Guru Margi 2025: 'गुरु' होजा शुरु'; गुरु मार्गी लागल्यामुळे मिथुन,तूळसह 'या' राशींना होणार जबरदस्त लाभ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 13:27 IST2025-02-04T13:20:57+5:302025-02-04T13:27:57+5:30
Guru Margi 2025: ज्योतिष शास्त्रानुसार, गुरु हा एक शुभ ग्रह आहे जो अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात शुभ प्रभाव आणतो. गुरुचे स्थित्यंतर अतिशय शुभ चिन्ह आहे. ज्यामुळे अनेक राशींचे अच्छे दिन येणार आहेत. कोणाला धनलाभ तर कोणाला व्यवसायात भरभराट अनुभवता येणार. ४ फेब्रुवारी रोजी गुरु मार्गी (Guru Margi 2025) लागल्यामुळे बाराही राशींवर पडलेला प्रभाव जाणून घेऊ.

वृषभ राशीत प्रवेश करत असलेला गुरु आज दुपारी १:४६ वाजता मार्गी होईल. म्हणजे गुरूची हालचाल प्रतिगामीवरून थेट आज बदलेल. या बदलामुळे मिथुन आणि तूळ राशीसह अनेक राशींना जबरदस्त लाभ होणार आहेत. या राशीचे लोक त्यांच्या करिअरमध्ये खूप प्रगती करतील आणि यासोबतच त्यांची आर्थिक स्थिती २०२५ मध्ये उत्तम होईल. चला पाहू बाराही राशींचे भविष्य!
मेष :
मेष राशीच्या लोकांचे उत्पन्न आणि खर्च यात संतुलन राहील. अनावश्यक खर्च टाळा.आर्थिक स्थिती चांगली करण्यासाठी नव्या संधी प्राप्त होतील. प्रेमसंबंध सुधारतील. काही दिवस लांबचा प्रवास टाळा, एप्रिल नंतर प्रवास योग आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासात गती मिळेल. नवीन घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार तूर्तास पुढे ढकला. पैसे जपून वापरा.
वृषभ :
वृषभ राशीच्या लोकांना अनेक प्रकारच्या चिंतेतून मुक्ती मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. वडीलधाऱ्या मंडळींच्या तब्येतीत सुधारणा होईल. तुमच्या कामात सुधारणा करण्यासाठी तुम्हाला महत्त्वाच्या लोकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात विशेष लक्ष दिले तर चांगली प्रगती होईल. करिअरमध्ये नवीन आणि चांगल्या संधी मिळू शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि चिंता सोडून चिंतन करा.
मिथुन :
मिथुन राशीच्या लोकांना अपेक्षेपेक्षा जास्त पैसा मिळेल. भाग्य तुम्हाला साथ देईल. जोडीदाराशी काळजी घ्या. क्षुल्लक वादामुळे कटुता वाढू शकते. मुलांकडून तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल किंवा त्यांना समाजात पुरस्कार किंवा सन्मान मिळेल. तब्येत सामान्य राहील, पण थोडा मानसिक त्रास होऊ शकतो. पैसे कमावण्याच्या अनेक उत्तम संधी तुमच्या आयुष्यात येतील आणि तुम्हाला पुढे जाण्याची संधी मिळेल.
कर्क :
कर्क राशीच्या लोकांनी जोडीदाराशी समन्वय राखावा. काही बाबतीत ताण असू शकतो. अनावश्यक वाद टाळा. वाहन चालवताना, रस्त्यावर चालताना आणि काम करताना काळजी घ्या. गुंतवणुकीसाठी ही वेळ शुभ नाही. एप्रिल नंतर आर्थिक निर्णय घ्या. प्रेम नातेसंबंधांसाठी हा काळ अनुकूल राहील. जर तुम्ही हुशारीने वागलात तर शत्रू नमते घेतील.
सिंह :
सिंह राशीच्या लोकांना मित्रांकडून सहकार्य मिळेल. जोडीदाराची साथ मिळण्यासाठी हा उत्तम काळ आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. व्यापारी वर्गाला नवीन भागीदारीतून प्रगतीची अपेक्षा पूर्ण होईल. पूर्वकर्माचे संचित फळण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. सध्या शेअर मार्केटमध्ये अडकू नका. आरोग्य सामान्य राहील. अविचाराने कृती करू नका.
कन्या :
कन्या राशीचे लोक पूर्ण आत्मविश्वासाने काम करतील. शिक्षणात यश मिळविण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. नोकरदार लोकांची कामात प्रगती होईल. आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक किंवा सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. व्यावसायिक लोक त्यांच्या व्यवसायात प्रगती करण्याचे ध्येय गाठू शकतील. लांबच्या प्रवासाचे योग येतील. तुमच्या जीवनात प्रगतीची शक्यता आहे आणि तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल.
तूळ :
तूळ राशीचे लोक आनंदी राहतील. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी उत्तम काळ आहे. नोकरदारांवर वरिष्ठ खुश होतील. आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक किंवा सामाजिक जीवनात मान सन्मानाचे प्रसंग येतील. करिअरशी निगडित मोठी संधी येऊ शकते. नाते संबंधांमध्ये माधुर्य जपण्यासाठी डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवा.
वृश्चिक :
वृश्चिक राशीच्या लोकांचे पूर्वकर्म फळास येईल. तुमचा तणाव आणि समस्या दूर होतील. कुटुंब आणि मित्रांसोबत आनंदी राहाल. तुम्ही सामुदायिक कार्यक्रमात किंवा कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. नवीन वाहन खरेदी कराल. अनपेक्षित धनलाभाचे योग आहेत. कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील. तुमच्या नात्यात सुधारणा होण्यास वाव आहे आणि तुम्हाला आर्थिक लाभही मिळतील.
धनु :
धनु राशीचे लोक थकवा आणि आळसामुळे काहीसे निराश राहतील. मात्र महत्त्वाची ध्येय तुम्हाला कष्ट घेण्यासाठी उद्युक्त करेल. कष्टानेच पैसा मिळेल. तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध सौहार्दपूर्ण निर्माण कराल. मुलांकडूनही चांगली बातमी मिळेल. कुटुंबातील सदस्यांबाबत कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. ईश्वर चिंतन आणि सत्कर्म करा, लाभ होईल.
मकर :
मकर राशीच्या लोकांनी आरोग्य सुधारण्यावर लक्ष द्यावे. उत्साहाने आणि धैर्याने ध्येयाकडे वाटचाल कराल. छोट्या सहलींचे आयोजन कराल. आर्थिक स्थिती सुधारेल. जोडीदाराशी नाते अधिक दृढ होईल. मान सन्मानाच्या संधी येतील. क्षुल्लक कारणावरून वाद विवाद टाळा, त्यामुळे मनःस्ताप टाळता येईल. आई वडिलांचे आशीर्वाद फळतील.
कुंभ :
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ उत्तम आहे. समाजात सन्मान मिळेल. व्यापाऱ्यांना विविध प्रकारचे फायदे मिळण्याची शक्यता आहे. शेअर मार्केट गुंतवणुकीसाठी हा काळ शुभ आहे. तुम्ही स्वावलंबी व्हाल. तुम्ही तुमच्या जोडीदाराकडे पूर्ण लक्ष द्यावे आणि त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून त्याची अंमलबजावणी करावी. तुमच्यासाठी प्रगती साधण्याची ही वेळ आहे.
मीन :
मीन राशीच्या लोकांनी अनावश्यक खर्च टाळावा. तुमचा खर्च तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त होणार नाही याची काळजी घ्या. अन्यथा आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल. तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यात कटुता येऊ शकते, त्यामुळे प्रसंगी नमते घ्या.आरोग्यासाठी आणि गुंतवणुकीच्या कामासाठी हा शुभ काळ आहे. वेळ दवडू नका, कष्टाने ध्येय साध्य करा.