२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 18:47 IST2025-07-17T18:35:43+5:302025-07-17T18:47:34+5:30
सूर्य, बुध आणि शुक्र यांच्या दोन राजयोगांचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या...

नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य कर्क राशीत विराजमान झाला आहे. पुढील सुमारे महिनाभर सूर्य कर्क राशीत असेल. सूर्याचे राशीसंक्रमण संक्रांत म्हणून ओळखले जाते. त्यामुळे सूर्याचा कर्क राशीतील प्रवेश पुढील महिनाभर कर्क संक्रांती म्हणून ओळखला जाईल.
कर्क राशीत बुध ग्रह विराजमान आहे. कर्क राशीतील सूर्याच्या प्रवेशानंतर बुधाशी युती होऊन बुधादित्य हा राजयोग जुळून येत आहे. तसेच शुक्र ग्रह आपल्या स्वराशीत म्हणजेच वृषभ राशीत विराजमान आहे. त्यामुळे मालव्य नामक राजयोग जुळून आलेला आहे.
सूर्य, बुध आणि शुक्र या तीन ग्रहांमुळे जुळून आलेल्या दोन राजयोगांचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल? कोणत्या राशींना उत्तम संधी, प्रगती, यश, आनंद, आर्थिक आघाडीवर लाभ, व्यवसायात नफा प्राप्त होऊ शकतो? जाणून घेऊया...
मेष: कार्यक्षेत्रात कामाचा ताण कमी झालेला असेल. प्रलंबित कामे आटोक्यात येतील. नोकरीत नवीन संधी दिसतील. मात्र, आपल्याला स्वतःहून प्रयत्न करावे लागतील. स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी वेळ देणे आवश्यक राहील. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. आर्थिक आवक चांगली राहील. देवाणघेवाण करताना खबरदारी घ्यावी. कुणी तुम्हाला हातोहात फसवू शकते. काही अडचणी येण्याची शक्यता आहे.
वृषभ: सतत कशात ना कशात व्यस्त राहाल. नवनवीन संधी मिळतील. व्यवसायात हळूहळू परिस्थिती आटोक्यात येईल. बाजारपेठेचा अंदाज बरोबर ठरेल. नोकरीत मोठी जबाबदारी राहील. वेळापत्रक व्यस्त होऊन जाईल. लोकांशी गोड बोलून कामे करून घ्या. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. शुक्रवार, शनिवार चंद्र भ्रमणामुळे प्रवासात सतर्क राहा. मनात आध्यात्मिक विचार राहतील.
मिथुन: अडलेली कामे होतील. काही किरकोळ स्वरूपाच्या अडचणी येतील. त्यातून तुम्ही लगेच बाहेर याल. सामाजिक कार्यात लोकांकडून फार अपेक्षा ठेवू नका. एखादी भरवशाची व्यक्ती अपेक्षाभंग करू शकते. कार्यक्षेत्रात मोठी जबाबदारी राहील. घरातील जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका. बोलण्याचा प्रभाव पडेल. शुक्रवार, शनिवार अनुकूलतेचा अनुभव येईल.
कर्क: मनात उत्साह राहील. एखादी नवीन कल्पना विकसित होईल. नवीन प्रकल्प हाती घेण्यात रस राहील. काही अनपेक्षित अडचणी आल्यामुळे थोडी चलबिचल होईल. थोडे सबुरीने वागण्याची गरज आहे. अडचणीतून मार्ग निघेल. सामाजिक कार्यात मोठी जबाबदारी राहील. मात्र बेफिकीरपणे वागू नका. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील.
सिंह: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. सुरुवातीला काही अडचणी असतील. मात्र, सबुरीचे धोरण ठेवल्यास परिस्थितीतून मार्ग निघेल. जीवनसाथीशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्या. प्रेमात असणाऱ्यांनी सावधपणे वागण्याची गरज आहे. व्यवसायात सतत व्यस्त राहाल. बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कामात अडथळे येऊ शकतात. समस्या सुटतील.
कन्या: काही कटू तर काही गोड अनुभव येतील. मोठ्या उत्साहाने योजना ठरवाल. लोकांना योजना आवडतील. मात्र काही हितचिंतकांकडून छुप्या कारवाया केल्या जातील. जेवढी होईल तेवढी गुप्तता बाळगली पाहिजे. व्यवसायात अंदाज चुकू शकतो. नोकरीत वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. बरीच धडपड करावी लागेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. वाहन जपून चालवा.
तूळ: अनेक क्षेत्रांत दबदबा राहील. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. नवीन ओळखी होतील. कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे वाढवू नका. समाजात मान वाढेल. काहींना जवळचे प्रवास घडून येतील. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. योजना गुप्त ठेवा. व्यवसायात भरभराट होईल.
वृश्चिक: अनुकूलता अनुभवायला मिळेल. नवीन जबाबदारीत गुंतलेले राहाल. हळूहळू कामाचा ताण कमी होईल. हलके वाटेल. आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ मिळेल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. नवीन माहिती कळेल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. प्रवासात सतर्क राहा. मुलांना योग्य मार्गदर्शन करा. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. शुक्रवार, शनिवार विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील.
धनु: ग्रहमानाची चांगली साथ राहील. व्यवसायात सतत व्यस्त राहाल. मोठ्या उलाढाली करताना थोडी काळजी घ्यावी. गुंतवणूक करताना जाणकार मंडळींचा सल्ला घ्यावा. भावंडांशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. वेळापत्रक व्यस्त होऊन जाईल. घरातील कामांसाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ द्यावा लागेल. नवीन ओळखी होतील. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील.
मकर: प्रवासात सतर्क राहा. मालमत्तेची कामे गती घेतील. त्यासंबंधीचे व्यवहार जपून करा. करारातील अटी आणि शर्ती नीट वाचून घ्या. जीवनसाथीचा सल्ला उपयुक्त ठरेल. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. फार तिखट व मसालेदार पदार्थ बेतानेच खा. व्यवसायात सतत व्यस्त राहाल. एखाद्या कामासाठी प्रवास करावा लागेल. मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी. बाजारपेठेचा अंदाज चुकू शकतो. भावंडांशी गैरसमज होतील.
कुंभ: कामात चालढकल नको. प्रवासात दगदग होईल. कागदोपत्री पूर्तता करण्यासाठी वेळ द्यावा. जीवनसाथीशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वडीलधाऱ्या मंडळींशी वाद टाळा. व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. आर्थिक निर्णय जपून घ्यावे.
मीन: थोड्याफार प्रयत्नात अडलेली कामे मार्गी लागू शकतील. मात्र, संयम बाळगण्याची गरज आहे. घाईघाईत कामे करू नका. कामे नियमानुसार करा. रहदारीचे नियम धाब्यावर बसवू नका, खर्चावर नियंत्रण ठेवा. कार्यक्षेत्रात कामाची छाप पडेल. अधिकारी वर्गाचे चांगले सहकार्य मिळेल. मालमत्तेची कामे होतील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.