शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' पाच राशीच्या लोकांशी वाद घालणे हे आगीच्या तोंडात हात घालण्यासारखे आहे!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 2:45 PM

1 / 5
फट म्हणता ब्रह्महत्या असा यांचा स्वभाव असतो. ते कोणाचेही ऐकून घेत नाहीत आणि आपणच वादाला तोंड फोडतात. राग राग, चिडचिड करून झाली की आपणच शांत होतात. पण रागाची परिस्थिती हाताळणे हे काम त्यांच्या आणि इतरांच्या हाताबाहेरचे असते. म्हणून यांच्या संपर्कात येणाऱ्यांनी आपणहून माघार घेणे शहाणपणाचे ठरते.
2 / 5
राशीच्या नावातच गुरगुरण्याचा स्वभाव आहे. रागाच्या भरात ते समोरच्याला फाडून खातील.आपले शब्द मागे घेणे यांना माहीतच नाही. चूक त्यांची असली, तरी ते आपलेच घोडे पुढे दामटवत असतात. रागाच्या भरात वाट्टेल ते बोलतात. आपल्या पेक्षा वयाने आणि हुद्द्याने कमी असलेल्या लोकांवर अधिकार गाजवतात. अनेकदा ते सूचक भाष्यही करून जातात. ज्यामुळे त्यांची पोटातली गोष्ट ओठावर येते.
3 / 5
या राशीचे लोक रागवतात खूप, पण राग व्यक्त करत नाहीत आणि विसरतही नाहीत. तो राग आपल्या मनात दीर्घकाळ ठेवतात. वेळप्रसंगी समोरच्यावर वचपा काढतात. त्यांना जे हवे ते प्राप्त करतात. काहीही चुकीचे झाले की यांचा राग आकाश पाताळ एक करतो. वरचेवर राग व्यक्त करत नसले, तरी जेव्हा करतात तेव्हा समोरच्याची धडगत राहत नाही. रागाच्या भरात ते आपल्या प्रिय व्यक्तीचा पाणउतारा करायलाही मागे हटत नाहीत
4 / 5
ही अग्नी तत्त्वाची रास आहे. रागाच्या भरात ते स्वतः सकट सर्वांचा विनाश करू शकतात. परंतु त्यांच्या बाबतीत एक गोष्ट चांगली आहे, की त्यांना शांत झाल्यावर आपल्या चुकीची जाणीव होते आणि ते आपली चूक मान्यदेखील करतात. म्हणून त्यांच्या संपर्कात जाताना रागाच्या क्षणी वादविवाद टाळावा आणि शांत झाल्यावर नीट समजूत काढावी!
5 / 5
या राशीचे लोक रागात सगळे काही गमावून बसतात. राग ही त्यांची सर्वात मोठी कमजोरी आहे. दुसऱ्यावर रागवल्याचा त्रास त्यांना स्वतःला जास्त होतो. हे लोक काम अतिशय जबाबदारीने करतात. परंतु रागामुळे त्यांच्यात नकारात्मक भावना जास्त असते. ही नकारात्मक ऊर्जा काम करण्यात खर्च झाली, तर त्याचा सकारत्मक परिणाम होऊ शकतो. या राशीच्या लोकांना बोलून, समजावून सांगितले असता, ते लवकर शांत होतात.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष