बुध-शनि युती योग: १० राशींना भरघोस लाभ, भरभराटीचा काळ; नवीन नोकरीची ऑफर, संधीच संधी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 14:58 IST2025-02-05T14:47:32+5:302025-02-05T14:58:51+5:30

फेब्रुवारी महिन्यात बुध ग्रह दोनदा राशीपरिवर्तन करणार आहे. बुध आणि शनिचा युती योग कोणत्या राशींसाठी सर्वोत्तम लाभाचा ठरू शकेल? जाणून घ्या...

फेब्रुवारी महिना अनेकार्थाने महत्त्वाचा मानला जात आहे. बुध ग्रह दोन वेळा राशी परिवर्तन करणार आहे. ११ फेब्रुवारी रोजी बुध कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. तर २७ फेब्रुवारी रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे.

नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रह कुंभ राशीत विराजमान झाल्यानंतर नवग्रहांचा न्यायाधीश मानल्या गेलेल्या शनि ग्रहाशी युती योग जुळून येणार आहे. तर सूर्य ग्रहाचा कुंभ राशीत प्रवेश झाल्यानंतर त्रिग्रही राजयोग जुळून येणार आहे.

बुध आणि शनि ग्रहाचा जुळून येत असलेला युती योग अनेक राशींसाठी लाभदायक ठरू शकतो. कुटुंब, नोकरी, व्यवसाय, व्यापार, आर्थिक आघाडी यावर कसा प्रभाव असू शकेल? कोणत्या राशींना काय फायदा मिळू शकेल? जाणून घ्या...

मेष: बौद्धिक क्षमता वाढू शकेल. अनेक क्षेत्रात यश मिळू शकेल. बोलण्याच्या क्षमतेमुळे अनेक प्रकल्प मिळू शकतात. व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. कला आणि शिक्षण क्षेत्रात गुंतलेल्या लोकांना खूप फायदे मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना भरपूर फायदे मिळू शकतात. कोणत्याही गोष्टीबद्दल घाई करू नका. नुकसान होऊ शकते.

वृषभ: बुधाचे गोचर फायदेशीर ठरू शकते. सरकारी नोकरीत काम करणाऱ्यांना आदर मिळू शकेल. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळण्याची अपेक्षा आहे. नोकरीचा शोध पूर्ण होऊ शकतो. नवीन घर मिळण्याची शक्यता आहे. घरी नवीन वाहन येऊ शकते. करिअरसाठी हा काळ खूप शुभ आहे. त्याचा पूर्ण फायदा घ्यावा.

मिथुन: वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याची शक्यता जास्त आहे. सर्जनशीलता वाढेल, करिअरवर चांगला परिणाम होऊ शकतो. यातून काहीतरी नवीन शिकायला मिळेल. व्यावसायिकांना नवीन ऑर्डर मिळण्याची दाट शक्यता आहे. नशिबाची साथ लाभेल. अधिक बचत करू शकाल. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. नात्यात गोडवा वाढेल. आत्मविश्वास वाढेल.

कर्क: करिअर आणि व्यवसाय पुढे नेण्याच्या संधी मिळू शकेल. धार्मिक आणि सामाजिक कार्यात आवड वाढू शकेल. काम आणि व्यवसायासाठी देशात आणि परदेशात प्रवास करू शकता. या काळात गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जुनी प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील. आर्थिक फायदा होऊ शकेल.

सिंह: आनंददायी प्रवास, करिअरमध्ये यश, व्यवसायात नफा, आर्थिक स्थितीत सुधारणा आणि नातेसंबंध मजबूत होऊ शकतील. करिअरमध्ये प्रगतीची शक्यता आहे. कामाचे कौतुक होईल. कष्टाचे चीज होईल. नोकरी करणाऱ्यांना सकारात्मक परिणाम मिळतील. हा काळ व्यावसायिकांसाठी अनुकूल ठरू शकेल. चांगला नफा कमविण्याच्या संधी उपलब्ध होतील. प्रयत्न यशस्वी होतील. अनेक नोकरीच्या ऑफर मिळतील.

कन्या: यश-प्रगतीची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळेल. वरिष्ठ अधिकारी सहकार्य करू शकतील. परदेशी कामात गुंतलेल्या लोकांना फायदा होईल. शत्रूंना धडा शिकवू शकाल. करिअर नवीन उंचीवर नेण्याची हीच वेळ आहे. आदर वाढेल.

तूळ: भौतिक सुखे मिळू शकतात. मालमत्ता खरेदी करण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी चांगला काळ ठरू शकतो. घर, वाहन खरेदी करू शकता. मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत कुठेतरी प्रवास करण्याचा प्लॅन करू शकता. उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. अध्यात्मापासून ते आर्थिक लाभापर्यंत अनेक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वासामुळे करिअरमध्ये यश मिळेल; कामाच्या ठिकाणीही अनुकूल परिणाम मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात, विशेषतः शेअर बाजार आणि व्यापारात चांगला नफा होईल, वाढीचे नवीन मार्ग उघडतील. बचत करू शकाल. नोकरी करणाऱ्यांना नोकरीच्या ऑफर मिळू शकतात.

धनु: भौतिक सुखे मिळू शकतात. या काळात वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. जे लोक रिअल इस्टेट, प्रॉपर्टी, वैद्यकीय आणि खान-पान सेवेशी संबंधित व्यवसाय करत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी मेहनतीचे आणि प्रतिभेचे कौतुक होऊ शकेल. पदोन्नती आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ: व्यवसायात चांगला नफा होऊ शकतो. परंतु पैशाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. नियोजनाशिवाय गुंतवणूक केल्याने नुकसान होऊ शकते. जोडीदारासोबतच्या नात्यात काही मतभेद असू शकतात. मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. जोखीम घेऊन केलेले काम फायदेशीर ठरू शकते. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा.

मीन: चांगले दिवस सुरू होऊ शकतात. समाजात अधिक लोकप्रिय असाल. आदर आणि प्रतिष्ठा मिळेल. सर्जनशीलता आणि निर्णय घेण्याची क्षमता कामाच्या ठिकाणी यश मिळवून देऊ शकेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध असल्याने पदोन्नतीची शक्यता आहे. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. यश निश्चित आहे. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन अद्भूत असेल.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.