Shani Asta 2026: आजपासून शनि होणार अस्त! ६ राशींना चांगला काळ, रखडलेली कामे होतील; हाती पैसा मिळेल, यश-लाभ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 12:39 IST2026-03-10T09:09:09+5:302026-03-13T12:39:10+5:30
Shani Asta March 2026: गुरु मार्गी होणे आणि शनि अस्तंगत होणे महत्त्वाचे मानले गेले आहे. कोणत्या राशींचा भाग्योदय होऊ शकतो, कसा असेल प्रभाव? जाणून घ्या...

मार्च महिन्यात अनेक महत्त्वाचे ग्रह गोचर होत आहेत. याशिवाय मिथुन राशीत वक्री असलेला गुरू ग्रह मार्गी होत आहे. तर मीन राशीत असलेला शनि अस्तंगत होणार आहे. गुरूचे मार्गी होणे आणि शनि अस्त होणे, या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

एखादा ग्रह सूर्याच्या अगदी जवळून गोचर करतो, तेव्हा सूर्याच्या प्रभावामुळे तो ग्रह पृथ्वीवरून दिसेनासा होतो. अशा परिस्थितीत तो ग्रह अस्तंगत झाला असे म्हटले जाते. आताच्या घडीला शनि मीन राशीत आहे. १४ मार्च रोजी सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे शनि आणि सूर्य एकमेकांच्या जवळ असल्याने शनि अस्तंगत होणार आहे.

कर्क राशीतून वक्री चलनाने गुरू ग्रहाने मिथुन राशीत प्रवेश केला होता. गुरू ग्रह आता मार्गी होणार आहे. काही काळाने गुरू पुन्हा कर्क राशीत प्रवेश करेल. या दोन्ही ग्रह गोचराचा काही राशींना उत्तम लाभ होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. जाणून घेऊया...

मेष: करिअर आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळू शकतात. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. नवीन व्यवसाय योजना यशस्वी होऊ शकतात. आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाठिंबा मिळू शकतो. साडेसातीचा प्रभाव किंचित कमी होऊ शकतो. मानसिक शांतता लाभू शकेल. लोकांशी असलेले संबंध सुधारू शकतात.

कर्क: अत्यंत शुभ मानले जाते. व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होऊ शकतील. समाजात आदर वाढेल. व्यवसाय विस्ताराच्या योजना यशस्वी होतील. कामाच्या ठिकाणी कार्यक्षमतेचे कौतुक होईल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे आता कोणत्याही अडथळ्यांशिवाय पूर्ण होतील. हा काळ आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत असेल. घरात सुखसोयी वाढतील. कुटुंबात शुभ कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा मिळेल.

तूळ: कामात प्रगती होऊ शकेल. खर्च जास्त असला तरी, योग्य नियोजनाने कामे सहजपणे पूर्ण करू शकाल. एखाद्या बातमीने खूप आनंदी व्हाल. थोडे व्यावहारिक विचार करून निर्णय घेतल्यास चांगले परिणाम मिळतील. जीवन सुधारेल. भावनांवर नियंत्रण ठेवल्यास सकारात्मक परिणाम मिळू शकतात.

धनु: उत्साही असाल. रखडलेली कामे गती घेतील. नोकरी करणाऱ्यांसाठी प्रगतीचे मार्ग खुले होतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येऊ शकतात. आर्थिक परिस्थिती सुधारेल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. जोडीदारासोबत सुसंवाद वाढेल.

मकर: कारकिर्दीत नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. कठोर परिश्रमाचे सकारात्मक परिणाम मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. व्यावसायिकांना नवीन प्रकल्प किंवा फायदेशीर सौदे मिळण्याची शक्यता आहे. या काळात कामावर अधिक मेहनत करावी लागू शकते.

मीन: नशिबाची साथ लाभेल. नोकरीच्या शोधात असाल, तर संधी मिळू शकतात. वरिष्ठ, शिक्षकांचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल. गुंतवणुकीतून नफा मिळविण्याची ही योग्य वेळ आहे. कौटुंबिक वातावरणात आनंद राहू शकेल. योजना यशस्वी होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी आदर वाढू शकतो. व्यवसायिकांना विस्ताराच्या नवीन संधी देखील मिळू शकतात. ताण कमी होऊ शकतो. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

















