शुक्रवारी लक्ष्मी नारायण योग: १० राशींना दुप्पट लाभ, इच्छापूर्ती काळ; यश-प्रगती, सुख-समृद्धी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 20:38 IST
1 / 13आताच्या घडीला मीन राशीत सूर्य, शनि, बुध, शुक्र, राहु आणि नेपच्युन हे ग्रह विराजमान आहेत. मीन राशीतील ग्रहांच्या स्थितीमुळे विविध प्रकारचे ५ राजयोग जुळून आलेले आहेत. तर याच काळात मंगळ कर्क राशीत विराजमान होत आहे. मंगळाचा कर्क राशीत प्रवेश झाल्यानंतर मीन राशीत असलेल्या सर्व ग्रहांशी नवमपंचम योग जुळून येत आहे.2 / 13तसेच बुध, शुक्राचा लक्ष्मी नारायण योग जुळून येत आहे. शुक्रवारी हा योग जुळून येणे शुभ मानले गेले आहे. तर, चंद्र ग्रह मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. वृषभेतील गुरू आणि कर्क राशीतील मंगळ यांच्या सानिध्यात चंद्राचे भ्रमण होणार आहे.3 / 13आर्द्रा नक्षत्र आणि शोभन योगाचा शुभ योग आहे. ०४ एप्रिल २०२५ रोजी शनिचा मीन राशीत उदय होत आहे. तर, याच राशीत ०६ एप्रिल २०२५ पासून बुध मार्गी होत आहे. या ग्रहांच्या गोचराचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घेऊया...4 / 13मेष: मोठी संधी मिळू शकते. कारकिर्दीत पुढे जाऊ शकाल. नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत असाल तर काही सकारात्मक बातमी मिळू शकते. भावंडांकडून सहकार्य मिळेल. कौटुंबिक मालमत्तेशी संबंधित कोणताही वाद असेल तर तो मिटण्याची शक्यता आहे. संभाषण कौशल्याचा आणि हुशारीचा फायदा होईल.5 / 13वृषभ: बऱ्याच काळापासून थांबलेले काम पुन्हा सुरू होऊ शकते. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. पालकांकडून, शिक्षकांकडून आणि मार्गदर्शकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल. परदेशात शिक्षण घेण्याचे किंवा नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. जोडीदार आयुष्यात काहीतरी नवीन करण्याच्या दिशेने वाटचाल करू शकतो. कुटुंबातील बऱ्याच काळापासून चालत आलेले वाद संपुष्टात येऊ शकतात.6 / 13मिथुन: नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. नशिबाची साथ मिळेल. देशात आणि परदेशात प्रवास करू शकता. अध्यात्मिक विकास आणि गूढ ज्ञानात रस वाढू शकतो. व्यापारी असाल तर नवीन सौदे आणि करारांचा फायदा होऊ शकेल.7 / 13सिंह: अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे. कष्टाचे फळ मिळू शकेल. आर्थिक परिस्थिती चांगली राहू शकेल. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल.8 / 13कन्या: उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. आरोग्य सुधारेल. कुटुंबात सुसंवाद राहील. गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो. इच्छा पूर्ण होऊ शकतात. पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकाल.9 / 13तूळ: परदेशांशी संबंधित बाबींमध्ये बरेच फायदे मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी फायदे मिळू शकतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करू शकाल. पालकांकडून पूर्ण सहकार्य मिळू शकते. आर्थिक बाबतीत यश मिळू शकते. बौद्धिक क्षमता वाढण्याची शक्यता आहे. नोकरीत पदोन्नती मिळू शकते. समाजात मान-सन्मान प्राप्त होऊ शकतो.10 / 13वृश्चिक: प्रलंबित कामांमध्ये यश मिळेल. नशिबाची साथ मिळेल. काम आणि व्यवसायासाठी देशात आणि परदेशात प्रवास करू शकता. कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात भाग घेऊ शकता. व्यवसायात किंवा कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रमाचे फळ मिळेल. यश मिळेल. प्रयत्नांना योग्य ती मान्यता मिळेल.11 / 13धनु: सुखसोयी वाढतील. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. यावेळी कोणतीही गुंतवणूक कराल, त्याचा पूर्ण फायदा मिळू शकेल. तसेच, करिअरमध्ये पदोन्नती किंवा नवीन प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांशी असलेले नाते अधिक घट्ट होऊ शकेल.12 / 13मकर: जे काही निर्णय घ्याल ते योग्य ठरण्याची शक्यता प्रबळ होऊ शकते. नोकरीत पदोन्नतीसह नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची अपेक्षा आहे. सार्वजनिक प्रतिमा सुधारेल. बॉस आणि वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. बड्या लोकांशी संबंध निर्माण होतील, जे भविष्यात फायदेशीर ठरू शकतील.13 / 13कुंभ: शुभ फळ मिळेल. पूर्वी कुठेतरी पैसे गुंतवले असतील तर त्याचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. मुलांकडून आनंद मिळेल. शैक्षणिक स्पर्धेत यश मिळू शकेल. कुठे प्रवेशासाठी प्रयत्न करत असाल तर यश मिळू शकते. सर्जनशीलता आणि दूरगामी विचारसरणी फायदेशीर ठरू शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.