७ ग्रह एकाच रेषेत, महाकुंभमेळ्यात अद्भूत योग: ९ राशींना राजयोग, वरदान; शुभ-लाभ, चांगले घडेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 11:44 IST2025-01-22T11:44:00+5:302025-01-22T11:44:00+5:30
२०२५ मध्ये अनेक अद्भूत योग जुळून येत आहेत. असाच एक दुर्मिळ योग पुढील काही दिवसांत जुळून येत आहे. जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, विद्यमान घडीची ग्रहस्थिती अशी आहे की, हर्षल मेष राशीत, गुरू वृषभ राशीत आहे. मंगळ कर्क राशीतून २१ रोजी तो वक्री गतीने मिथुन राशीत विराजमान झाला आहे. केतु कन्या राशीत आहे. बुध धनू राशीत असून, २४ रोजी तो मकर राशीत जाईल. तेथे त्याची युती रवी आणि प्लूटो यांच्याशी होईल. शुक्र आणि शनी कुंभ राशीत आहेत. राहु आणि नेपच्यून मीन राशीत आहेत. यावर्षी १४४ वर्षांनी महाकुंभमेळा सुरू असताना ७ ग्रह एका रांगेत किंवा रेषेत येत आहेत. यामुळे हा महाकुंभ 'अमृत महाकुंभ' म्हणून ओळखला जाणार आहे.
२१ जानेवारी ते २८ फेब्रुवारी या काळात शुक्र, मंगळ, गुरू, शनि, युरेनस आणि नेपच्यून ग्रह याच ग्रहांसोबत एकाच रेषेत पाहायला मिळू शकतील. याला 'प्लॅनेटरी परेड' असे संबोधले जाते. या ग्रहांमध्ये मंगळ विशेषत: तेजस्वी होतो कारण तो थेट सूर्याच्या विरुद्ध स्थित आहे. शुक्र आणि शनि नैऋत्य दिशेला दिसतील. दक्षिण दिशेला गुरू आणि आग्नेय किंवा पूर्वेला मंगळ दिसून येईल. हे ग्रह इतर ताऱ्यांपेक्षा जास्त चमकतील आणि मंगळ लाल-केशरी बिंदूसारखा दिसेल. तर शुक्र आणि शनि जवळ असलेले दिसतील. हवेत प्रदूषण कमी असेल अशा रात्री हे दुर्मिळ दृष्य दुर्बिणीशिवाय पाहता येईल.
फेब्रुवारीच्या शेवटी सातवा ग्रह बुध या ग्रहांसोबत एकाच रेषेत येणार आहे. हे ग्रह हळूहळू वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर दिसू लागतील. तर, आगामी काळात बुधादित्य राजयोग जुळून येणार आहे. विद्यमान घडीची ग्रहस्थिती, ग्रहांची परेड आणि राजयोग यांचा कोणत्या राशींवर सकारात्मक प्रभाव पडू शकतो, ते जाणून घेऊया...
मेष: आगामी काळ सामान्य आहे. ज्या व्यक्ती नोकरी करत असून ती बदलण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा कालावधी प्रतिकूल आहे. व्यापार वृद्धी किंवा व्यापाराशी संबंधित कामे करण्यासाठी अनुकूल आहे. अचानकपणे राग येऊन नात्यात कटुता येऊ शकते. जर रिअल इस्टेटशी संबंधित एखादे मोठे कार्य करण्याचा प्रयत्न करत असाल तर एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला जरूर घ्यावा. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी काळ अनुकूल आहे.
वृषभ: भरपूर जोश व उत्साहाने कार्यरत राहू शकाल. मानसिक तणाव कमी करण्यासाठी एखाद्या ठिकाणी फिरावयास जाण्याची योजना आखू शकता. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्या व्यक्तींसाठी काळ प्रतिकूल आहे. व्यापाऱ्यांसाठी काहीसा त्रासदायी असू शकतो. फर्निचर, अध्ययन किंवा एखाद्या डिझाईन कार्यासाठी पैसा खर्च करू शकता. प्रेम जीवनात काही गैरसमज झाल्याने कटुता येण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. वैवाहिक जीवन सुखद होईल. वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात अत्यंत सुखद क्षण घालवू शकाल.
मिथुन: मागील काही दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत असलात तर त्यात पुढे जाण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. योग्यतेनुसार संधी मिळू शकते. व्यापाऱ्यांसाठी लाभदायी आहे. बाहेर कोठे फिरावयास जाणार असाल तर सर्व प्रथम प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. वाहन खरेदी करण्याची संधी मिळू शकते. परंतु, उत्साहित होऊन आर्थिक गुंतवणूक करणे टाळावे. सावध राहावे.
कर्क: नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळू शकते. परंतु, अधिक कामामुळे थकवा जाणवू शकतो. व्यापारात नवीन काही करण्याचा प्रयत्न करू शकता. एखादा चांगला सौदा करू शकता. शेअर्स बाजारात आर्थिक गुंतवणूक करण्याचा विचार करत असलात तर अति उत्साहित होऊन त्यात पैसे गुंतवू नका. कोणत्याही प्रकारचे कर्ज घेऊ इच्छित असाल तर थोडे सावध राहावे. एखाद्या जुन्या गोष्टीमुळे वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होऊ शकते. अशा वेळी शांत राहावे. शारीरिक तंदुरुस्तीसाठी दिनचर्येत बदल करण्याव्यतिरिक्त योगासने व ध्यान-धारणा करणे हितावह होईल.
सिंह: नोकरी करणाऱ्या व्यक्तींना जास्त मेहनत व परिश्रम करावे लागू शकतात. वरिष्ठांशी संबंधातील माधुर्य टिकवून ठेवण्यासाठी वागणुकीवर लक्ष ठेवावे लागेल. व्यापारी नवीन भागीदारी करू शकतात. परंतु, भागीदारीशी संबंधित कागदपत्रांची कामे लक्षपूर्वक करावीत. डोकेदुखी व पोटाशी संबंधित एखादी समस्या त्रस्त करू शकते. बाहेरील पदार्थ खाणे टाळावे. हौस-मौज करण्यावर अधिक खर्च करू शकाल. त्यामुळे पैशांची बचत करू शकणार नाही. शंकेखोर स्वभावामुळे व त्यावर नियंत्रण नसल्याने प्रेम संबंधात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी समन्वय साधण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
कन्या: नोकरी करणाऱ्या व्यक्तींना मेहनत व संघर्ष करावा लागू शकतो. व्यापाऱ्यांसाठी अत्यंत खुश होण्याचा काळ आहे. नवीन सौदा झाल्याने लाभ होऊ शकतो. हा आठवडा शेअर्स बाजारात किंवा सट्टा बाजारात गुंतवणूक करण्यासाठी सामान्य फलदायी आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपली शाळा किंवा महाविद्यालय बदलायचे आहे त्यांच्यासाठी काळ अनुकूल आहे. पूर्वीची प्रेमिका आपल्याकडे परत येण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात तोलून मापून बोलावे लागेल.
तूळ: आहारावर नियंत्रण ठेवावे. व्यापाऱ्यांना अपेक्षित कंत्राट मिळू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी काळ सामान्यच आहे. नोकरीत बदल करायचा असेल तर काळ अनुकूल नाही. आर्थिक स्थिती उत्तम राहिली तरी खर्च वाढणार आहेत. एखाद्या प्रॉपर्टीसाठी कर्ज घ्यावयाचे असेल तर त्यात यशस्वी व्हाल. वैवाहिक जीवनात नात्यात दुरावा येण्याची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने धैर्य बाळगावे लागेल. कोणतीही गोष्ट वैवाहिक जोडीदारापासून लपवून न ठेवण्याची दक्षता घ्यावी. विद्यार्थ्यांनी अभ्यासात कोणत्याही प्रकारे हयगय करू नये. उलट अपेक्षित यश प्राप्तीसाठी भरपूर मेहनत करावी. जे विद्यार्थी एखाद्या व्यावसायिक विषयाचा अभ्यास करू इच्छितात, त्यांना यश मिळू शकते.
वृश्चिक: व्यवसायासाठी अधिक उत्साहितपणे काम करू शकाल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींचे मन मात्र त्रासलेले राहील. अशा वेळी ज्या व्यक्ती नोकरी बदलू इच्छितात त्यांना तसे न करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. गृह सजावटीच्या वस्तू, कपडे व शिक्षणावर खर्च जास्त होऊ शकतो. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमणार नाही. त्यांचे मन बाहेरील विषयात जास्त रमेल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना मेहनत वाढवावी लागेल. प्रेमिकेशी कटुता निर्माण होऊ शकते. वैवाहिक जीवनात एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. अशा वेळी दोघांनी संवाद साधून समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करावा.
धनु: व्यवसायात चांगली उन्नती करू शकाल. ज्या व्यक्ती सौंदर्य प्रसाधनाशी संबंधित वस्तूंचा व्यवसाय करतात त्यांना चांगली अर्थ प्राप्ती होऊ शकेल. ज्यांना नोकरी बदलण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा काळ प्रतिकूल असल्याने त्यांनी सध्या शांत राहावे. विद्यार्थ्यांचे अभ्यासात विशेष असे लक्ष लागणार नाही. ते एखाद्या वादात अडकण्याची संभावना आहे. त्यांना एखाद्या नवीन विषयाचा अभ्यास करावयाचा असेल तर ते द्विधा मन:स्थितीत राहतील. एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. शेअर्स बाजारात आर्थिक गुंतवणूक करण्यास कालावधी प्रतिकूल आहे. वैवाहिक संबंध दृढ होतील.
मकर: नोकरी करणाऱ्यांसाठी अपेक्षेनुसार अनुकूल कालावधी नसेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर निर्णय काही दिवसांसाठी राखून ठेवा. उलट जेथे कार्यरत आहात तेथेच नोकरी चालू ठेवा. व्यापाऱ्यांसाठी काहीसा त्रासदायी काळ आहे. ज्यांना अर्धशिशीचा त्रास आहे त्यांचा त्रास उफाळून येण्याची शक्यता असल्याने त्यांनी विशेष काळजी घ्यावी. आर्थिकदृष्ट्या हा काळ अधिक खर्चिक ठरू शकतो. घरगुती वस्तू खरेदी करण्यासाठी पैसा खर्च करू शकता. काही कारणाने प्रेमिकेशी कटुता निर्माण झाल्याची जाणीव होऊ शकते. विवाहितांसाठी हा काळ चांगला आहे. वैवाहिक जोडीदारासह एखाद्या विषयावर सल्ला-मसलत करून मनातील भावना समक्ष व्यक्त करू शकाल.
कुंभ: नोकरी करणाऱ्या व्यक्ती सध्याच्या नोकरीत खूष नसतील व त्यामुळे त्यांना ती बदलावयाची असेल तर ते त्या दिशेने वाटचाल करू शकतात. त्यासाठी अनुकूल काळ आहे. एखाद्या प्रॉपर्टीत आर्थिक गुंतवणूक करावयाची असेल तर ती करू शकता. मात्र अशी गुंतवणूक करण्यापूर्वी एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्यावा. दिनचर्येत ध्यान - धारणा, योगासनांना प्राधान्य द्यावे. प्रेमिकेच्या सहवासात बराचसा रोमँटिक वेळ घालवू शकाल. प्रेमिकेसह बाहेर फिरावयास जाऊ शकता. वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप टाळण्याचा प्रयत्न करा, अन्यथा कटुता निर्माण होऊ शकते.
मीन: सध्याची नोकरी बदलू इच्छितात त्यांच्यासाठी कालावधी अनुकूल आहे. व्यापारी त्यांच्या व्यवसायाशी संबंधित एखादा मोठा निर्णय घेऊ शकतील. नियमितपणे योगासने करावीत. एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी पैसा खर्च करू शकता. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश प्राप्त होऊ शकते. प्रेमिकेच्या सहवासात रोमँटिक क्षण घालविण्याचा प्रयत्न कराल. दांपत्य जीवन सुखद होईल. वैवाहिक जोडीदारासह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकता. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.