गजकेसरी परिवर्तन राजयोग: ९ राशींना दुप्पट-दुहेरी लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; अपार यश-प्रगती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 14:21 IST2025-02-01T14:08:50+5:302025-02-01T14:21:26+5:30
फेब्रुवारीच्या प्रारंभी जुळून येत असलेला गजकेसरी परिवर्तन राजयोग अनेक राशींना सर्वोत्तम वरदान काळाप्रमाणे ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या...

फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. पाहता पाहता २०२५च्या पहिल्या जानेवारी महिन्याची सांगता झाली. फेब्रुवारी महिनाही जानेवारी महिन्याप्रमाणे अनेकार्थाने विशेष ठरू शकेल. महाकुंभमेळा फेब्रुवारी महिन्यातही असणार आहे. तर उरलेले शाहीस्नान या काळात होणार आहे. वसंत पंचमी, महाशिवरात्री असे अनेक मोठे सण-उत्सव, व्रत-वैकल्ये फेब्रुवारीत साजरी होणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार या महिन्यात बुध ग्रह दोनवेळा राशी परिवर्तन करणार आहे.
फेब्रुवारी महिन्यात ११ तारखेला बुध कुंभ राशीत प्रवेश करेल. या राशीत शनि ग्रह विराजमान असल्यामुळे शनि आणि बुधाचा युती योग जुळून येऊ शकेल. तसेच १२ तारखेला नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य कुंभ राशीत प्रवेश करेल. त्याने सूर्य, बुध आणि शनि यांचा त्रिग्रही योग जुळून येऊ शकेल. लगेचच २७ फेब्रुवारी रोजी बुध मीन राशीत प्रवेश करेल.
शुक्राच्या मीन राशीतील प्रवेशामुळे गुरु आणि शुक्र यांचा परिवर्तन राजयोग जुळून आला आहे. मीन रास शुक्राची उच्च रास मानली जाते. ३१ मे २०२५ पर्यंत शुक्र याच राशीत असणार आहे. तसेच शुक्र आणि राहु ग्रहाचा युती योग सुरू आहे. राहु ग्रह मे महिन्यापर्यंत मीन राशीत आहे. मीन राशीचा स्वामी गुरु ग्रह आहे. तर गुरु ग्रह वृषभ राशीत आहे. ०१ मे २०२५ पर्यंत गुरु ग्रह वृषभ राशीत असणार आहे. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. गुरु आणि शुक्र एकमेकांच्या राशीत असल्यामुळे परिवर्तन राजयोग जुळून आला आहे. मे महिन्यापर्यंत परिवर्तन राजयोग कायम राहणार आहे.
तसेच नवग्रहांचा राजा मानला गेलेला बुध ग्रह ३० जानेवारी रोजी श्रवण नक्षत्रात विराजमान झाला आहे. ०७ फेब्रुवारीपर्यंत या चरणात बुध ग्रह असणार आहे. गजकेसरी राजयोग, परिवर्तन मालव्य योग आणि बुधाचे नक्षत्र गोचर कोणत्या राशींसाठी सर्वोत्तम वरदान काळ ठरू शकतो? जाणून घेऊया...
मेष: परदेशातून आर्थिक लाभ मिळू शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो. विद्यार्थ्यांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी प्रचंड यश मिळवू शकतात. अडकलेले किंवा उधारी दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. कामात येणारे अडथळे दूर केले जाऊ शकतात. कामाचे कौतुक होईल. बेरोजगारांना नोकरी मिळू शकते. व्यापार, व्यवसायात वेगाने वाढ होऊ शकेल. परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. बौद्धिक क्षमता वाढू शकेल. अनेक प्रकारचे लाभ मिळू शकतील.
वृषभ: इच्छा पूर्ण होऊ शकतील. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे. मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांना बढती आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतील. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. कष्टाचे फळ आणि इच्छित नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन: विविध प्रकारचे लाभ प्राप्त होऊ शकतील. प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवन चांगले राहणार आहे. वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याची शक्यता जास्त आहे. सर्जनशीलता वाढेल, करिअरवर चांगला परिणाम होऊ शकतो. काहीतरी नवीन शिकायला मिळेल.
सिंह: आदर आणि सन्मान वाढू शकतो. नोकरी करणाऱ्यांच्या जबाबदाऱ्या वाढू शकतील. पदोन्नती अपेक्षित आहे. परदेशात करिअर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. भागीदारी व्यवसायातही नफा होईल. कुटुंबातील मतभेद दूर होऊ शकतील. कौटुंबिक जीवनात आनंद राहील.
कन्या: वैवाहिक जीवनात आनंद राहील. नशिबाची साथ मिळू लागेल. व्यवसाय आणि नोकरीमध्ये फायदा होऊ शकतो. गेल्या काही काळापासून नोकरीत सुरू असलेल्या समस्या संपुष्टात येऊ शकतील. पसंतीच्या ठिकाणी बदली होऊ शकते. व्यवसाय विस्तारू लागेल. भागीदारीत केलेल्या व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. वाहन, मालमत्ता, घर इत्यादी खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
तूळ: आनंददायी घटना घडू शकतात. भौतिक सुख मिळू शकते. मालमत्ता खरेदी करण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी चांगला ठरू शकतो. घर, वाहन खरेदी करू शकता किंवा घर बांधू शकता. घराचे नुतनीकरण करू शकता. मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत कुठेतरी प्रवास करण्याचा प्लॅन करू शकता. उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
वृश्चिक: शिक्षण, करिअर, राजकारण यात सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतील. परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते. राजकारणाशी संबंधित लोकांना मोठे पद मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी दिलेल्या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पूर्ण करण्याची संधी मिळेल. कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या युक्त्या उघड होतील. व्यवसायाच्या उद्देशाने केलेला प्रवास फायदेशीर ठरू शकेल.
कुंभ: उत्साही वाटेल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठ आणि कनिष्ठांकडून मदत मिळेल. ट्रागेट लवकर साध्य करू शकतील. व्यापाऱ्यांची प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल, पण दुसरीकडे खर्च थोडा वाढू शकतो. घरात आनंद येऊ शकेल. विवाहितांना त्यांच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. मेहनतीचे फळ मिळेल. काम वेळेवर पूर्ण होऊ शकेल.
मीन: भरघोस लाभ मिळू शकतो. शनि साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. परंतु या राजयोगामुळे दुहेरी लाभ मिळू शकतो. शुभ परिणाम मिळण्यास सुरुवात होऊ शकेल. नशिबाची साथ लाभेल. व्यवसायात अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. चांगला व्यवसाय भागीदार मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. समाजात आदर वाढेल. कामाच्या ठिकाणी प्रगती, पद आणि प्रतिष्ठा मिळेल. पगारात वाढ होऊ शकेल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना फायदे मिळू शकतात. मानसिक चिंता किंवा तणावातून आराम मिळू शकेल. भागीदारी व्यवसायात नफा मिळू शकतो.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.