1 / 8आपला प्रवास सुरक्षित, शुभ आणि सकारात्मक उर्जेने भरलेला हवा म्हणून भाविक आपल्या गाडीच्या डॅश बोर्डवर देवाची मूर्ती किंवा फोटो ठेवतात, जेणेकरून देवाचे आपल्यावर लक्ष राहील आणि त्याच्या आशीर्वादाने वाहन सुरक्षित राहील आणि प्रत्येक प्रवाससुखाचा होईल. पण तुम्हाला माहिती आहे का? की ज्योतिष शास्त्राने प्रवासासाठी मोजक्या देवतांची निवड करा असे सांगितले आहे. 2 / 8ज्योतिष शास्त्रानुसार, गाडीत देवाची मूर्ती ठेवण्याची परंपरा केवळ धार्मिक श्रद्धेशी संबंधित नाही तर त्यामागे ज्योतिष आणि मानसशास्त्रही जोडले आहे. हिंदू संस्कृतीत, देवाच्या आशीर्वादाने कोणतेही नवीन काम सुरू करणे शुभ मानले जाते. गाडी घेणे हे मोठे सुख आहे. त्यावर देवाची कृपा राहावी म्हणून त्यांना स्थानापन्न केल्याने मानसिकदृष्ट्या सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. देव पाठीशी आहे या विश्वासाने आध्यात्मिक बळ वाढते. 3 / 8गाडीत कोणत्या देवाची मूर्ती किंवा फोटो ठेवावा, हा प्रश्न अनेकदा लोकांच्या मनात येतो. ज्योतिष शास्त्रानुसार शुभ आणि सुरक्षित प्रवासासाठी वाहनात गणपती, हनुमान, शंकर, बालाजी आणि स्वामी समर्थ यांची मूर्ती ठेवणे चांगले. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया-4 / 8गणेशाला सुखहर्ता आणि विघ्नहर्ता म्हणतो. वाहन घेतले पण ते लाभलेच नाही तर काय उपयोग? त्यात सतत बिघाड होऊन चालणार नाही. यासाठी विनायकाला शरण जाऊन वाहनसुख लाभावे आणि प्रवासात येणारी विघ्नं दूर व्हावी अशी प्रार्थना करावी. 5 / 8हनुमानाला संकटमोचक म्हटले जाते. खुद्द श्रीकृष्णांनी अर्जुनाला महाभारताच्या युद्धात रथाच्या वर बसा म्हणून विनंती करा असे सांगितले होते. कारण कितीही आत्मघातकी शस्त्र आली तरी हनुमानाच्या कवचामुळे रथाचे नुकसान होऊ शकले नाही. याच भावनेने आपणही हनुमानाची प्रतिमा वा मूर्ती आपल्या गाडीच्या डॅश बोर्डवर लावून त्यांना विराजमान व्हा असे विनवू शकतो. 6 / 8महादेव ज्यांना आदियोगी म्हटले जाते. देवाधिदेव महादेव हे विश्वाचा संसार सांभाळून कायम शांतचित्त असतात. प्रवासात ती शांतता आपल्याही मनात उतरावी म्हणून शंकराची मूर्ती व प्रतिमा ठेवू शकता. 7 / 8बालाजी अर्थात पांडुरंग, अनेक लोक बालाजी किंवा विठ्ठल रुख्मिणीची प्रतिमा आपल्या गाडीच्या डॅशबोर्डवर लावतात. विठू माउली जशी भक्ताच्या रक्षणासाठी युगे अठ्ठावीस विटेवर उभी राहिली तशी आपल्या प्रवासात आपल्याही पाठीशी उभी राहावी ही त्यामागील भावना असते. 8 / 8भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे आश्वासक शब्द देणारे स्वामी प्रत्येक प्रवासात आपल्या सोबत असतील तर विघ्न येतीलच कशाला? म्हणून स्वामींची प्रतिमा वा मूर्ती डोळ्यासमोर ठेवावी आणि डॅशबोर्डवर लावावी.