गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 13:26 IST2025-07-07T13:15:36+5:302025-07-07T13:26:50+5:30
Numerology: यंदाच्या वर्षी गुरुवारी गुरुपौर्णिमा येत असल्यामुळे या दिवसाचे महत्त्व अनेक पटींनी वाढल्याचे म्हटले जात आहे. तुमचा मूलांक कोणता? कसा असेल प्रभाव? जाणून घ्या...

Numerology: ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. त्यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो आणि या मूलांकांवरून भविष्यकथन केले जाऊ शकते. राशींप्रमाणे मूलांकांना ग्रहांचे स्वामित्व बहाल करण्यात आले आहे. ग्रहांच्या गोचराचा जसा राशींवर प्रभाव पडत असतो, तसा तो मूलांकांवरही पडतो, असे सांगितले जाते.
चातुर्मास सुरू झाला असून, आगामी काळात काही शुभ योग तर काही प्रतिकूल योग जुळून येत आहेत. शनि-मंगळ-केतु यांचा अशुभ योग जुळून येत असून, गुरु आणि सूर्य यांचा राजयोग निर्माण होत आहे. यंदा गुरुवारी गुरुपौर्णिमा येत असल्यामुळे या दिवसाचे महत्त्व अनेक पटींनी वाढल्याचे सांगितले जात आहे.
गुरुवार, १० जुलै २०२५ रोजी असलेल्या ग्रहस्थितीमुळे कोणत्या मूलांकाला सर्वाधिक लाभ प्राप्त होऊ शकेल? कोणत्या मूलांकावर कसा प्रभाव असेल? कुटुंब, नोकरी, व्यवसाय यासह विविध क्षेत्रांत स्थिती कशी असू शकेल? तुमचा मूलांक कोणता? जाणून घेऊया...
ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. हा कालावधी सकारात्मक ठरू शकेल. समस्या दूर होऊ शकतील. आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. कुटुंबातील सदस्यांना मदतीचा हात पुढे कराल. दीर्घकाळापासून प्रलंबित प्रकरणावर निर्णय घेऊ शकाल. पैसे कुठेतरी अडकले असतील तर परत मिळू शकतात.
ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. एखाद्या आव्हानाला धीराने सामोरे जाऊ शकाल. कुटुंबासोबतचा आनंददायी काळ घालवू शकाल. कठीण प्रसंगात सकारात्मक राहणे हिताचे ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी प्रगती होऊ शकेल. आदर वाढेल. आर्थिक बाबतीत हा काळ फलदायी ठरू शकेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात काही चढ-उतारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. कामाचे कौतुक केले जाऊ शकेल. कामे पूर्ण करण्यात धावपळ होऊ शकेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगला लाभ प्राप्त होऊ शकतो.
ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. या काळात अधिक व्यस्त असू शकाल. कामाच्या ठिकाणी लोकप्रियता वाढू शकेल. अनावश्यक खर्च टाळणे हिताचे ठरू शकेल. मित्रांसोबत मजेत वेळ घालवू शकाल. व्यवसायातील गुंतवणुकीतून फायदा होऊ शकेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे.
ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकेल. अध्यात्माकडे कल वाढू शकेल. एखादे अडलेले काम पूर्ण होऊ शकेल. विचारपूर्वक निर्णय घेणे हिताचे ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी एखादा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी वेळ लागू शकतो. त्यामुळे मन बेचैन होऊ शकेल. आर्थिक प्रगती साध्य करण्यासाठी योजनांवर ठाम राहावे लागेल. विचारपूर्वक गुंतवणूक करणे हिताचे ठरू शकेल.
ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. सकारात्मकता लाभेल. आळस झटकून कामाला लागू शकाल. समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग दिसू शकेल. कौटुंबिक गोष्टींकडे लक्ष देणे श्रेयस्कर ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी संतुलन राखणे महत्त्वाचे असेल. जीवनात प्रगतीचे अनेक नवीन मार्ग उघडू शकतील.
ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. अप्रत्यक्ष, अनपेक्षितपणे मोलाचा सल्ला मिळू शकतो. सकारात्मकता लाभू शकेल. मनाप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत, तर निराश होऊ नका. कामाच्या ठिकाणी आळस टाळावा लागेल. कोणत्याही निष्काळजीपणामुळे नुकसान होऊ शकते. महत्त्वाचे काम लांबणीवर पडू शकेल. नेटवर्किंग क्षेत्रातील लोकांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.
ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. अनोळखी व्यक्तींकडून मिळालेला एखादा सल्ला मोलाचा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी काही समस्या आणि अडथळ्यांना तोंड द्यावे लागू शकते. मानसिक ताण आणि खर्च वाढण्याची शक्यता आहे. भविष्याचा विचार करून निर्णय घेतल्यास सकारात्मक परिणाम मिळू शकतील.
ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. कुटुंब, मित्रांसोबत आनंददायी वेळ घालवण्याची संधी मिळू शकेल. नवीन मित्र होऊ शकतील. एखाद्या महत्त्वाच्या कामात जवळच्या मित्राची मदत मोलाची ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी काम पूर्ण करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. कठोर परिश्रमाने परिस्थिती चांगली होईल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.