1 / 9चातुर्मास सुरू झाला आहे. आषाढी एकादशीनंतर सृष्टीचे पालनकर्ते श्रीविष्णू योगनिर्देत जातात, अशी मान्यता आहे. कार्तिकी एकादशीपर्यंत सृष्टीच्या पालनाची जबाबदारी महादेव शिवशंकर यांच्यावर असते, असे मानले जाते. या काळात विविध व्रत-वैकल्ये, महत्त्वाचे सण-उत्सव यांची रेलचेल असते. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनेही या काळात अनेक शुभ, तर काही अशुभ योग जुळून येत आहेत. 2 / 9चातुर्मास सुरू होताच ४ ग्रह वक्री होणार आहेत. पुढील काही दिवसांत शनि आणि बुध वक्री होत आहेत. तर राहु आणि केतु आधीपासूनच अनुक्रमे कुंभ आणि सिंह राशीत वक्री चलनाने गोचर करत आहेत. ७२ वर्षांनी असा योग जुळून आल्याचा दावा केला जात आहे. शनि वक्री होत असल्याने विपरीत योग जुळून आल्याचे म्हटले जात आहे. 3 / 9शनि आणि राहु-केतु हे अतिशय प्रभावी ग्रह मानले जातात. शनि मीन राशीत असून, कुंभ, मीन आणि मेष यांची साडेसाती सुरू आहे. याच मीन राशीत शनि वक्री होत आहे. ४ ग्रह वक्री होणे आणि शनिचा विपरीत योग कोणत्या ५ राशींना अतिशय शुभ, लाभदायक ठरू शकतो? जाणून घेऊया...4 / 9वृषभ: या काळात उत्पन्न वाढू शकते. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि पगारवाढ मिळू शकते. संबंध सुधारण्यासाठी आणि नवीन संबंध सुरू करण्यासाठी अनुकूल असेल. व्यवसाय भागीदारीत नफा होईल. वैवाहिक जीवन चांगले होईल. समाजात अधिक लोकप्रिय होऊ शकाल. आदर आणि प्रतिष्ठा मिळू शकेल.5 / 9मिथुन: हा काळ फायदेशीर ठरू शकते. काम आणि व्यवसायात विशेष प्रगती मिळू शकते. कामाच्या ठिकाणी यश आणि नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. व्यवसायात नवीन करार किंवा भागीदारीतून नफा होऊ शकेल. आर्थिक स्थिती सुधारू शकेल. या काळात व्यावसायिक त्यांचा व्यवसाय वाढवू शकतात. नियोजित योजना यशस्वी होऊ शकतील. इच्छा पूर्ण होऊ शकेल.6 / 9कर्क: वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन चांगले असेल. अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. व्यावसायिक भागीदारीत नफा होू शकेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात नवीन उंची गाठू शकाल. आत्मविश्वास वाढू शकेल. संवाद कौशल्य सुधारेल. पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकाल. इच्छा पूर्ण होऊ शकेल.7 / 9मकर: आगामी काळ शुभ ठरू शकतो. बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते. व्यक्तिमत्त्वात सुधारणा करण्याचा आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढवण्याचा काळ आहे. करिअरमध्ये नवीन कामगिरी साध्य होऊ शकेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात यश मिळेल. व्यावसायिकांसाठी हा काळ नफा मिळविण्याचा आणि नवीन योजना राबवण्याचा आहे. या काळात आदर आणि प्रतिष्ठा मिळू शकते. या काळात पैसे वाचवू शकता.8 / 9मीन: एखाद्या समस्येतून मुक्तता मिळू शकते. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकेल. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव मिळू शकतात. व्यवसायात विस्तार आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात इच्छा पूर्ण होऊ शकतात. बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते. नोकरीत पदोन्नती, नवीन जबाबदाऱ्या किंवा व्यवसायात यश मिळू शकते. तसेच, या काळात धैर्य आणि शौर्य वाढू शकेल.9 / 9- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.