Astrology 2025: एक महिना तर वाया गेलाच पण पुढील ११ महिनेही 'या' राशींसाठी नसणार खास; पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 15:25 IST2025-02-03T15:20:01+5:302025-02-03T15:25:27+5:30
Astrology 2025: नवे वर्ष कसे जाणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता असते. तरी करता पाहता नवीन वर्षातला पहिला महिना उलटूनही गेला. या महिन्यात मोठ्या प्रमाणात ग्रह गोचर अर्थात ग्रहांचे स्थलांतर झाले आणि आगामी काळातही ते होणार आहे. हे स्थलांतर काही राशींसाठी सामान्य तर काहींसाठी लाभदायी ठरणार आहे. मात्र काही राशींच्या बाबतीत हे ग्रहमान अनुकूल नसल्याने त्यांना उर्वरित वर्ष फायद्याचे ठरणार नाही असे अनुमान ज्योतिष तज्ज्ञांनी काढले आहे. चांगले भाकीत नाही म्हणून ते जाणूनच घ्यायचे नाही अशी चूक करू नका.

भाकीत, भविष्य हे आपल्याला मिळणारे पूर्वसंकेत असतात. ज्याप्रमाणे हायवे वरून जाताना सावधान, पुढे घातक वळण आहे, असे फलक वाचता ते पाहून तुम्ही गाडी रिटर्न न घेता सावधपणे तो मार्ग पार करून जाता, त्याचप्रमाणे राशी भविष्य देखील आगामी मार्गावरील फलक आहेत असे समजा आणि शक्य तेवढ्या चुका टाळण्याचे प्रयत्न करा.
२०२५ मध्ये शनि, गुरू, राहू-केतू यांसारखे संथ गतीने चालणारे ग्रह स्थलांतरित होणार आहेत. म्हणजेच २०२५ हे असे वर्ष आहे, ज्यामध्ये ९ ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत मार्गक्रमण करतील आणि १२ राशींच्या जीवनावर मोठा प्रभाव टाकतील. खरं तर, शनि अडीच वर्षांत, राहू-केतू दीड वर्षांत आणि गुरू एका वर्षांत राशी बदलतो. गेल्या वर्षी २०२४ मध्ये, शनी आणि राहू-केतू यांनी आपली राशी बदलली नाही आणि या वर्षी या तीन महत्त्वाच्या ग्रहांच्या संक्रमणामुळे मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील राशींना अडचणींचा सामना करावा लागू शकतो, त्या राशींनी सर्वतोपरी सावध राहणे चांगले!
मेष -
शनीच्या संक्रमणाने मेष राशीवर शनीची साडे साती सुरू होईल. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या आर्थिक, मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. हॉस्पिटलमध्ये पैसे खर्च करतील. काही मोठी चिंता तुम्हाला सतावेल. आगामी काळ करिअरसाठीही विशेष चांगला म्हणता येणार नाही. आरोग्याकडे लक्ष द्या, छोट्या मोठ्या आजारांवर वेळीच उपचार करा. मन शांत ठेवा. योगाभ्यास आणि ईश्वर चिंतन करत आपले काम प्रामाणिकपणे करत राहा.
मिथुन -
या वर्षी मिथुन राशीचे लोक बोलण्यावर आणि क्रोधावर नियंत्रण सुटल्याने आपणच बेअब्रू होतील. याचा परिणाम त्यांच्या नोकरी व्ययवसायावर पडू शकतो. व्यक्तिमत्त्वाला डाग लागेल अशी कोणतीही चूक हातून होणार नाही याची काळजी घ्या. राग अनावर झाल्यास नाती दुरावतील, तुटतील. त्यामुळे रागाच्या भरात संयम सुटणार नाही याची काळजी घ्या. इष्ट देवतेचे चिंतन आणि योगाभ्यास याचा लाभ होऊ शकेल.
कर्क -
कर्क राशीच्या लोकांसाठी २०२५ हे वर्ष प्रेमात वितुष्ट आणणारे आणि वैवाहिक जीवनासाठी चांगले म्हणता येणार नाही. व्हॅलेन्टाईनच्या पार्श्वभूमीवर हे वाचणे नक्कीच त्रासदायक असू शकते. मात्र ग्रहस्थिती पाहता सतर्क राहणे चांगले. कुटुंबातअशांतता निर्माण होईल असे वागू नका. नकारात्मक विचारांमुळे खचल्यासारखे वाटू शकेल. अशा वेळी समजूतदारीने काम घ्या. प्रसंगी नमते घ्या आणि श्रद्धा, सबुरी ठेवा.
सिंह -
सिंह राशीच्या लोकांना या वर्षी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. उत्पन्नात घट किंवा नुकसान होऊन आर्थिक स्थिती बिघडू शकते.त्याचा परिणाम तुमच्या वैयक्तिक नात्यावर होऊ शकतो. संशयाच्या वाळवीने नाते पोखरले जाणार नाही याची काळजी घ्या. नवनवीन संधी येतील त्या ओळखा आणि लाभ घ्या. बोलून वाईटपणा न घेता संयम बाळगा.
मीन -
मीन राशीच्या लोकांना २०२५ मध्ये अनेक चढ उतार बघायला मिळतील. आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतील. मुलांची चिंता, अनावश्यक खर्च, नातेसंबंधात दुरावा यामुळे हताश झाल्यासारखे वाटू शकेल. अशा वेळी स्वतःची समजूत घाला. 'हे ही दिवस जातील', असे म्हणत आलेल्या परिस्थितीचा सामना करा. अशातच काही घटना मनासारख्या घडल्यामुळे उत्साह वाढेल, फक्त तो टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा.