अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 17:25 IST2025-08-11T17:19:50+5:302025-08-11T17:25:34+5:30
Angarki Chaturthi 2025 Wishes in Marathi: १२ ऑगस्ट रोजी मंगळवारी श्रावणातली संकष्ट चतुर्थी आल्यामुळे अंगारक योग तयार होत आहे. जिला अंगारक संकष्ट चतुर्थी(Angarki Chaturthi 2025) म्हटले जाईल. या पार्श्वभूमीवर बाप्पाकडे आपल्या प्रियजनांसाठी सदिच्छा व्यक्त करताना पुढील शुभेच्छा संदेश वापरा आणि Whatsapp, Insta Status लाही ठेवा.

अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
बाप्पाचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर असावा, आणि तुमचा चेहरा सदैव हसरा दिसावा
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवो, सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
वंदितो तुज चरण आर्जव करतो गणराया, वरदहस्त असूद्या माथी, राहूद्या सदैव छत्रछाया, गणपती बाप्पा मोरया
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
सकाळ हसरी असावी, बाप्पाची मूर्ती समोर दिसावी, मुखी असावे बाप्पाचे नाव, सोपे होईल सर्व काम
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
पाहूनी ते गोजिरवाणं रूप, मोह होई मनास खूप, ठेवण्या तुज हाती मोदक प्रसाद होते सदैव दर्शनाची आस
Angarki Sankashti Chaturthi 2025 Status In Marathi
माझं आणि बाप्पाचं खूपच छान नातं आहे, जिथे मी जास्त मागत नाही, आणि बाप्पा मला कमी पडू देत नाही
Angarki Sankashti Chaturthi 2025 Wishes In Marathi
गजानन तू गणनायक असा विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक, तूच भरलास त्रिभुवनी अन् उरसी तूच ठायी ठायी, जन्मची ऐसे हजारो व्हावे, ठेविण्या मस्तक तूज पायी