शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Happy Dasara 2025 Wishes: दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Insta, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन आनंदात साजरा करा विजयादशमीचा सण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 12:42 IST

1 / 8
आपट्याची पाने, झेंडुची फुले, घेवूनी आली विजयादशमी, दसऱ्याच्या आज शुभ दिनी, सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी.. दसरा सणानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!
2 / 8
अधर्मावर धर्माचा विजय अन्यायावर न्यायाचा विजय वाईटावर चांगल्याचा जयजयकार हाच आहे दसऱ्याचा सणवार दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
3 / 8
आंब्याच्या पानांची केली कमान, अंगणात काढली रांगोळी छान, आश्विन शुद्ध दशमीचा सण दसरा, आपट्याची पाने देऊन करा साजरा.. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
4 / 8
साडेतीन मुहूर्तांपैकी एक, दसरा हा सण विजयाचा.. देवीने केला वध असूराचा, दिन पराक्रमाचा, पौरुषाचा… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
5 / 8
दारात झेंडूचे तोरण लावून, रांगोळीमध्ये रंग भरू, गोडधोडाचा नैवेद्य करुन, अस्त्र,शस्त्रांचे पूजन करु… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
6 / 8
सोन्यासारखे नाते तुमचे- माझे हळुवार जपायचे, दसऱ्याच्या शुभदिनी अधिक दृढ करायचे… विजयादशमीच्या शुभेच्छा…
7 / 8
निसर्गाचं दान आपट्याचं पान त्याला सोन्याचा मान तुमच्या आयुष्यात नांदो सुख-शांती समाधान दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा…
8 / 8
सण दसरा विजयाचा, रावणाचे दहन करण्याचा, सरस्वती पूजन करून, शुभेच्छा एकमेकांना देण्याचा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा…
टॅग्स :Navratriनवरात्रीNavratri Mahotsav 2025शारदीय नवरात्रोत्सव २०२५Traditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सणDasaraदसराWishes in Marathiमराठी शुभेच्छा