३ दिवस गजकेसरी-गजलक्ष्मी राजयोगांचा महासंयोग: ११ राशींचा भाग्योदय, पद-पैसा-धनलाभ; शुभ घडेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 06:03 IST2025-08-18T06:03:02+5:302025-08-18T06:03:02+5:30

Gajakesari Gajalakshmi Rajyog August 2025: कोणत्या तीन दिवसांत अत्यंत शुभ राजयोगांचा दुर्मिळ महासंयोग जुळून येणार आहे? कोणत्या राशींना सर्वोत्तम लाभ, भरभराट, वैभव-ऐश्वर्य, सुख-सुबत्ता लाभू शकेल? जाणून घ्या...

Gajakesari Gajalakshmi Rajyog August 2025: ऑगस्ट महिन्याचा उत्तरार्ध सुरू झाला आहे. अतिशय शुभ मानल्या गेलेल्या श्रावण महिन्याची सांगता होत आहे. या कालावधीत अनेक शुभ योग, राजयोग जुळून येत आहेत. यामध्ये दोन शुभ पुण्य फलदायी राजयोगांचा महासंयोग जुळून येत आहे. तीन दिवस हे शुभ योग असणार आहेत. या दुर्मिळ लाभदायक राजयोगांचा काही राशींना अपार लाभ मिळू शकतो, असे म्हटले जात आहे.

Gajakesari Rajyog August 2025: १८ ऑगस्ट २०२५ ते २० ऑगस्ट २०२५ या तीन दिवसांत गजलक्ष्मी आणि गजकेसरी असे दोन अद्भूत राजयोग जुळून येत आहेत. सोमवार, १८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ०२ वाजून ३९ मिनिटांनी चंद्र मिथुन राशीत प्रवेश करेल. २० ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ०६ वाजून ३५ मिनिटांपर्यंत चंद्र मिथुन राशीत असेल. मिथुन राशीत शुक्र आणि गुरु हे दोन्ही ग्रह विराजमान आहेत.

Gajalakshmi Rajyog August 2025: चंद्र ग्रहाच्या प्रवेशानंतर मिथुन राशीत त्रिग्रही गजकेसरी गजलक्ष्मी राजयोग जुळून येत आहेत. तीन दिवस हे योग कायम असतील. याच कालावधीत शेवटचा श्रावण सोमवार, शेवटचा श्रावण मंगळवार, शेवटचा श्रावण बुधवार, अजा एकादशी, प्रदोष असणार आहे. श्रावणातील शुभ व्रते, एकादशी, प्रदोष तसेच तीन असणारा शुभ गजकेसरी गजलक्ष्मी योग कोणत्या राशींना सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट आणि सुवर्ण संधींचा ठरू शकेल, ते जाणून घेऊया...

मेष: चंद्राचे धनस्थानापासून ते पंचम स्थानापर्यंत होणारे भ्रमण आपल्याला लाभदायक ठरेल. मालमत्तेची कामे, व्यवसायात भरभराट, घरातील कार्ये, प्रवास या दृष्टीने चांगली फळे मिळतील. घर घेऊ इच्छिणाऱ्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी अनुकूल परिस्थिती राहील. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. व्यवसायात योजनांना चालना मिळेल. मात्र, गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी. त्या दृष्टीने सोमवार, मंगळवार, बुधवार थोडे तावून सुलाखून निर्णय घ्यावे. नोकरीत महत्त्व वाढेल.

वृषभ: शुभ फळे मिळतील. प्रेमात असणाऱ्यांनी सावधपणे वागण्याची गरज आहे. कुणी तुम्हाला मोहाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करील. मंगळवारपासून महत्त्वाच्या घटना, घडामोडी घडतील. धनलक्ष्मीची कृपा राहील. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. व्यवसायात भरभराट होईल. घरातील वृद्धांची काळजी घ्यावी.

मिथुन: सुरुवाला थोडी दगदग होईल. लोकांना आश्वासने देऊन शब्दांत अडकू नका. प्रवासात सतर्क राहा. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. मंगळवारपासून परिस्थिती आटोक्यात येईल. अडचणी दूर होतील. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. विवाहेच्छूसाठी अनुकूल काळ आहे. चांगल्या स्थळांचे प्रस्ताव समोर येतील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे.

कर्क: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. सुरुवातीला एखादी अनपेक्षित चांगली संधी मिळेल. त्यातून प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. मित्र-मैत्रिणींच्या भेटी होतील. पैशाची आवक चांगली राहील. चैन, हौस-मौज यांत पैसा खर्च केला जाईल. काहींना तीर्थयात्रा करण्याचे योग येतील. चांगले अनुभव येतील. मनात नावीन्यपूर्ण कल्पना विकसित होतील. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तू मिळतील. जीवनसाथीशी सूर जुळतील. वडीलधाऱ्या मंडळींचा मान राखा.

सिंह: भेटीगाठी फलद्रूप होतील. ग्रहमानाची अनुकूलता अनुभवायला मिळेल. महत्त्वाची कामे बुधवारच्या आत हातावेगळी कराल तर फायद्यात राहाल. दगदग होणार नाही. नोकरीत नवीन संधी मिळेल. एखाद्या नवीन प्रकल्पासाठी मोठ्या उत्साहाने कामे कराल. लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. सोमवार, मंगळवार, बुधवार धनलक्ष्मीची कृपा राहील. जुनी येणी वसूल होतील. हाती आलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवा. पण, खर्चावर नियंत्रण ठेवा.

कन्या: चंद्राचे होणारे भ्रमण शुभ फळे देणारे ठरेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. थोरामोठ्यांच्या सहवासात याल. त्यामुळे अडलेली कामे मार्गी लागतील. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. समाजात महत्त्व वाढेल. नोकरीत नवीन व मोठी संधी मिळेल. पगारवाढ मिळेल. धनलक्ष्मी प्रसन्न राहील. भेटवस्तू प्राप्त होतील. कायद्याची बंधने पाळा.

तूळ: विविध आघाड्यांवर तुम्हाला घवघवीत यश मिळेल. थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. चंद्रभ्रमण काळात वाहन जपून चालवा. नको त्या भानगडीत पडू नका. अचानक धनलाभ होऊ शकतो. पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल. सामाजिक मान-सन्मान मिळेल. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. परीक्षांचा निकाल मनासारखा लागेल. नोकरीत पगारवाढ, बढती, अशी फळे मिळतील.

वृश्चिक: कालावधी अनुकूल राहील. सुरुवातीला संयमाने वागण्याची गरज आहे. जीवनसाथीशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. प्रेमात असणाऱ्यांनी सावधपणे वागण्याची गरज आहे. कुणी आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रयत्न करील. अचाट साहस करण्याच्या फंदात पडू नका. एखाद्या सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल. कामाची लोकांकडून प्रशंसा केली जाईल. कार्यक्षेत्रात गोडीत वागा.

धनु: काही कटू तर काही गोड अनुभव येतील. अनेक उत्तम लाभ होतील. प्रत्येक बाबतीत आपल्या मनासारखे झाले पाहिजे, असा अट्टहास करू नका. सुरुवातीला काही अडचणी असतील. आरोग्याची काळजी घ्यावी. विरोधकांना उत्तरे देण्याचा वेळ दवडू नका. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. व्यवसायात भरभराट होईल. प्रेमात असणाऱ्यांना भेटवस्तू मिळतील. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. अचानक धनलाभ होऊ शकतो.

मकर: काही बाबतींत यश मिळेल, तर काही बाबतींत थोडा भ्रमनिरास होईल. सफलता मिळाली तरी हुरळून जाऊ नका. थोडे सबुरीचे वागण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. परीक्षांचा निकाल मनासारखा लागण्याची शक्यता आहे. नवीन प्रवेश घेण्याचा निर्णय जाणकारांशी चर्चा करून घ्यावी. अवास्तव अपेक्षा बाळगून चालणार नाही. योजना लोकांना सांगत बसू नका. काही लोक विरोधात कारवाया करतील. चांगले अनुभव येतील. विवाहेच्छुकांसाठी अनुकूल काळ आहे.

कुंभ: महत्त्वाची कामे करून घ्यावी. नोकरीत अचानक मोठी संधी मिळेल. त्यातून फायदा होईल. नवीन ओळखी होतील. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. त्यांचे हट्ट पुरवावे लागतील. सामाजिक मान-सन्मान मिळेल. संयम बाळगण्याची गरज आहे. योजना गुप्त ठेवा. आरोग्याची काळजी घ्यावी. प्रवासात सतर्क राहा. जीवनसाथीशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

मीन: प्रतिष्ठा वाढेल. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. मात्र, आर्थिक निर्णय जपून घेतले पाहिजेत. कुणी चुकीची माहिती देऊन आर्थिक नुकसान करू शकते. भावंडांच्या भेटीगाठी होतील. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी नावाचा विचार केला जाईल. पगारवाढ व सोयी-सुविधा वाढवून मिळतील. घरात मंगल कार्याचे आयोजन केले जाईल. मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. सामाजिक मान-सन्मान मिळेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.