बुध गोचर: ८ राशींना यश-प्रगतीची संधी, लॉटरी-शेअर बाजारात लाभाचे योग; पदोन्नती-पगारवाढ शक्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 12:27 IST2024-12-10T12:07:49+5:302024-12-10T12:27:01+5:30
डिसेंबर महिन्यातील बुधाचे गोचर अनेक राशींना सर्वोत्तम, वरदान काळाप्रमाणे ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

डिसेंबरचा महिना अनेकार्थाने विशेष आणि वैशिष्ट्यपूर्ण राहणार असल्याचे सांगितले जात आहे. नवग्रहांचा राजकुमार बुध वृश्चिक राशीत विरामान असून वक्री चलनाने गोचर करत आहे. तसेच वक्री असतानाच अस्तंगतही झालेला आहे.
११ डिसेंबर २०२४ रोजी बुध वृश्चिक राशीत उदय होणार आहे. तर १६ डिसेंबर २०२४ रोजी वृश्चिक राशीत मार्गी होणार आहे. बुधाचे उदय होणे आणि मार्गी होणे सकारात्मक मानले गेले आहे. तसेच याचे अनुकूल परिणाम अनेक राशींना प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जात आहे.
पुढील वर्षी म्हणजेच २०२५ च्या सुरुवातीलाच बुध धनु राशीत प्रवेश करणार आहे. तत्पूर्वी, २०२४ सांगता होताना बुध उदय आणि मार्गी होणे कोणत्या राशींना सर्वोत्तम लाभदायक, यश-प्रगती, नफा-फायदा, सुख-समृद्धी, ऐश्वर्य-वैभव प्रदान करणारे ठरू शकेल? जाणून घेऊया...
मेष: उत्तम प्रकारे यश मिळू शकेल. धर्म आणि अध्यात्मात रुची वाढेल. परदेश प्रवासाची शक्यता आहे. निर्णय आणि केलेल्या कामाचे कौतुक होईल. केंद्र किंवा राज्य सरकारच्या विभागांमध्ये कोणत्याही प्रकारच्या निविदांसाठी अर्ज करायचा असेल, तर त्याचा परिणाम त्या दृष्टिकोनातून शुभ राहू शकेल. अध्यापन, लेखन, प्रकाशन आणि संपादन या क्षेत्रात चांगली कीर्ती मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही काळ शुभ राहील.
मिथुन: आगामी काळ यश मिळवून देणारा ठरू शकेल. संयुक्त व्यवसाय करणे टाळा. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. घेतलेले निर्णय आणि केलेल्या कृतींचे शुभ परिणाम मिळू शकतील. वैवाहिक जीवनात अधिक गोडवा येईल. सरकारकडून पूर्ण सहकार्य मिळेल. लोक अपमान करण्याचा प्रयत्न करतील. अशा गुप्त कारस्थानांपासून सावध रहा. व्यवसायात प्रगती होईल. वैवाहिक जीवन चांगले राहील. नातेवाइकांशी संबंध चांगले राहतील, पण काळजी घ्यावी.
सिंह: आगामी काळ चांगला जाऊ शकेल. भौतिक सुख-सुविधा मिळू शकतात. कार किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ चांगला राहील. कामाच्या ठिकाणी वर्चस्व वाढेल. आर्थिक स्थिती सुधारेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबतचे नाते घट्ट होईल.
कन्या: मित्र आणि नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. परदेश प्रवासाचा लाभ मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी परदेशात जाण्याचा प्रयत्न करायचा असेल तर त्या दृष्टीनेही ग्रहांचे संक्रमण अनुकूल राहील. नवीन करार करायचा असेल तर अनुकूल राहू शकेल. स्थावर मालमत्तेचे प्रश्न सुटतील.
वृश्चिक: अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होऊ शकतो. नोकरीत तुमच्या कामाचा विचार करता प्रोत्साहनासह बढती मिळू शकते. व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे.
मकर: आगामी काळ फायदेशीर ठरेल. उत्पन्न वाढू शकेल. घर, फ्लॅट किंवा वाहन घेण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल राहील. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांसाठीही हा काळ शुभ राहील. गुंतवणूक, शेअर बाजार, लॉटरी यातून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ: करिअर आणि व्यवसायात प्रगतीचे मार्ग खुले होऊ शकतील. बेरोजगारांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. नोकरी करत असाल तर पदोन्नतीसोबत पगारही वाढण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना नफा होऊ शकेल. व्यवसाय वाढवण्याची चांगली संधी मिळेल.
मीन: नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करणार करू शकाल. पदोन्नती आणि पगारात वाढ होऊ शकते. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला आहे. भागीदारीत केलेल्या व्यवसायात नफा होणार आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. प्रवासातून पैसे कमवू शकता.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.