१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ‘या’ ५ राशींवर गुरु-लक्ष्मी कृपा; धनलाभासह अपार यशाची संधी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 01:10 PM2023-04-26T13:10:19+5:302023-04-26T13:18:35+5:30

मेष राशीत जुळून आलेल्या गजलक्ष्मी राजयोग ५ लकी राशींना शुभ फलदायी ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या...

गुरु ग्रहाच्या मेष राशीतील प्रवेशामुळे अनेकविध योग जुळून आले आहेत. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. गुरुचा मेष राशीत झालेला प्रवेश अनेकार्थाने महत्त्वाचा मानला जात आहे. गुरुच्या प्रवेशामुळे मेष राशीत चतुर्ग्रही योग जुळून आला आहे.

आताच्या घडीला मेष राशीत गुरुसोबत सूर्य, बुध आणि राहु ग्रह विराजमान आहेत. मे महिन्याच्या मध्यापर्यंत चतुर्ग्रही योग कायम राहील, असे सांगितले जात आहे. मेष राशीसह गुरुने अश्विनी नक्षत्रातही प्रवेश केला आहे. अस्तंगत स्थितीत मेष राशीत प्रवेश केलेला गुरु एप्रिल महिन्याच्या अखेरीस उदयाला येत आहे. विशेष म्हणजे गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी गुरुदर्शन होणार आहे.

याशिवाय तब्बल १२ वर्षांनी गजलक्ष्मी योग जुळून येत आहे. गुरुच्या मेष प्रवेशानंतर हा योग जुळून आला आहे. याचा प्रभाव सर्वच राशींवर दिसून येणार आहे पण ५ अशा राशी आहेत ज्यांना गजलक्ष्मी योग भाग्योदयाचा अनुभव देऊ शकेल. येत्या काळात नेमक्या कोणत्या राशींना कशाप्रकारे लाभ होऊ शकतो, ते जाणून घ्या...

मेष राशीच्या व्यक्तींना गुरुचा गजलक्ष्मी राजयोग अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो. येत्या काळात धनलाभ होऊ शकतो.मान – सन्मानात वाढ होऊ शकते. आर्थिक आघाडीवर लाभ मिळण्याच्या अनेक संधी प्राप्त होऊ शकतील. आगामी काळात मेहनतीचे मोठे फळ लाभू शकते.

मिथुन राशीच्या व्यक्तींना गुरुचा गजलक्ष्मी राजयोग शुभ फलदायी सिद्ध होऊ शकतो. करिअरमध्ये मोठ्या प्रगतीची चिन्हे आहेत. पदोन्नती व पगारवाढ मिळू शकते. काही महत्त्वाची कामे हातातून जाऊ देऊ नका. स्थावर जमिनीचे व्यवहार करताना कागदपत्रे तपासून घ्या. घरातील काही महत्त्वाचे निर्णय घाईने घेऊ नका. उत्तम यश मिळू शकेल.

कर्क राशीच्या व्यक्तींना गुरुचा गजलक्ष्मी राजयोग अनुकूल ठरू शकेल. आगामी काळात नव्या व्यवसायाचा भाग होता येईल. यासाठी अत्यंत लाभदायक स्थिती तयार होऊ शकेल. वैवाहिक जीवनात आनंद येऊ शकतो. मनातील इच्छा पूर्ण होऊ शकतील. कामावर लक्ष केंद्रीत करून कार्यरत राहणे हिताचे ठरू शकेल.

सिंह राशीच्या व्यक्तींना गुरुचा गजलक्ष्मी राजयोग सकारात्मक ठरू शकेल. राहु-गुरुच्या गुरु चांडाळ योगाचा प्रभावही दिसून येऊ शकेल. वडिलोपार्जित संपत्तीचा पुरेपूर लाभ होऊ शकतो. आर्थिक स्रोत वाढू शकतात. चांगल्या कामातून पैसा मिळू शकतो.

मीन राशीच्या व्यक्तींना गुरुचा गजलक्ष्मी राजयोग अनुकूल ठरू शकेल. राशीस्वामी गुरु व सूर्याची युती समाजात यश मिळवून देऊ शकते. प्रगतीचे योग आहेत पण त्यासाठी आळस पूर्णपणे काढून टाकावा लागेल. कामात जोडीदाराच्या मदतीने यश मिळवू शकाल. शेअर बाजारात गुंतवणुकीतून पैसे कमावता येऊ शकतात, असे सांगितले जात आहे.

गुरुच्या मेष प्रवेशानंतर गुरु आणि राहुचा गुरु चांडाळ योग जुळून आला आहे. हा योग सुमारे ७ महिन्यांपर्यंत कायम राहणार आहे. या योगाचा प्रभाव सर्व राशींवर पडेल, असे सांगितले जात आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.