५५९ वर्षांनी ७ नवपंचम राजयोग: १० राशींचा सुवर्णकाळ, अपार धनलाभ; भरघोस नफा, भाग्योदय-भरभराट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 15:51 IST2025-01-30T15:38:09+5:302025-01-30T15:51:56+5:30

नवपंचम योगामुळे शेअर बाजारात फायदा, नवीन नोकरीची ऑफर, पदोन्नती योग, उत्पन्नात वाढ, भौतिक सुख, अनेकविध शुभ लाभ प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जात आहे. तुमची रास आहे का यात? जाणून घ्या...

२०२५ हे वर्ष अनेकार्थाने अद्भूत ठरणारे आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व नवग्रह वेळोवेळी गोचर, राशी परिवर्तन करत असतात. ग्रहांच्या या भ्रमणामुळे अनेक प्रकारचे योग जुळून येत असतात. काही योग सकारात्मक असतात, तर काही योग प्रतिकूल परिणाम देणारे ठरू शकतात. ग्रहांच्या विविध राशींमधील गोचरामुळे अनेकदा राजयोग आणि नवपंचम योग जुळून येत असतात.

विविध प्रकारचे राजयोग किंवा नवपंचम योग यांचा परिणाम केवळ राशींवर नाही तर मानवी जीवनावर, देश आणि जगावर दिसून येतो. काही नवपंचम योग राजयोगाप्रमाणे फले देतात. काही दाव्यांनुसार, तब्बल ५५९ वर्षांनंतर ७ प्रकारचे नवपंचम योग तयार झाले आहेत.

नवग्रहांच्या १२ राशीतील स्थितीमुळे हे ७ नवपंचम योग जुळून आले आहेत. यामध्ये गुरु-केतू, मंगळ-शनि, मंगळ-शुक्र, बुध-गुरू, चंद्र आणि राहु असे ७ नवपंचम योग जुळून आले आहेत. हे सर्व ग्रह विविध राशींमध्ये स्थित आहेत. जसे गुरु वृषभ राशीत आहे, केतु कन्या राशीत आहे. राहु मीन राशीत आहे. मंगळ वक्री आहे.

हा ७ नवपंचम योग काही राशींसाठी सुवर्णकाळ सुरू होऊ शकतो. या राशींना अचानक धनलाभ, गुंतवणुकीतून फायदा, नोकरीत पदोन्नती, नवीन नोकरीची ऑफ, सुख-सौभाग्य, यश-प्रगती मिळण्याची शक्यता आहे. कोणत्या १० लकी राशी आहेत? जाणून घेऊया...

मेष: नवपंचम राजयोग फायदेशीर ठरू शकतो. पैशाच्या बाबतीत वेळ अनुकूल असेल. जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळू शकेल. नवीन योजनांमध्ये पैसे गुंतवू शकता. खर्च नियंत्रणात ठेवण्यात यश मिळू शकेल. मालमत्ता खरेदी करण्याची योजना आखू शकता. नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. पण रागावर थोडे नियंत्रण ठेवावे लागेल.

वृषभ: नवपंचम योगाची निर्मिती अनुकूल ठरू शकते. आर्थिक समृद्धता येऊ शकते नियोजित योजना यशस्वी होतील. नवीन नोकरीच्या ऑफर किंवा परदेशी प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकेल. कुटुंबात शांती आणि आनंदाचे वातावरण राहील. कामाच्या ठिकाणी प्रशंसा आणि पदोन्नती शक्य आहे. नवीन संधींमुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. व्यावसायिकांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो.

कर्क: नवपंचम योगाची निर्मिती अनुकूल ठरू शकते. उत्पन्न वाढू शकते. तसेच समाजात अधिक लोकप्रियता मिळू शकेल. मान आणि प्रतिष्ठा मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना बाजारात आपली पकड मजबूत करण्याची संधी मिळेल. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत विकसित होतील. शेअर बाजार किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करून नफा मिळू शकतो. नियोजित योजना यशस्वी होऊ शकतील.

सिंह: नवपंचम योगाच्या प्रभावामुळे कारकिर्दीत लक्षणीय यश मिळण्याची शक्यता आहे. नशिबाच्या साथीने सर्व अपूर्ण कामे पूर्ण होऊ शकतील. कुटुंबात सुख आणि शांतता कायम राहू शकेल. कामाच्या ठिकाणी प्रशंसा आणि पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. नवीन संधींमुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकेल.

कन्या: नवपंचम राजयोग खूप चांगला ठरू शकेल. बौद्धिक क्षमता वाढू शकेल. करिअरशी संबंधित उद्दिष्टे साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. बऱ्याच काळापासून एखाद्या कामावर करत असलेले कष्ट आता यशस्वी होऊ शकतात. आयुष्याबद्दल मोठा निर्णय घेऊ शकता. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप चांगला ठरू शकेल. करिअर सुरू करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला ठरू शकतो. जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट होऊ शकेल.

तूळ: तूळ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. नवपंचम योगामुळे या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ तसेच वैवाहिक जीवनात आनंददायी परिणाम मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीत केलेले काम यशस्वी होऊ शकेल. प्रेमसंबंध विवाहात रूपांतरित होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.

वृश्चिक: नवपंचम योग फायदेशीर ठरू शकतो. वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतो. कठोर परिश्रमाची आणि समर्पणाची दखल घेण्याची हीच वेळ आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. उत्पन्नात वाढ दिसून येईल. कामासाठी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता. जे शुभ लाभदायी ठरू शकतील.

धनु: नवपंचम योग अनुकूल ठरू शकतो. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. सर्व प्रकारच्या सुखसोयी आणि सुविधांचा आनंद घेऊ शकता. आयुष्यात भौतिक सुखाचा अनुभव घेऊ शकाल. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होऊ शकते. नशीबाची साथ मिळू शकेल. बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होऊ शकते.

मकर: नवपंचम योगांची निर्मिती शुभ ठरू शकते. या काळात करिअर आणि व्यवसायाशी संबंधित काही चांगल्या बातम्या मिळू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल. नवीन योजनांमध्ये पैसे गुंतवू शकता. खर्च नियंत्रणात राहू शकतील. काही लक्झरी वस्तू खरेदी करू शकता. तसेच या काळात कामाशी संबंधित प्रवास करू शकता. कार्यक्षेत्रात मान-सन्मान मिळू शकतो. आत्मविश्वासात वाढ होऊ शकते.

कुंभ: नवपंचम योग कुंभ राशीसाठी चांगला राहू शकेल. व्यवसायात वाढ होऊ शकते. योजना उपयुक्त ठरतील. करिअरमध्ये यश मिळवू शकता. कष्ट कमी होऊ देऊ नका आणि कोणत्याही गोष्टीचा अभिमान बाळगू नका. आत्मविश्वास वाढत राहू शकेल. हा काळ अनुकूल आहे. खर्चात वाढ होईल पण त्याचबरोबर उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता आहे. घर किंवा वाहन खरेदी करण्याच्या योजना फलदायी ठरू शकेल.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.