Happy Holi 2026 Wishes: होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status द्वारे देऊन या सणाच्या निमित्ताने वाईट विचारांचे करा दहन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 16:38 IST2026-03-01T13:15:01+5:302026-03-02T16:38:06+5:30

Happy Holi Wishes in Marathi: रंगांच्या उत्सवाचा आणि आनंदाचा सण म्हणजे होळी, जी आपल्या आयुष्यात नवी उभारी आणि उत्साहाचे रंग भरते. या मंगल दिनी आपल्या प्रियजनांना खास शुभेच्छा देण्यासाठी आम्ही काही निवडक आणि प्रेमळ संदेश खाली दिले आहेत. हे संदेश तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना पाठवू शकता किंवा आपल्या सोशल मीडिया स्टेटसवर ठेवून सर्वांसोबत या सणाचा आनंद साजरा करू शकता. Happy Holika Dahan Wishes in Marathi, Happy Rang panchami Wishes in Marathi.

होळीच्या पवित्र अग्नीमध्ये तुमच्या सर्व चिंता, दुःख आणि नकारात्मकता जळून खाक होवो आणि तुमच्या आयुष्यात सुखाचे रंग उधळले जावो! होळी पौर्णिमेच्या आणि होलिका दहनाच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा!

जळो ती ईर्षा, जळो तो द्वेष... होळीच्या अग्नीत जळोत तुमचे सर्व क्लेश! होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

रंग मनाचे, रंग आनंदाचे, रंग विश्वासाचे आणि आपलेपणाचे... होळीच्या रंगात रंगून जाऊया, दुरावा विसरून प्रेमाने जगूया. होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

गोड पुरणपोळीचा घास, मनात प्रेमाचा सुवास... होळीचा सण साजरा करूया, ठेवून सर्वांवर विश्वास! होळी निमित्त आपणास मंगलमय शुभेच्छा !

वाईटावर चांगल्याचा विजय, होळीच्या सणाचा हाच खरा आशय सर्वांना होळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्यांचा, रंग बंधाचा, रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा... रंगांच्या या उत्सवात न्हाऊन निघूया! तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

गुलालाचा गंध आणि पाण्याचे तुषार, या सणात मिळवू आनंद अपार! रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

जीवन रंगीत असो, दुःखाचा एकही रंग नसो! आपले नाते घट्ट व्हावे, हीच ईश्वराकडे मागणे असो! होळीच्या अणि रंगपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!