारी असते, ती बरी झाली की दुसरी व्यक्ती आजारी पडते. ती व्यक्ती आजारपणातून बाहेर आली की, तिसऱ्या व्यक्तीला आजारपण येते, आजारपणाचे हे चक्र सुरूच राहते.
6 / 10
आजारपणात वैद्यकीय कारण सापडत नाही. आजारपण आले म्हणून वैद्यकीय चाचण्या केल्या, तर त्या सगळ्या सामान्य असतात. वैद्यकीय चाचण्यातून काही निदान होत नाही. पण सारखे आजारपण येत राहते. हा एक संकेत मानला जातो.
7 / 10
दुसरे म्हणजे घरात बागकाम केले असेल. काही रोपे, लहान झाडे लावली असतील, तर ही रोपटी किंवा लहान झाडे टिकत नाहीत. तुळस असेल आणि काही केल्या ती जगत नाही. अगदी लगेचच लगतच्या दिवसांत कोमेजून जाते. असे सलग होऊ शकते. हाही एक संकेत मानला जातो.
8 / 10
तिसरे म्हणजे अचानक नाकाला दुर्गंध येऊ लागतो. हा दुर्गंध इतका तीव्र आणि उग्र असतो की आपण कचऱ्यात बसलोय, असे वाटू लागते. हा दुर्गंध १० ते २० सेकंद येतो आणि जातो. याची संख्या सतत वाढू लागली की, घरात नकारात्मक ऊर्जा आहे, असे समजण्यास वाव आहे. हा एक संकेत मानला जातो.
9 / 10
चौथे म्हणजे काही कारण नसताना मायग्रेनचा त्रास सुरू होतो. डोकं खूप दुखू लागते. रात्री अजिबात झोप लागत नाही. पहाटे तीन, चार, पाच वाजेपर्यंत झोप लागत नाही. उलट दिवसा खूप झोपावेसे वाटते. दिवसा खूप आळस येतो. काहीच काम करू नये, असे वाटत राहते. नुसते पडून राहावेसे वाटते. या काही अगदी सुरुवातीच्या खुणा आहेत. संकेत आहेत, असे मानले जाते.
10 / 10
- सदर कोणत्याही दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि लोक मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्रAstrologyफलज्योतिषspiritualअध्यात्मिक