२०२५चा पहिला गजकेसरी योग: ७ राशींची भरभराट, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; बंपर लाभ, सर्वोत्तम काळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 15:16 IST2025-01-09T14:59:12+5:302025-01-09T15:16:20+5:30

गजकेसरी योग काही राशींसाठी सुखाचा, समाधानाचा आणि सकारात्मक अनुकूलता देणारा ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या...

सन २०२५ ची सुरुवात झाल्यापासून अनेकविध शुभ योग, राजयोग जुळून येत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच व्रत-वैकल्ये, सणांची सुरुवातही झाली आहे. २०२५ या वर्षातील पहिली एकादशी पौष महिन्याच्या शुद्ध पक्षातील पुत्रदा एकादशी १० जानेवारी रोजी आहे. तर ११ जानेवारी रोजी यंदाचे पहिले प्रदोष व्रत आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार २०२५ वर्ष अनेकार्थाने विशेष आणि अनन्य साधारण ठरणारे आहे. चंद्र आणि गुरु यांच्या युतीने गजकेसरी योगाची निर्मिती होते. २०२५ मध्ये ०९ जानेवारी रोजी हा योग जुळून येत आहे. पुढील दोन दिवस म्हणजेच ११ जानेवारी पर्यंत हा योग राहणार आहे.

गजकेसरी योगाचा चांगला, सकारात्मक, अनुकूल प्रभाव काही राशींवर पडणार आहे. अनेक बाबतीत हा काळ शुभ-लाभाचा, सुखाचा ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. मेष ते मीन या सर्व राशींवर कसा असेल प्रभाव? जाणून घेऊया...

मेष: आत्मविश्वासात वाढ होऊ शकेल. उत्साह आणि ऊर्जा कायम राहू शकेल. नशिबाची साथ लाभू शकेल. सुख-समृद्धीचा अनुभव घेता येऊ शकेल.

वृषभ: आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल. नेतृत्व कौशल्य सुधारू शकेल. कोणतेही काम करताना थोडी काळजी घेणे खूप महत्त्वाचे ठरेल.

मिथुन: संवाद कौशल्य वेगाने वाढू शकते. यासोबतच सर्जनशीलता देखील वाढू शकते.

कर्क: अचानक यश मिळू शकते. कुटुंबासोबत वेळ चांगला जाऊ शकेल.

सिंह: गजकेसरी योग हा एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही हे सिद्ध होईल. नोकरी आणि व्यवसायात मोठे फायदे मिळू शकतात. व्यक्तिमत्व सुधारण्याचा प्रयत्न करणे हिताचे ठरेल.

कन्या: गुरु आणि चंद्राच्या युतीमुळे निर्माण होणारा गजकेसरी योग भाग्य उजळवणार ठरू शकेल. स्वतःकडे अधिक लक्ष देऊ शकतील.

तूळ: थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात मतभेद होऊ शकतात. अशा परिस्थितीत धीर धरणे खूप महत्त्वाचे ठरू शकेल.

वृश्चिक: अचानक आर्थिक लाभासह प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. एका बाजूला आक्रमकपणा आणि दुसर्‍या बाजूला एकाकीपणाची भावना निर्माण होऊ शकते.

धनु: जीवनात सकारात्मकता वाढेल. शिक्षण क्षेत्रात बरेच फायदे मिळू शकतात. आईकडून पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकाल.

मकर: अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.

कुंभ: गजकेसरी योग खूप फायदेशीर ठरू शकतो. सर्जनशीलता वाढेल. आईचे पूर्ण आशीर्वाद मिळतील.

मीन: गजकेसरी योगात काही विशेष बदल दिसू शकतो. भावंडांसोबत वेळ चांगला जाईल. यश मिळवू शकता. अनेक लोकांसाठी प्रेरणास्त्रोत बनू शकता. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.