Guru Purnima 2025 Wishes: गुरुपौर्णिमेच्या मराठी शुभेच्छा, Message, Status पाठवून द्या प्रियजनांना, गुरुकृपेचे सुंदर संदेश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 17:29 IST2025-07-09T16:52:01+5:302025-07-09T17:29:20+5:30

Guru Purnima 2025 Wishes in Marathi: १० जुलै रोजी गुरुपौर्णिमा(Guru Purnima 2025) आहे. गुरूंची पूजा, त्यांचे स्मरण, त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण ती साजरी करतो. त्याबरोबरच अध्यात्मिक गुरूंचा विसर पडू नये म्हणून हे सुंदर गुरुकृपेचे संदेश(Guru Purnima 2025 Wishes in Marathi) तुम्ही तुमच्या प्रियजनांना पाठवू शकता तसेच आपल्या सोशल मीडिया अकाउंटच्या स्टेट्सलाही ठेवू शकता.

गुरूंचा आठव, त्यांचे स्मरण हे देखील गुरुकृपेसाठी पुरेसे आहे. मराठी साहित्यात गुरूंची अतिशय सुंदर कवनं आहेत. या शुभेच्छा संदेशाच्या माध्यमातून करूया त्याची उजळणी आणि पाठवूया हे शुभेच्छा संदेश आपल्या मित्रपरिवाराला!

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥ - Marathi News | Guru Purnima Status in Marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

बालपणी शिकलेला हा श्लोक, गुरूंची महती सांगतो. गुरूंच्या ठायी त्रिदेवांची शक्ती एकवटली आहे. म्हणून त्यांना प्रत्यक्ष देवाचीच उपमा दिली आहे. म्हणून गुरु समोर आले असता त्यांना देव समजून वंदन करा अशी आपल्या संस्कृतीची शिकवण आहे.

ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्तगुरू दिसले ॥ - Marathi News | Guru Purnima Messages in Marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

त्रिगुणात्मक त्रैमूर्ति समोर आल्यावर आशा भोसले यांच्या सुस्वरातील हे गाणं आठवल्याशिवाय राहत नाही. आजही दत्त गुरूंचे शब्दचित्र रेखाटायचे झाले तर या गाण्याहून उत्तम दुसरे कवन नाही. हे प्रासादिक गाणे ऐकले तरी डोळ्यासमोर गुरुमूर्ती उभी राहते. प्रचिती घेऊन पहा.

नि:शंक हो निर्भय हो मना रे, प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे ॥ - Marathi News | Guru Purnima Quotes in Marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

स्वामींच्या तारक मंत्रात मनाला उभारी देणारे शाब्दिक बळ आहे. त्याचे नित्य पठण केले तरी स्वामी आपल्या सोबत सदैव आहेत याची अनुभूती येते. मात्र तिथे नि:शंक सेवा हवी आणि ते सोबत असताना निर्भय होऊन त्यांच्यावर श्रद्धा हवी.

संत एकनाथ महाराजांनी आपल्या गुरुमाउलीत ओंकार स्वरूप पाहिले आणि त्याचे वर्णन करत त्यांच्यासमोर शरणागती पत्करली आहे. मात्र ओंकार उच्चार ऐकून अनेकांना हे सद्गुरू गीत न वाटता गणेश गीत वाटते.

परमपूज्य टेंबे स्वामी यांनी केलेली ही प्रार्थना जणू काही आपल्या भावनेला दिलेले शब्द आहेत. जेव्हा केव्हा आपल्याला एकटे पडल्यासारखे वाटते तेव्हा आधार वाटतो तो आपल्या गुरुमाऊलीचा, तेव्हा आर्त साद घालताना हेच शब्द ओठी येतात.

नि:संशयपणे गुरूंसमोर शरणागती पत्करली असता तोच आपल्याला परमात्म्याची भेट घालून देतो, हा विश्वास संत एकनाथ व्यक्त करत आहेत, एवढेच नाही तर राम, कृष्ण रूपात भगवंतही गुरूंसमोर नतमस्तक झाला हे आपल्या कवनातून सांगत ते गुरुमहती किती श्रेष्ठ हे अधोरेखित करत आहेत.

गुरु आपल्या आयुष्यात आल्यावर काय करतात? तर अज्ञान, आळस, अंधश्रद्धेचा अंध:कार दूर करून प्रकाश आणतात. हा प्रकाश असतो ज्ञानाचा, जिज्ञासेचा, उत्साहाचा आणि अध्यात्माचा. या सुंदर गाण्यातही गुरूंना प्रार्थना करत निर्भय जगता यावे यासाठी प्रार्थना केली आहे.

देवाची भूपाळी आपण नेहमीच म्हणतो, पण आपल्याला गुरुस्थानी असलेल्या साईबाबांना या गाण्यातून छान साद घातली आहे. त्यांच्या केवळ चरण कमलांचे दर्शन घडले तरी दुःख, दैन्य, आजार, भवताप याचा विसर पडेल आणि श्रद्धा-सबुरी अंगात बाणली जाईल अशी खात्री व्यक्त केली आहे.