By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 09:46 IST
1 / 12Diwali 2025 Vaibhav Laxmi Yog: अवघ्या काही दिवसांवर दिवाळी सण आला आहे. खरेदी, गृह सजावट याची लगबग सुरू आहे. डेकोरेशनपासून फराळापर्यंत सर्वच गोष्टींनी बाजार फुलून गेला आहे. कामातून वेळ काढून दीपोत्सवाची तयारी केली जात आहे. अशातच काही राशींना ही दिवाळी अतिशय लाभदायक, आनंददायक आणि भरभराट करणारी ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.2 / 12दिवाळीच्या या पावन पर्वावर वैभव, समृद्धीकारक चंद्र आणि संपत्तीकारक शुक्र यांची कन्या राशीत युती होत आहे. यामुळे वैभव लक्ष्मी राजयोग निर्माण होत आहे. हा राजयोग काही राशींचे भाग्य उजळवू शकतो. अनपेक्षित आर्थिक लाभ आणि प्रगती अनुभवण्याची शक्यता आहे.3 / 12गुरू आणि शुक्र या ग्रहांच्या दृष्टींनी राजयोग जुळून येत आहे. यासह मंगळ आणि बुध ग्रहाच्या युतीचा लाभ मिळू शकतो. दिवाळीच्याच मुहूर्तावर नवग्रहांचा गुरू बृहस्पती म्हणजेच गुरू ग्रह कर्क राशीत प्रवेश करत आहे. कर्क रास ही गुरूची उच्च रास आहे. यामुळे हंस राजयोग आणि केंद्र त्रिकोण योग जुळून येत आहे. या शुभ योगांचा काही राशींवर अतिशय चांगला प्रभाव पडू शकतो, असे म्हटले जात आहे. जाणून घेऊया...4 / 12मेष: दिवाळीचा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो. नवीन घर किंवा वाहन खरेदी करता येईल. कुटुंबासोबत चांगला वेळही मिळेल. शारीरिक आणि मानसिक ताण कमी होऊ शकतो. याव्यतिरिक्त करिअरमध्ये लक्षणीय प्रगती आणि पदोन्नती शक्य आहे. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना यश मिळू शकते. सामाजिक दर्जा वाढू शकतो. अध्यात्माकडे कल वाढू शकतो. आत्मविश्वास वाढू शकतो. अनेक क्षेत्रात यश मिळू शकते.5 / 12कर्क: मंगळ आणि बुध युती सकारात्मक ठरू शकते. सुख-सोयी वाढतील. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. आत्मविश्वास वाढू शकतो. सामाजिक सन्मान मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी मेहनतीचे आणि क्षमतांचे कौतुक होऊ शकते. नवीन व्यवसायाच्या संधी निर्माण होतील. रखडलेल्या प्रकल्पाला गती मिळू शकते. कौटुंबिक जीवनातील दीर्घकाळापासून सुरू असलेला वाद मिटू शकतो. वडिलोपार्जित मालमत्तेचे फायदे मिळू शकतात.6 / 12सिंह: दिवाळी अनुकूल ठरू शकते. भौतिक सुखसोयींचा अनुभव येऊ शकतो. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. घरी सुख, समृद्धी आणि शांती येईल. नशीब बाजूने असेल. रियल इस्टेटशी संबंधित लोकांना लक्षणीय नफा मिळू शकेल. करिअरमध्ये प्रगतीची चिन्हे आहेत. सरकारी नोकरी किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे.7 / 12कन्या: वैभव लक्ष्मी राजयोग फायदेशीर ठरू शकतो. आत्मविश्वास वाढेल. व्यक्तिमत्व सुधारेल. कंपन्यांमध्ये उच्च पदांवर असलेल्यांना नेतृत्वाच्या नवीन संधी मिळू शकतात. परदेश प्रवास किंवा परदेशाशी संबंधित कामात यश मिळू शकते. कुटुंब आणि वैवाहिक जीवनात सकारात्मक संवाद आणि समजूतदारपणा वाढेल. नातेसंबंध मजबूत होतील. 8 / 12वृश्चिक: या काळात कार्यशैली सुधारेल. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन उत्तम राहील. या काळात जोडीदाराची प्रगती होऊ शकते. अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. कौटुंबिक जीवनातील दीर्घकाळापासून चालत आलेला वाद मिटू शकतो. नातेसंबंधांमध्ये गोडवा आणि विश्वास वाढेल. या काळात आदर आणि सन्मान मिळू शकतो.9 / 12धनु: मंगळ आणि बुध ग्रहाची युती फायदेशीर ठरू शकते. उत्पन्न लक्षणीयरीत्या वाढू शकते. गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळू शकते. नवीन करिअरच्या संधी निर्माण होऊ शकतात. पदोन्नती मिळू शकते. व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते. या काळात शेअर बाजार आणि लॉटरीमधून फायदा होऊ शकतो.10 / 12मकर: वैभव लक्ष्मी राजयोगामुळे चांगले दिवस येऊ शकतात. नशिबाची साथ लाभेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. नवीन करिअरच्या संधी निर्माण होऊ शकतात. पदोन्नती मिळू शकते. व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते. देशात किंवा परदेशात प्रवास करू शकता. एखाद्या धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. स्पर्धात्मक परीक्षेत विद्यार्थी यशस्वी होऊ शकतात.11 / 12कुंभ: वैभव लक्ष्मी राजयोग फायदेशीर ठरू शकतो. उत्पन्न लक्षणीय वाढू शकते. व्यावसायिकांना नवीन सौदे मिळू शकतात आणि गुंतवणूकीतून नफा मिळू शकतो. लॉटरी आणि शेअर बाजारातून नफा मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना नवीन सौदा किंवा भागीदारीचा प्रस्ताव मिळू शकतो, जो भविष्यात फायदेशीर ठरेल. या काळात मुलांशी संबंधित काही चांगल्या बातम्या मिळू शकतात.12 / 12मीन: गुरूचा हंस राजयोग तसेच केंद्र त्रिकोण राजयोग अत्यंत लाभदायक ठरू शकतो. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात उत्तम फायदा होऊ शकतो. सर्जनशीलता वाढू शकते. अध्यात्माकडे कल मजबूत असू शकतो. नशिबाची, भाग्याची भक्कम साथ लाभू शकेल. आर्थिक परिस्थिती चांगली असेल. मित्रांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. ध्येय साध्य होण्यास मदत होईल. नोकरी आणि व्यवसायात अनेक नवीन संधी मिळू शकतात. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.