By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 07:07 IST
1 / 15April 2026 Monthly Astrology: २०२६ या वर्षाचा चौथा महिना सुरू होत आहे. एप्रिल महिन्यात अनेक शुभ योग, राजयोग जुळून येत आहेत. एप्रिल महिन्यात चार ग्रहांचे गोचर होणार असून, यामुळे चार महत्त्वाचे राजयोग जुळून येणार आहेत. विशेष म्हणजे नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रह दोन वेळा राशी परिवर्तन करणार आहे. 2 / 15०२ एप्रिल २०२६ रोजी नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला मंगळ ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. मीन राशीतील सूर्य, शनि यांच्याशी मंगळाची युती होणार आहे. त्यामुळे मंगल आदित्य राजयोग जुळून येत आहे. तर, १० एप्रिल २०२६ रोजी बुध ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. बुधाने मीन राशीत प्रवेश केल्यावर बुधादित्य राजयोग जुळून येणार आहे. तसेच मीन राशीत चतुर्ग्रही योग जुळून येणार आहे. तसेच ११ एप्रिल २०२६ रोजी नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनि मीन राशीत उदय होत आहे.3 / 15नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य ग्रह १४ एप्रिल २०२६ रोजी मेष राशीत प्रवेश करणार आहे. मेष ही सूर्याची उच्च रास मानली गेली आहे. या प्रवेशामुळे मेष संक्रांती सुरू होणार असून, शुक्राच्या युतीने शुक्रादित्य राजयोग जुळून येणार आहे. यानंतर शुक्र ग्रह आपल्या स्वराशीत म्हणजेच वृषभ राशीत १९ एप्रिल २०२६ रोजी प्रवेश करणार आहे. त्यामुळे मालव्य राजयोग जुळून येणार आहे. तर ३० एप्रिल २०२६ रोजी बुध दुसऱ्यांदा गोचर करून मेष राशीत प्रवेश करेल. या राशीत पुन्हा एकदा बुधादित्य राजयोग जुळून येईल. एकंदरीत ग्रहमान पाहता कोणत्या राशीवर कसा प्रभाव असेल? जाणून घेऊया...4 / 15मेष: आर्थिक प्रगतीचे उत्तम योग जुळून येऊ शकतात. संपत्ती, मालमत्ता आणि ऐषारामात वाढ होऊ शकते. धैर्य, नेतृत्वगुण आणि निर्णय क्षमता वाढेल, ज्यामुळे करिअरच्या नवीन संधी मिळतील. तसेच घाई आणि आक्रमकता वाढू शकते, ज्यामुळे नातेसंबंधांमध्ये ताण येऊ शकतो. आर्थिक लाभांसोबतच खर्चही झपाट्याने वाढू शकतो, त्यामुळे संतुलन राखणे आवश्यक आहे.5 / 15वृषभ: आकर्षण, व्यक्तिमत्व आणि यश जीवनात सर्वोच्च पातळीवर पोहोचू शकते. वैयक्तिक ओळख, करिअरमधील प्रगती आणि नातेसंबंधांच्या दृष्टीने हा काळ खूप महत्त्वाचा असेल. सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या गोष्टी घडू शकतील. परंतु अतिआत्मविश्वास अहंकारात बदलू शकतो. अति सुखसोयी आणि चैनीकडे असलेला कल ध्येयांपासून विचलित करू शकतो.6 / 15मिथुन: बुद्धी, संवाद कौशल्य आणि रणनीती मजबूत होईल. कामाच्या योजना यशस्वी होऊ शकतात. परदेशी किंवा बहुराष्ट्रीय उपक्रमांमधून फायदा मिळू शकतो. नाविन्यपूर्ण विचार आणि विश्लेषणात्मक क्षमता वाढू शकेल. अतिविचार आणि अतिविश्लेषणामुळे मानसिक ताणही येऊ शकतो. वाढलेला खर्च आणि अनावश्यक चिंता त्रास देऊ शकतात.7 / 15कर्क: नेटवर्किंग आणि सामाजिक विस्तार महत्त्वाचा ठरेल. सामाजिक वर्तुळ विस्तारून नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. मित्रांच्या माध्यमातून आर्थिक लाभही मिळू शकतो. परंतु, मित्रांसोबत अहंकाराचे संघर्ष किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतात. उत्पन्न वाढेल, पण खर्चही वाढेल.8 / 15सिंह: कारकीर्द आणि प्रतिष्ठा वृद्धिंगत होण्याचा हा काळ आहे. कर्मभाव सक्रिय होऊ शकेल. नेतृत्वाची संधी मिळू शकते. शासकीय किंवा प्रशासकीय कामात यश मिळेल. उच्च पदे आणि आदर मिळवून देऊ शकतो. राग, अधीरता आणि वरिष्ठांशी संघर्ष होऊ शकतो.9 / 15कन्या: नशिबाची उत्तम साथ लाभू शकते. ज्ञानात वाढ होईल. उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि प्रवासात यश मिळण्याची शक्यता आहे. हा काळ आध्यात्मिक आणि बौद्धिकदृष्ट्या उन्नत करेल. नियोजनात विलंब, कागदपत्रांच्या कामात अडथळे आणि निर्णय घेण्यामध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो.10 / 15तूळ: सखोल संशोधनामुळे रहस्ये गूढ गोष्टींचे ज्ञान मिळू शकेल. अनपेक्षित लाभ मिळतील. आर्थिक लाभ होऊ शकतो, परंतु हा लाभ फार काळ टिकणार नाही. मानसिकदृष्ट्या मजबूत होऊ शकाल. अनपेक्षित खर्च, आरोग्याच्या समस्या आणि तणाव येऊ शकतो. हा बदलाचा काळ आहे, जो सकारात्मक तसेच आव्हानात्मक असू शकतो.11 / 15वृश्चिक: भागीदारी आणि नातेसंबंधांमध्ये लक्षणीय परिवर्तन होऊ शकते. विवाह, व्यावसायिक भागीदारी आणि नवीन करारांना फायदा होईल. नातेसंबंध अधिक दृढ होऊ शकतात. जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल. परंतु, नातेसंबंधांमध्ये अहंकार आणि वादविवाद वाढू शकतात.12 / 15धनु: हा काळ काम आणि आरोग्य या दोन्हीसाठी महत्त्वाचा असेल. ऊर्जा आणि कार्यक्षमता वाढू शकेल. ज्यामुळे ध्येये अधिक वेगाने गाठू शकाल. कामाच्या ठिकाणी प्रतिमा मजबूत होऊ शकेल. कामाचा अतिरिक्त ताण, थकवा आणि किरकोळ आरोग्य समस्या उद्भवू शकतात.13 / 15मकर: प्रेम, सर्जनशीलता वाढू शकेल. मुलांचे सुख-समाधान लाभू शकेल. कला, माध्यम आणि सर्जनशील क्षेत्रांमध्ये यश मिळू शकेल. शिक्षण आणि बुद्धीला बळकटी मिळू शकेल. गैरसमज, भावनिक असंतुलन आणि घाईने घेतलेले निर्णय प्रेमसंबंधांमध्ये समस्या निर्माण करू शकतात.14 / 15कुंभ: हा काळ कुटुंब आणि संपत्तीशी संबंधित असेल. घरातील सुखसोयी आणि संपत्ती वाढेल. धनप्राप्तीची शक्यता निर्माण होऊ शकते. कौटुंबिक प्रतिष्ठा वाढेल. तथापि, घरात मतभेद, मानसिक तणाव आणि भावनिक अस्थिरता दिसून येऊ शकते.15 / 15मीन: संवाद, व्यवसाय आणि कौशल्ये अधिक मजबूत होतील. लहान व्यवसाय, विपणन आणि माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत फायदेशीर ठरेल. बोलणे आणि विचार लोकांना प्रभावित करतील. गैरसमज, घाईघाईत बोलणे आणि नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.