Gudi Padwa 2026 Wishes: गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मराठी नववर्षाचा पहिला दिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 23:43 IST2026-03-18T15:22:13+5:302026-03-18T23:43:10+5:30
Gudi Padwa Wishes in Marathi: गुढीपाडवा तथा हिंदू नववर्षानिमित्त आपल्या प्रियजनांसाठी खास 'शुभेच्छा संदेश' येथे दिले आहेत. हे संदेश आपल्या मित्र-नातेवाईकांना आवर्जून पाठवा, सोशल मीडियावर शेअर करा आणि व्हॉट्सॲप स्टेटसला ठेवून नवीन वर्षाचा आनंद द्विगुणित करा!

Gudi Padwa 2026 Wishes in Marathi
वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा सुख समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा सर्वांना गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा!

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमचे हृदय प्रेमाने फुलू द्या प्रत्येक क्षण आनंदाने जगून घ्या गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Gudi Padwa Marathi Wishes
जल्लोष नववर्षाचा, मराठी अस्मितेचा हिंदू संस्कृतीचा, सण उत्साहाचा सण गुढी पाडव्याचा, आनंद मराठी मनाचा गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Gudi Padwachya Shubhechha
उभारून आनंदाची गुढी दारी,जीवनात येवो रंगत न्यारी पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा आकांक्षा शुभेच्छा आहेत या नववर्ष स्वागताच्या सर्वांना मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Gudi Padwa Messages in Marathi
आला आहे वसंताला बहर, एकत्र नाचू गाऊया निसर्गाची किमया अनुभवून एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊया गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Gudi Padwa Status in Marathi
तुम्हाला मिळो गणपतीचा आशीर्वाद विद्या मिळो सरस्वतीकडून धन मिळो लक्ष्मीकडून प्रेम मिळो सगळ्यांकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Gudi Padwa Shubhechha in Marathi
निळ्या आभाळात शोभते उंच गुढी नववर्ष आले घेऊन आनंदाची गोडी सर्वांना गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा!

Gudi Padwa Messages in Marathi
नक्षीदार काठाचे रेशमी वस्त्र, त्यावर चांदीचा कलश, कडू गोड नैवेद्याची गुंफण त्यावर आंब्याची डहाळी नि फुलांचे तोरण चला दिमाखात साजरा करूया गुढी पाडव्याचा सण सर्वांना गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा!

Gudi Padwa Chya Hardik Shubhechha
जुन्या गोष्टी मागे सोडून, स्वागत करूया नववर्षाचे, प्रगतीने आणि उत्साहाने भरलेले असो, हे नववर्ष सर्वांचे सर्वांना गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा!

















