५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 14:28 IST2025-07-01T14:17:09+5:302025-07-01T14:28:37+5:30
जुलै महिन्यात गुरु आणि शनिचा शुभ योग अनेक राशींना भाग्योदयाचा, अपार कृपेचा ठरू शकतो, असे म्हटले जात आहे. जाणून घ्या...

जुलै महिना सुरू झाला आहे. या महिन्यात आगामी काळात अनेक शुभ योग जुळून येत असून, काही प्रतिकूल योगही जुळून येत आहेत. जुलै महिन्यात अनेक ग्रह राशीपरिवर्तन करणार असून, काही ग्रहांच्या चलनात बदल होणार आहे. गुरु आणि शनि यांना नवग्रहांमध्ये विशेष स्थान आहे.
जुलै महिन्यात मिथुन राशीत विराजमान झालेल्या गुरु ग्रहाचा उदय होणार आहे. एखादा ग्रह सूर्यापासून जवळच्या अंतरावर असेल, तर तो ग्रह सूर्य प्रभावामुळे दिसत नाही. अशा स्थितीत त्या ग्रहाचा अस्त झाला, असे म्हटले जाते. तोच ग्रह सूर्यापासून लांब अंतरावर गेला की पुन्हा दिसू लागतो, तेव्हा त्याला त्या ग्रहाचा उदय झाला असे म्हटले जाते. आताच्या घडीला सूर्य मिथुन राशीत असून, तो जुलै महिन्यात कर्क राशीत जाईल.
नवग्रहांचा न्यायाधीश शनि गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत आहे. या राशीत शनि वक्री होणार आहे. गुरु आणि शनिचा असा योग सुमारे ५०० वर्षांनी जुळून येत असल्याचा दावा केला जात आहे. जुलै महिन्यात गुरु आणि शनि ग्रहाच्या चलनात होणारा बदल विशेष मानला जात आहे. नेमक्या कोणत्या राशींवर याचा शुभ-लाभदायी आणि पुण्य-फलदायी प्रभाव पाहायला मिळू शकेल? जाणून घेऊया...
मेष: लोकप्रियता वाढेल. आदर मिळेल. नवीन काम सुरू करू शकता. संबंधित क्षेत्रात उच्च पदे मिळवू शकता. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. जोडीदारासोबत नवीन ठिकाणी फिरायला जाऊ शकता. नोकरीत पदोन्नती किंवा नवीन प्रकल्प मिळू शकतो. व्यवसाय करत असाल तर नवीन करार आणि नफ्याच्या संधी मिळू शकतील.
वृषभ: गुरु उदय आणि शनि वक्री होणे लाभदायक ठरू शकेल. उत्पन्नात वाढ होऊ शकते. गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ आहे. नशिबाची साथ लाभेल. प्रवासातून फायदा होईल. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल. सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकते. नवीन संपर्क फायदेशीर ठरतील. एखाद्या प्रकल्पावर काम करत असाल तर त्याला गती आणि यश मिळू शकते.
मिथुन: आत्मविश्वास वाढू शकेल. बेरोजगारांना नोकरी मिळू शकते. प्रतिभेने आणि कौशल्याने कामाच्या ठिकाणी ओळख मिळू शकेल. कौतुक होऊ शकेल. कुटुंबासोबत किंवा जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकाल. संशोधन क्षेत्रात सहभागी असलेल्यांना चांगले फायदे मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.
कर्क: नशिबाची साथ मिळू शकेल. कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. देशांतर्गत आणि परदेशात प्रवास करू शकता. वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रयत्नांमध्ये यश मिळेल. नवीन संधी मिळू शकतील. संधीचे सोने केले तर यश प्रगती साध्य करता येऊ शकेल. विद्यार्थी एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेत यशस्वी होऊ शकतात. करिअरमध्ये अनपेक्षित, अप्रत्यक्ष लाभ मिळू शकतात.
कन्या: गुरु उदय आणि शनि वक्री होणे शुभ फलदायी ठरू शकते. काम आणि व्यवसायात विशेष प्रगती मिळू शकते. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन उत्तम राहील. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. लोकप्रियता वाढेल. कामाची प्रशंसा होऊ शकेल. जुन्या आरोग्य समस्यांपासून आराम मिळेल.
तूळ: कामाचे कौतुक होऊ शकेल. चांगली प्रगती होऊ शकते. ध्येयाकडे वाटचाल करू शकता. व्यवसायात चांगल्या नवीन संधी मिळू शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक काळ आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल. बराच काळ अडकलेले पैसे वसूल होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांचा पगार वाढू शकतो. व्यवसायातून नफा मिळू शकतो.
धनु: गुरु उदय आणि शनि वक्री होणे फायदेशीर ठरू शकते. भौतिक सुख मिळू शकते. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन उत्तम राहील. तसेच, अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. जे रिअल इस्टेट, मालमत्ता आणि जमिनीशी संबंधित व्यवसाय करतात त्यांना चांगला नफा मिळू शकतो.
मकर: पराक्रम, धैर्य आणि शौर्य वाढू शकते. काम आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. मोठ्या लोकांशी संबंध विकसित करू शकता, ज्याचा भविष्यात फायदा होऊ शकतो.
मीन: सुख, सोयी आणि सुविधा वाढू शकतात. पालक किंवा वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. मानसिक शांतता लाभू शकेल. स्थावर मालमत्तेशी संबंधित किंवा वाहनाशी संबंधित लाभ मिळण्याचे संकेत आहेत. परदेशात जाण्याची किंवा दूरच्या देशात नोकरी मिळवण्याची संधी मिळू शकते. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. आदर होईल. अभ्यास किंवा लेखन क्षेत्रात असाल तर हा काळ शुभ ठरू शकेल.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.