५०० वर्षांनी पंचग्रही समसप्तक राजयोग: ९ राशींचे कल्याण, लक्षणीय नफा-फायदा; पैसा-लाभ-सुबत्ता!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 07:07 IST2026-01-27T07:07:07+5:302026-01-27T07:07:07+5:30
February 2026 Panchgrahi Yog Astrology: फेब्रुवारी महिन्यात जुळून येणाऱ्या शुभ योगांचा अनेक राशींवर चांगला प्रभाव पडू शकतो, असे म्हटले जात आहे. तुमची रास आहे का यात? जाणून घ्या...

February 2026 Panchgrahi Yog Astrology: २०२६ वर्ष सुरू होताच अनेक शुभ योग, राजयोग जुळून आलेले आहेत. अनेक शतकांनीही अनेक अद्भूत, दुर्लभ योग जुळून येत आहेत. २०२६ मधील दुसरा फेब्रुवारी महिना सुरू होत आहे. फेब्रुवारी महिन्यात एका राशीत सुमारे साधारण ५०० वर्षांनी पंचग्रही लक्ष्मी नारायण योग जुळून येणार असल्याचे म्हटले जात आहे.

शनिचे स्वामित्व असलेल्या कुंभ राशीत पंचग्रही योग जुळून येणार आहे. फेब्रुवारी महिन्यात सूर्य, बुध, शुक्र, मंगळ आणि राहु यांचा पंचग्रही योग तयार होईल. हा युती योग यामुळे काही राशींना चांगले भाग्य मिळू शकते. नवीन नोकरी आणि चांगले आर्थिक लाभ होऊ शकतात, असे म्हटले जात आहे.

आताच्या घडीला मकर राशीत चतुर्ग्रही योग जुळून आलेला आहे. परंतु, कुंभ राशीत जुळून येणारा पंचग्रही योग विशेष मानला जात आहे. कारण या राशीत राहु विराजमान आहे. तसेच या सर्व ग्रहांचा सिंह राशीतील केतुशी समसप्तक योग जुळून येत आहे. कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घेऊया...

मेष: पंचग्रही योगाची निर्मिती अनुकूल ठरू शकते. या काळात उत्पन्न लक्षणीयरीत्या वाढू शकते. करिअरमध्ये प्रगतीची चिन्हे आहेत. या काळात काही चांगल्या बातम्या मिळू शकतात. काम स्थिर होईल. या काळात भविष्यातील योजना यशस्वी होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतूनही फायदा होईल. शेअर बाजार आणि लॉटरीमधून फायदा होऊ शकतो.

मिथुन: सकारात्मकता लाभू शकते. या काळात नशिबाची साथ लाभू शकेल. व्यवसायात फायदेशीर संधी मिळतील. तीर्थयात्रेला जाण्याची संधी मिळू शकते. या काळात एखाद्या धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील. जोडीदारासोबतचे नाते दृढ होईल. या काळात कुटुंबात आनंद आणि समृद्धी राहील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी यशस्वी होऊ शकतात.

कर्क: या काळात विवाहित जोडप्यांना एक उत्तम वैवाहिक जीवनाचा अनुभव मिळू शकेल. जोडीदाराची प्रगती होऊ शकते. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. वैयक्तिक विकास आणि आर्थिक बळकटी दोन्हीसाठी हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. या काळात व्यक्तिमत्व सुधारेल. या काळात अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.

सिंह: पंचग्रही योग फायदेशीर ठरू शकतो. या काळात वैवाहिक जीवन अद्भूत राहील. प्रशासकीय, सरकारी किंवा राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना महत्त्वपूर्ण फायदे मिळू शकतात. या काळात कामाच्या ठिकाणी पकड मजबूत होईल. अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. या काळात इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.

कन्या: व्यावसायिकांच्या उत्पन्नात झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे. बऱ्याच काळापासून प्रयत्न करत असलेल्या प्रकल्पात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. या काळात आर्थिक लाभाची संधी मिळेल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते. अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक: या काळात भौतिक सुखसोयींचा अनुभव येऊ शकतो. सकारात्मकता लाभू शकते. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात. नेतृत्वाची करण्याची संधी मिळू शकते. या काळात नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन ओळख मिळू शकते. या काळात सासू-सासऱ्यांशी संबंध मजबूत राहू शकतील.

मकर: हा काळ फायदेशीर ठरू शकतो. वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतात. आर्थिक परिस्थिती सुधारेल. दीर्घकाळापासून सुरू असलेले प्रकल्प हळूहळू गती घेतील. कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळू शकतात किंवा कर्ज फेडण्याची शक्यता असेल. बोलण्याचा प्रभाव वाढू शकेल. लोक प्रभावित होतील. काम किंवा व्यवसाय मार्केटिंग, भाषण, बँकिंग आणि मीडियाशी संबंधित असेल तर लक्षणीय नफा मिळू शकेल.

कुंभ: पंचग्रही योगाची निर्मिती फायदेशीर ठरू शकते. या काळात आत्मविश्वास वाढेल. आदर आणि प्रतिष्ठा मिळेल. या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन उत्तम राहील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. या काळात आर्थिक लाभाचे नवीन मार्गही उघडतील. दीर्घकाळ अडकलेले काम मार्गी लागू शकेल. इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.

मीन: या काळात उत्पन्न वाढू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये गुंतवणूक केल्याने फायदा होऊ शकतो. काही जण नवीन कौशल्य, भाषा शिकू शकतात किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मशी जोडले जाऊ शकतात. या काळात प्रेमसंबंधांमधील गैरसमज दूर होतील. मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

















