३० दिवस अपार लाभ! ७ राशींना प्रमोशन, प्रगतीची सर्वोत्तम संधी; राजयोग काळ, ४ ग्रह शुभ करतील

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 11:19 AM2023-07-01T11:19:56+5:302023-07-01T11:29:49+5:30

बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण योगाचा काही राशीच्या व्यक्तींना अत्यंत शुभ-लाभ मिळू शकेल. तुमची रास कोणती? जाणून घ्या...

इंग्रजी कॅलेंडरनुसार जुलै महिन्याला सुरुवात होत आहे. तर मराठी वर्षातील अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला चातुर्मास सुरू झाला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, जुलै महिना महत्त्वाचा मानला जात आहे. या महिन्यात ४ बड्या ग्रहांचे राशीपरिवर्तन होत आहे. तर बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण नामक शुभ राजयोग जुळून येत आहेत.

नवग्रहांपैकी ४ महत्त्वाचे ग्रह जुलै महिन्यात राशीपरिवर्तन करणार आहेत. ३० जून रोजी नवग्रहांचा सेनापती मंगळ सिंह राशीत प्रवेश करणार आहे. तर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शुक्र ग्रह ०६ जुलै रोजी कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रह ०८ जुलै रोजी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य १६ जुलै रोजी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तर जुलै महिन्यात बुध ग्रह पुन्हा राशीपरिवर्तन करणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला कर्क राशीत प्रवेश केलेला बुध २४ जुलै रोजी सिंह राशीत प्रवेश करणार आहे.

या ग्रहस्थितीचा कोणत्या राशींना लाभ मिळू शकेल? कोणत्या राशीच्या व्यक्तींना आगामी काळात काहीशी सतर्कता बाळगावी लागेल? कोणत्या राशीच्या व्यक्तींना करिअर, नोकरी, कार्यक्षेत्र, व्यापार, व्यवसाय, गुंतवणूक, आर्थिक आघाडीवर कसा लाभ मिळू शकेल? मेष ते मीन या सर्व राशींवर ४ ग्रहांचा प्रभाव कसा असेल? जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींना आगामी काळ अतिशय शुभ ठरू शकेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना अपेक्षित संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांना हा काळ शुभ राहील. कुटुंबातील सदस्य व कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल. ऑफिसमध्ये बढती किंवा बदली मिळू शकते. मान-सन्मान वाढेल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करत असाल तर इच्छा पूर्ण होईल. परदेशात व्यवसाय वा नोकरी करणाऱ्यांना हा काळ शुभ राहील. प्रॉपर्टी डीलमध्ये फायदा होईल. राजकारणाशी संबंधितांना उच्च पद, महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. गुप्त शत्रू , विरोधक सक्रिय होतील. व्यवहारात सावधगिरी बाळगा. पैसे हुशारीने खर्च करा.

वृषभ राशीच्या व्यक्तींना आगामी काळ यशकारक ठरू शकेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. एखाद्या चांगल्या मित्राच्या मदतीने थांबलेली कामे पूर्ण करता येतील. नोकरदारांसाठी हा काळ शुभ, यश देणारा आहे. मार्केटिंग, कमिशन इत्यादी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी शुभ सिद्ध होईल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर चांगल्या संधी मिळू शकतात. विद्यार्थ्यांना काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. कुटुंबाशी संबंधित कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना पालकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. व्यावसायिकांना बाजारात चढ-उतार दिसतील. लोकांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने मन थोडे अस्वस्थ राहील.

मिथुन राशीच्या व्यक्तींना आगामी काळ अनुकूल ठरू शकेल. वेळ, नातेसंबंध आणि पैसा याविषयी खूप काळजी घ्यावी लागेल. व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. योजनेत केलेली गुंतवणूक नफा देईल. उत्पन्नाचे नवे स्रोत मिळू शकतील. जवळच्या मित्राच्या मदतीने करिअरमध्ये प्रगती करण्याची उत्तम संधी मिळेल. बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळतील. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. मालमत्तेशी संबंधित वाद मिटतील. कामाच्या ठिकाणी निष्काळजीपणा टाळा, अन्यथा वरिष्ठांच्या रोषाला सामोरे जावे लागू शकेल. सरकारशी संबंधित योजनेतून लाभ मिळू शकतो. रागावर नियंत्रण ठेवा. प्रिय जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल.

कर्क राशीच्या व्यक्तींना आगामी काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. पैसा आणि आरोग्य या दोन्हीकडे खूप लक्ष द्यावे लागेल. बजेट बिघडू शकते. जास्त पैसे खर्च केले जाऊ शकतात. मालमत्तेचा वाद वाटाघाटीतून सोडवणे योग्य ठरू शकेल. दिनचर्या आणि खाण्याच्या सवयींची विशेष काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य कमी राहील. घरगुती वाद चिंतेचे कारण बनतील. जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. कालांतराने मतभेद दूर होतील. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. व्यवसाय विस्ताराच्या योजनेवर काम कराल. संचित संपत्तीत वाढ होईल.

सिंह राशीच्या व्यक्तींना आगामी काळ चढ-उतारांचा असणार आहे. यश मिळू शकेल. मित्र आणि नातेवाईक सर्व प्रकारे सहकार्य करतील. कोणाशीही मस्करी करताना खूप सावधगिरी बाळगावी लागेल. कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहावे. व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धा होऊ शकते. कोणत्याही योजनेत किंवा शेअर बाजारात पैसे गुंतवण्यापूर्वी हितचिंतकांचा सल्ला घ्या. कामानिमित्त लांब किंवा कमी अंतराचा प्रवास होऊ शकतो. नोकरदारांनी कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रूंपासून सावध राहणे आवश्यक आहे. विरोधक कामात अडथळा आणण्याचा किंवा तुमची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करू शकतात. विद्यार्थ्यांचे अभ्यासापासून लक्ष विचलित होऊ शकते. कठीण काळात जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल.

कन्या राशीच्या व्यक्तींना आगामी काळ अनुकूल ठरू शकेल. करिअर, व्यवसायात अनुकूल परिणाम मिळतील. व्यवसायात अपेक्षित नफा तर होईलच, पण विस्ताराचे स्वप्नही साकार होऊ शकेल. नोकरदारांना वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचे सहकार्य मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. विद्यार्थ्यांना काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. सामाजिक आणि धार्मिक कार्यात वेळ जाईल. कुटुंबात परस्पर प्रेम आणि सौहार्द वाढेल. वाहन खरेदीची इच्छा पूर्ण होऊ शकते. पैशाच्या व्यवहारात खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अन्यथा तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ जोडीदारासाठी काढा. त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका.

तूळ राशीच्या व्यक्तींना आगामी काळ शुभ आणि यशकारक ठरू शकेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. उच्च पद किंवा महत्त्वाची जबाबदारीही मिळू शकते. करिअर आणि व्यवसायात अपेक्षित प्रगती आणि नफा मिळेल. परीक्षा स्पर्धांच्या तयारीत गुंतलेले विद्यार्थी आणि नोकरीच्या शोधात असलेल्यांना मोठे यश मिळू शकते. नोकरीसाठी परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर इच्छा पूर्ण होऊ शकते. मन धार्मिक आणि सामाजिक कार्यात व्यस्त राहील. वैवाहिक सुख राहील. कुटुंबात वडिलांचे सहकार्य मिळेल.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आगामी काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. बहुतेक वेळ कुटुंब आणि कामाशी संबंधित समस्या सोडवण्यात जाईल. मालमत्तेवरून कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतात. नातेवाईकांचे अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने मन थोडे अस्वस्थ राहील. गैरसमज निर्माण होऊ शकतात. विरोधक कामाच्या ठिकाणी सक्रिय राहतील. ध्येयापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतील. वरिष्ठांकडूनही अपेक्षित सहकार्य मिळू शकणार नाही. पैशांसंबंधी व्यवहारात अधिक सावध राहण्याची गरज आहे. एखाद्या योजनेत हुशारीने पैसे गुंतवा. विद्यार्थ्यांना यशासाठी अधिक मेहनत करावी लागेल. नशीब साथ देईल. नोकरीच्या बाबतीत अपेक्षित यश मिळेल. व्यवसायातील अडथळे दूर होतील. नोकरदारांना उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. समाजात मान-सन्मान वाढेल.

धनु राशीच्या व्यक्तींना आगामी काळ संमिश्र ठरू शकेल. अपेक्षित यश मिळेल. बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कामाच्या ठिकाणी लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणे चांगले. पदोन्नतीची दीर्घकाळ प्रतिक्षा करत आहेत, त्यांना शुभवार्ता मिळू शकेल. करिअर आणि व्यवसाय वाढवण्याच्या चांगल्या संधी मिळतील. कौटुंबिक जीवनासाठीही शुभ काळ असणार आहे. मात्र, कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवणे टाळावे, अन्यथा नुकसान होऊ शकते. कोणत्याही योजनेत किंवा शेअर मार्केट इत्यादीमध्ये हुशारीने पैसे गुंतवा. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ यांचे सहकार्य कमी राहील. गुप्त शत्रूंपासून सावध राहा. अचानक मोठा खर्च करावा लागू शकेल.

मकर राशीच्या व्यक्तींना आगामी काळ संमिश्र जाणार आहे. आरोग्य आणि नातेसंबंध या दोन्हीकडे खूप लक्ष देण्याची गरज आहे. गैरसमज किंवा वादामुळे मन अस्वस्थ होईल. घर, कुटुंब आणि कामाच्या ठिकाणी खूप विचारपूर्वक बोलावे लागेल. राग टाळावा. व्यवसायात किंवा योजनेत पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर त्याबाबत काळजीपूर्वक निर्णय घ्या. कोणत्याही कागदावर स्वाक्षरी करण्यापूर्वी, ते पूर्णपणे वाचा आणि पैशाच्या व्यवहारात खूप सावधगिरी बाळगा. नोकरीशी संबंधित कोणतीही संधी सोडू नका. वरिष्ठांशी चांगले संबंध निर्माण करून इच्छित लाभ मिळविण्यात यशस्वी होऊ शकता. गुप्त शत्रूंपासूनही सावध राहावे लागेल.

कुंभ राशीच्या व्यक्तींना आगामी काळात अपेक्षित यश आणि नवीन संधी मिळू शकतात. नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. आत्मविश्वास वाढेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचेही पूर्ण सहकार्य मिळेल. बॉस तुमच्या कामाचे कौतुक करतील. व्यवसायातही अपेक्षित नफा मिळेल. विद्यार्थ्यांना काही चांगली बातमी मिळू शकते. व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने हा काळ अतिशय अनुकूल आहे. कोणत्याही योजना किंवा शेअर बाजार इत्यादींमध्ये पैसे गुंतवताना हितचिंतकांचा सल्ला घेणे योग्य राहील. आरोग्याच्या बाबतीत सावध राहावे लागेल.

मीन राशीच्या व्यक्तींना आगामी काळ खूप शुभ असणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. शुभ कार्यक्रम होऊ शकतात. धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. वाहन वगैरे घेण्याचा विचार करत असाल तर इच्छा पूर्ण होऊ शकते. नोकरदारांना इच्छित ठिकाणी बदली किंवा बढती मिळू शकते. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यासाठीही उत्तम संधी मिळतील. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील. संचित संपत्तीत वाढ होईल. व्यवसायाच्या संदर्भात केलेला प्रवास आनंददायी आणि लाभदायक ठरेल. अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतात. कामाचा अतिरिक्त बोजा पडेल. पैशाशी संबंधित समस्या चिंतेचे कारण बनू शकते. तथापि, अशी परिस्थिती फार काळ टिकणार नाही. विवेकबुद्धीने त्यावर मात करू शकाल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.