फेब्रुवारी ठरेल फायदेशीर: ४ ग्रहांचे गोचर, ९ राशींना बक्कळ लाभ; पदोन्नती योग, भरभराटीचा काळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 13:56 IST2025-01-29T13:43:53+5:302025-01-29T13:56:00+5:30
जानेवारी महिन्याची सांगता होत असून, फेब्रुवारीचा महिना अनेक राशींना इच्छापूर्ती, धनलाभाचा ठरू शकतो, असे सांगितले जात आहे.

सन २०२५च्या पहिल्या जानेवारी महिन्याची सांगता होत आहे. फेब्रुवारी महिन्याला सुरुवात होणार आहे. फेब्रुवारी महिना ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असणार आहे. शनि पूर्वाभाद्रपदाच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करेल. सूर्य-वरुण अर्धकेंद्र योग आणि शुक्र-वरुण युती योग तयार होत आहेत. तसेच फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला शनी स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत अस्तंगत होणार आहे.
नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. कुंभ राशीत शनि आणि सूर्याची युती होईल. काही मान्यतांनुसार सूर्य आणि शनि हे पिता-पुत्र असून, ते एकमेकांचे शत्रू ग्रहही आहेत. तसेच कुंभ राशीत सूर्य, बुध आणि शनि यांच्या युतीमुळे त्रिग्रह योग तयार होत आहे.
या ग्रहांच्या शुभ योगात फेब्रुवारी महिना कोणत्या राशीसाठी फायदेशीर ठरू शकेल? नोकरी, व्यवसाय, व्यापार, शिक्षण, कुटुंब, करिअर, आर्थिक आघाडी या क्षेत्रात कसा प्रभाव असू शकेल? जाणून घेऊया...
मेष: हा कालावधी शुभ आणि फलदायी ठरू शकेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. शेअर बाजार किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करून नफा मिळू शकतो. खर्च नियंत्रणात राहतील. बचत वाढू शकेल. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते.
वृषभ: फेब्रुवारीचा प्रारंभ फायदेशीर ठरू शकतो. यश आणि आनंद मिळू शकतो. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतील. अनपेक्षित आर्थिक लाभ, धनलाभ होऊ शकतो. समाजात आदर वाढेल. दीर्घकाळापासून असलेला ताण कमी होऊ शकतो. आनंद देणाऱ्या घटना घडू शकतात.
मिथुन: नोकरी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. पदोन्नती मिळू शकते. निर्णय काळजीपूर्वक घेण्याचा सल्ला दिला जातो. कुटुंबात काही शुभ कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित समस्या दूर होऊ शकतील. मालमत्ता खरेदी किंवा विक्री करण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ ठरू शकेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना नफा मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
कर्क: विविध प्रकारचे फायदे होऊ शकतील. जवळच्या मित्रांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. यश मिळवू शकता. आनंद देणाऱ्या घटना घडू शकतील. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. बौद्धिक क्षमतेच्या आधारे महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. जीवनात सहजता येईल. कामाच्या ठिकाणी मेहनतीचे आणि प्रतिभेचे कौतुक होईल. पदोन्नती आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. बेरोजगार लोकांना नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात.
सिंह: पदोन्नती आणि आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. काही मोठ्या योजनांवर काम सुरू करू शकाल. भविष्यात फायदे मिळतील. आदर आणि सन्मान वाढेल. घरात आनंदी वातावरण राहील. नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत सापडू शकतील. व्यवसायात आर्थिक लाभाचा मार्ग मोकळा होऊ शकेल. कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही चांगली बातमी मिळू शकते.
तूळ: फेब्रुवारीची सुरुवात शुभ ठरू शकेल. काम वेळेवर पूर्ण होऊ शकेल. प्रगती होऊ शकेल. कुटुंबात आनंदाची बातमी येईल. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील. सरकारशी संबंधित कामांत यश मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. व्यावसायिकांनी त्यांचे काम इतरांवर सोपवू नये.
धनु: यश मिळेल. आदर वाढेल. नोकरी शोधणाऱ्या लोकांना चांगल्या ऑफर मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीसह मोठी जबाबदारी मिळू शकते. परदेशात करिअर करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी संयम ठेवावा. लोकांना थोडा जास्त वेळ वाट पहावी लागू शकते. कालांतराने मार्गातील अडथळे दूर होऊ शकतील.
मकर: शुक्र आणि शनीचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतील. सुखसोयी आणि सुविधांमध्ये वाढ होऊ शकेल. कुटुंबातील सुरू असलेल्या समस्या संपुष्टात येऊ शकतात. कोणत्याही कामात कठोर परिश्रम करत असाल तर त्यात यश मिळू शकते. विद्यार्थ्यांना बरेच फायदे मिळू शकतील. अभ्यासाबाबतच्या समस्या कमी होऊ शकतात. एकाग्रता वाढू शकते.
मीन: भाग्याची साथ मिळेल. तणावातून दिलासा मिळू शकेल. महत्त्वाची कामे पूर्ण होऊ शकतील. मन आनंदी राहील. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. उत्पन्नात वाढ होऊ शकते. उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून पैसे कमवू शकता. काही नवीन मालमत्ता खरेदी करू शकता. कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांतता राहू शकेल. घरातील ज्येष्ठांकडून सहकार्य मिळेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.