गजकेसरी धनयोगात एकादशी, प्रदोष: ७ मूलांकांना वरदान काळ, अमाप लाभ, यश-प्रगती; पद-पैसा-भरभराट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 09:19 IST2025-01-07T09:11:45+5:302025-01-07T09:19:37+5:30
Numerology: सन २०२५ मधील पहिले एकादशी आणि प्रदोष व्रत आणि गजकेसरी धनयोगाचा प्रभाव नेमक्या कोणत्या मूलांकांसाठी सौभाग्यकारक, सुख-समृद्धीदायक आणि समाधानाचा ठरू शकतो? जाणून घ्या...

Numerology: २०२५ वर्ष सुरू झाले आहे. नववर्षातील पहिली एकादशी आणि प्रदोष व्रत आहे. पौष महिन्याच्या शुद्ध पक्षातील पुत्रदा एकादशी १० जानेवारी २०२५ रोजी आहे. तर, ११ जानेवारी २०२५ रोजी पहिले प्रदोष व्रत आहे. या दोन्ही व्रतांवेळी गजकेसरी योग आणि धन योग जुळून येत असल्याचे सांगितले जाते आहे.
ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. त्यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो आणि या मूलांकांवरून भविष्यकथन केले जाऊ शकते. राशींप्रमाणे मूलांकांना ग्रहांचे स्वामित्व बहाल करण्यात आले आहे. ग्रहांच्या गोचराचा जसा राशींवर प्रभाव पडत असतो, तसा तो मूलांकांवरही पडतो, असे सांगितले जाते.
सन २०२५ ची पहिले एकादशी आणि प्रदोष व्रत तसेच चंद्र, गुरु आणि मंगळ यांचा गजकेसरी आणि धनयोग राशींसह अनेक मूलांकांसाठी सर्वोत्तम वरदान काळाप्रमाणे ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. शिक्षण, नोकरी, आर्थिक आघाडी, गुंतवणूक, करिअर या क्षेत्रांवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घेऊया...
ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. नोकरदार परिश्रम करून आणि कामात समर्पित राहून यश मिळवू शकतात. व्यावसायिकांना नफा कमावण्याची संधी मिळेल. संयम ठेवल्यास फायदा होईल. आर्थिक बाबतीत हळूहळू सुधारणा होईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. संवादाद्वारे समस्या सोडवणे चांगले होईल.
ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी अधिक लक्षपूर्वक अभ्यास करणे आणि कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रगती आणि मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे. चांगली बातमी मिळू शकते. पैशाच्या बाबतीत हळूहळू सुधारणा होईल. कामात प्रगती होईल.
ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. नोकरदार कामाच्या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करतील करिअरमध्ये यश मिळेल. व्यापारी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना तगडी टक्कर देऊ शकतील. अधिक नफा कमावण्याची संधी मिळू शकेल. आर्थिक लाभही होईल. विद्यार्थी मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, फायनान्शियल अकाउंटिंग इत्यादींमध्ये चांगली कामगिरी करू शकतील.
ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. कार्यक्षेत्रात काही अडथळे येऊ शकतात. प्रेमसंबंधातील प्रश्न संवादातून सोडवावे लागतील. आव्हानांना युक्तीने तोंड देऊ शकाल. जीवनातील सुखद अनुभव मिळवाल. समतोल राखून आणि हुशारीने काम केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात.
ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. काही चांगली बातमी मिळू शकते. नोकरदारांना परदेशात जाऊन काम करण्याची संधी मिळू शकते. ही संधी फायदेशीर ठरू शकेल. पैशाच्या बाबतीत स्वतःचे निर्णय घेणे चांगले राहील. रसिकांसाठी हा काळ चांगला राहील. नातेसंबंध अधिक घट्ट होतील. व्यावसायिकांना नफा मिळण्याची आणि उच्च स्तरावर यश मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीच्या कामात अडचणी येऊ शकतात.
ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. विद्यार्थी विशेष कौशल्ये दाखवू शकतात. सॉफ्टवेअर अभियांत्रिकी आणि व्हिज्युअल कम्युनिकेशनमध्ये प्रगती करू शकतात. कामात प्रगती होईल. मेहनतीमुळे यशस्वी होऊ शकाल. पैशाच्या दृष्टीने वेळ चांगला जाईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. काही चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक स्थिती सुधारेल. आर्थिक लाभाच्या संधी मिळू शकतील. नोकरदारांना पदोन्नती मिळू शकते. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळू शकते.
ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. नोकरदारांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कामगिरीवर परिणाम होऊ शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. गरजेनुसार गुंतवणूक बदलू शकाल. कामाच्या ठिकाणी हळूहळू यश मिळू शकेल. काही मतभेद होऊ शकतात. काही नुकसानही होऊ शकते. त्यामुळे थोडे सावध राहा. पैशाच्या बाबतीत भाग्य साथ देईल.
ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. नोकरीत प्रमोशन मिळेल. प्रेमसंबंधातील समस्या बोलून दूर होतील. एखाद्याकडून मदत मिळू शकते. नोकरदारांना कामाच्या दबावाचा सामना करावा लागू शकतो. कार्यक्षमता कमी होण्याची शक्यता आहे.
ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. विद्यार्थी चांगला अभ्यास करून पूर्ण उत्साहाने प्रगती करतील. व्यापाऱ्यांना अधिक नफा मिळू शकतो. आर्थिकदृष्ट्या काळ चांगला ठरू शकेल. संपत्तीत हळूहळू वाढ होऊ शकेल. भागीदारीशी संबंधित कामात अडचणी येऊ शकतात. एखादी चांगली बातमी मिळाल्याने समाधान वाटेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.