आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 03:26 PM2024-05-26T15:26:51+5:302024-05-26T15:27:41+5:30

या बंगल्यात सध्या काही काम सुरू असून त्याची पाहणी करण्यासाठी मंत्री तिथे पोहचले होते. तेव्हा त्यांचे लक्ष कडुलिंबाच्या झाडावर गेले.

The mango in neem tree in the MP minister Prahlad Patel bunglow; Everyone is shocked | आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण

आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण

"बोया पेड बबूल का, आम कहां से होए" ही हिंदीतील म्हण सगळ्यांनी ऐकली असेल. परंतु मध्य प्रदेशात एका मंत्र्यांच्या बंगल्यात असेच काही दृश्य पाहायला मिळत आहे. याठिकाणी बाभळीचं झाड नव्हे परंतु कडुलिंबाच्या झाडाला आंबे लागल्याचं दिसत आहे. मध्य प्रदेशातील ग्रामविकास मंत्री प्रल्हाद पटेल यांचा बंगला सध्या याच कारणामुळे चर्चेत आला आहे. 

पटेल यांच्या बंगल्यात कडुलिंबाचे झाड आहे. परंतु त्याला आंबे लागलेत. शनिवारी जेव्हा या झाडावर मंत्र्याची नजर पडली तेव्हा सगळेच आश्चर्यचकीत झाले. त्यांनी स्वत: सोशल मीडियावर या झाडाचा फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. त्यानंतर या झाडाची चर्चा होऊ लागली आहे. मंत्री प्रल्हाद पटेल यांचं निवासस्थान भोपाळमधील प्रोफेसर कॉलनीजवळील सिव्हिल लाईनमध्ये बी ७ बंगला आहे. त्यांच्या बंगल्याच्या आवारात मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. सगळीकडे हिरवळ आहे. 

याच बंगल्याच्या आवारात असलेल्या कडुलिंबाच्या झाडाला आंबे लागले आहेत. या बंगल्यात सध्या काही काम सुरू असून त्याची पाहणी करण्यासाठी मंत्री तिथे पोहचले होते. तेव्हा त्यांचे लक्ष कडुलिंबाच्या झाडावर गेले. तेव्हा या झाडाला आंबे लागल्याचे पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी या झाडाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले. त्यात लिहिलं की, भोपाळ येथील निवासस्थानी गेल्यावर तिथे कडुलिंबाच्या झाडाला आंबे पाहून  आश्चर्य वाटले. कुणीतरी काही वर्षापूर्वी केलेला हा प्रयोग अचंबित करणारा आहे. हे झाड जवळपास ३० वर्ष जुने आहे. मंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना या झाडाचे विशेष संगोपन करण्याच्या सूचना दिल्या. 

B-7 बंगल्याचा इतिहास काय?

प्रल्हाद पटेल यांना यावर्षीच या बंगल्याचं वाटप केले आहे. याआधी हा बंगला शिवराज सरकारमधील सुक्ष्म लघू, मध्यम उद्योग मंत्री ओमप्रकाश सकलेचा यांचा होता. मु्ख्यमंत्री यांच्या निवासस्थानानंतर सर्व मंत्र्यांच्या बंगल्यामध्ये बी ७ हा बंगला सर्वात मोठा आहे. या बंगल्यात एकेकाळी मुख्यमंत्री कार्यालयही होते. पीसी सेठी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ते या बंगल्यात राहायचे. २०१८ मध्ये राज्यात काँग्रेस सरकार बनलं तेव्हा हा बंगला माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना दिला होता. परंतु ते याठिकाणाहून दुसरीकडे गेल्यानं आता हा बंगला प्रल्हाद पटेल यांना देण्यात आला आहे.

Web Title: The mango in neem tree in the MP minister Prahlad Patel bunglow; Everyone is shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.