Happy Dasara 2025 Wishes: दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Facebook, Insta, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन आनंदात साजरा करा विजयादशमीचा सण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 12:42 IST2025-10-01T12:18:23+5:302025-10-01T12:42:02+5:30
Happy Dussehra Wishes in Marathi: Happy Dasara Wishes in Marathi: यंदा २ ऑक्टोबर नवरात्रीचा(Navratri 2025) शेवटचा दिवस अर्थात दसरा(Dussehra 2025) आहे. त्यानिमित्त आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आपट्याचे पान देऊन सोन्याची लयलूट करा शिवाय हे सुंदर दसरा शुभेच्छा संदेश(Dussehra wishes in marathi) पाठवून, तसेच Facebook, Insta, Whatsapp Status ला ठेवून दसऱ्याचा आनंद द्विगुणित करा.

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
आपट्याची पाने, झेंडुची फुले, घेवूनी आली विजयादशमी, दसऱ्याच्या आज शुभ दिनी, सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी.. दसरा सणानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
अधर्मावर धर्माचा विजय अन्यायावर न्यायाचा विजय वाईटावर चांगल्याचा जयजयकार हाच आहे दसऱ्याचा सणवार दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
आंब्याच्या पानांची केली कमान, अंगणात काढली रांगोळी छान, आश्विन शुद्ध दशमीचा सण दसरा, आपट्याची पाने देऊन करा साजरा.. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
साडेतीन मुहूर्तांपैकी एक, दसरा हा सण विजयाचा.. देवीने केला वध असूराचा, दिन पराक्रमाचा, पौरुषाचा… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
दारात झेंडूचे तोरण लावून, रांगोळीमध्ये रंग भरू, गोडधोडाचा नैवेद्य करुन, अस्त्र,शस्त्रांचे पूजन करु… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
सोन्यासारखे नाते तुमचे- माझे हळुवार जपायचे, दसऱ्याच्या शुभदिनी अधिक दृढ करायचे… विजयादशमीच्या शुभेच्छा…
निसर्गाचं दान आपट्याचं पान त्याला सोन्याचा मान तुमच्या आयुष्यात नांदो सुख-शांती समाधान दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा…
सण दसरा विजयाचा, रावणाचे दहन करण्याचा, सरस्वती पूजन करून, शुभेच्छा एकमेकांना देण्याचा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा…