By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 14:07 IST
1 / 15Hanuman Janmotsav 2026 Astrology: गुरुवार, ०२ एप्रिल २०२६ रोजी हनुमान जन्मोत्सव आहे. संपूर्ण देशभरात हनुमंतांचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. याच दिवशी नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह मीन राशीत प्रवेश करत आहे. या राशीत रवि आणि शनि ग्रह विराजमान आहेत. गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत त्रिग्रही योग जुळून आलेला आहे.2 / 15मारुतीचा जन्म हा चैत्र पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी झाला. मारुतीचा जन्म भारतात सर्वत्र साजरा केला जातो. महाराष्ट्रात चैत्र पौर्णिमेला ठिकठिकाणच्या मंदिरात पहाटेपासून कीर्तन सुरू होते आणि सूर्योदयाच्या वेळी मारुतीचा जन्मोत्सव साजरा केला जातो. अनेक प्रकारच्या आपत्तींच्या विनाशासाठी म्हणून हनुमंताची उपासना केली जाते. 3 / 15सामर्थ्याची उपासना आणि उपासनेचे सामर्थ्य याची गरज कलियुगात महत्त्वाची मानली गेली आहे. बलभीम मारुतीचे वैशिष्ट्य काय? एक महत्त्वाची गोष्ट अशी की, मारुती कधीही पराभूत झालेला नाही. अवघड प्रसंगी त्याला आपल्या अंगच्या अद्भुत शक्तीची जाणीव होते आणि तो कोणत्याही बिकट प्रसंगातून सहजपणे मार्ग काढतो. शुभ योगातील हनुमान जन्मोत्सवाच्या कालावधीत कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल? जाणून घेऊया...4 / 15मेष: मौजमजा करण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च केला जाईल. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. विवाहोत्सुकांना चांगला काळ आहे. मन आनंदी राहील. काही तरी नवीन करून दाखवण्याची जिद्द राहील. अनेक अडचणी दूर होतील. मात्र, हे दोन दिवस थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. योजनांच्या बाबतीत गुप्तता पाळली पाहिजे. नियमानुसार कामे करा. विनाकारण वादात पडू नका.5 / 15वृषभ: मनात उत्साह राहील. व्यवसायात भरभराट होईल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. सहकारी वर्गाशी जुळवून घेणे योग्य ठरेल. काहींना बदलीला सामोरे जावे लागेल, जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. मुलांशी संवाद ठेवा. त्यांच्या मनात काय आहे, हे समजून घेतले पाहिजे. आर्थिक उलाढाली करताना अति आत्मविश्वास दाखवू नका. फार दगदग होईल, अशी कामे करू नका. तब्येतीची काळजी घ्या.6 / 15मिथुन: आर्थिक लाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. भेटवस्तू प्राप्त होईल. मित्र-मैत्रिणींची भेटी होईल. सहवासात मजेत वेळ जाईल. भावंडांशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. घरातील सदस्यांना विश्वासात घेऊन कामे करा. घरात खेळीमेळीचे वातावरण ठेवा. नोकरीत कामे वेळच्या वेळी करा. नाही तर बोलणी खावी लागतील. काहींना अनपेक्षित बदलीला सामोरे जावे लागेल. मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील.7 / 15कर्क: अडचणी दूर होतील. एकंदरीत काळ चांगला जाईल. आर्थिक आवक चांगली राहील. देवाणघेवाण करताना थोडी खबरदारी घ्यावी. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. वडीलधाऱ्या मंडळींचा मान राखा. भावंडांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्या अडचणी समजून घ्या. नोकरीत सोयी-सुविधा वाढवून मिळतील, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. कामातील बदल सुखावह ठरतील. वरिष्ठांकडून प्रशस्तिपत्र मिळेल.8 / 15सिंह: पुरस्कार जाहीर होईल. जनसंपर्क चांगला राहील. परिस्थिती अनुकूल राहील. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. लोकांकडून प्रशंसा केली जाईल. मान-सन्मान मिळेल. थोडा क्रोधाला आवर घातला पाहिजे. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. पैशांचे नियोजन नीट करा. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. वडिलोपार्जित संपत्तीची कामे ऐरणीवर येतील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. जवळच्या प्रवासाचा योग येईल.9 / 15कन्या: काही अडचणी असतील. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. प्रवासात अनोळखी लोकांपासून सावध राहा. ऐनवेळी नियोजित कार्यक्रमात बदल होऊ शकतात. अडचणी दूर होतील. परिस्थिती आटोक्यात येईल. लोकांची मने दुखावली जाणार नाही याची काळजी घ्या. मधूर संभाषण करा. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. महत्त्वाची कामे होतील.10 / 15तूळ: काही कटू तर काही गोड अनुभव येतील. आर्थिक आवक चांगली राहील. जनसंपर्क चांगला राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रसंगी शांत बसणे आवश्यक राहील. नोकरीत कामाचे स्वरूप बदलेल. नवीन कामाचा ताण मुत्सद्दीपणाने हाताळाल. त्यामुळे महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. तरुणवर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. अडचणी दूर होतील. जीवनसाथीशी सूर जुळतील, भेटवस्तू देण्यास हरकत नाही. व्यवसायात भरभराट होईल.11 / 15वृश्चिक: सतत व्यस्त राहाल. नोकरीत नवनवीन कामे उपस्थित होतील. शांत चित्ताने कामे करत राहा. वरिष्ठांशी वादविवाद टाळणे योग्य राहील. चांगले अनुभव येतील. धनलक्ष्मीची कृपा राहील. भेटवस्तू मिळतील, लोक सहकार्य करतील. मित्र-मैत्रिणींच्या भेटीगाठी होतील. संयम बाळगण्याची गरज आहे. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. कायद्याची बंधने पाळण्यात हयगय करू नका, अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.12 / 15धनु: इच्छा-आकांक्षा पूर्ण होण्यासाठी चांगला काळ आहे. काहींना पुरस्कार जाहीर होतील, पर्यटन घडेल. तरुण वर्गाला प्रेमात सफलता मिळेल. विवाह जुळण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. काही योगायोगाच्या घटना घडतील, नोकरीत संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. कामाचा ताण राहील. अधिकारी वर्गाशी गोडीत बोलून आपली कामे करून घ्यावी. धनप्राप्ती होईल. एखादे महत्त्वाचे काम यशस्वीपणे पूर्ण कराल. आत्मविश्वास वाढेल.13 / 15मकर: यश मिळेल. अधिक चांगली फळे देणारा ठरेल. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. अचाट साहस करण्याच्या फंदात पडू नका. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. संयमाची परीक्षा पाहिली जाईल. अडचणी दूर होतील. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. काही लोक विरोधात गुप्तपणे कारवाया करतील. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. उच्च पद मिळेल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. नातेवाईक भेटतील.14 / 15कुंभ: संमिश्र ग्रहमान राहील. बोलण्यामुळे लोकांची मने दुखावली जाणार नाहीत याची काळजी घ्या. जवळच्या लोकांशी गैरसमज होऊ शकतात. जीवनसाथीचे मन मोडू नका. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. प्रवासात सतर्क राहा. खर्चावर नियंत्रण ठेवा. चांगले दिवस राहतील. पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. लोकांकडून प्रशंसा केली जाईल. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल.15 / 15मीन: कटू-गोड अनुभव येईल. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. मुलांची काळजी घ्यावी. त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे वाढवू नका. फार दगदग होईल अशी कामे करू नका, विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील, आपले कोण आणि परके कोण हे ओळखून त्यानुसार लोकांशी व्यवहार करा. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. मनात आनंदी विचार राहतील. मनावर ताण राहील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.