१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 21:52 IST2025-09-29T21:40:51+5:302025-09-29T21:52:39+5:30

Hans Mahalakshmi Rajyoga October 2025: आगामी काळात विविध प्रकारचे ५ ते ६ राजयोग जुळून येत आहेत. या राजयोगांचा काही राशींना वरदान काळासारखा लाभ मिळू शकतो, असे म्हटले जात आहे. जाणून घ्या...

Hans Mahalakshmi Rajyoga October 2025: आगामी काही काळात अनेक प्रकारचे राजयोग, शुभ योग जुळून येत आहेत. नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ तूळ राशीत आहे. चंद्र आणि मंगळ या दोन ग्रहांच्या युतीने महालक्ष्मी राजयोग जुळून येत आहे. तसेच काही दिवसांनी नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य तूळ राशीत प्रवेश करणार आहे.

सूर्य आणि मंगळ या दोन ग्रहांच्या युतीने आदित्य मंगल राजयोग जुळून येत आहे. तसेच मीन राशीत असलेल्या शनिचा केंद्र त्रिकोण राजयोग जुळून येत आहे. काही दिवसांनी नवग्रहांचा गुरू बृहस्पति म्हणजेच गुरू ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहे.

कर्क ही गुरूची उच्च रास मानली जाते. त्यामुळे हंस राजयोग जुळून येत आहे. तर मंगळाच्या स्वराशीतील प्रवेशाने रुचक नामक राजयोग जुळून येत आहे. १०० वर्षांनी असे योग जुळून येत असल्याचे म्हटले जात असून, या ग्रहस्थितीचा आगामी काळात कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल, ते जाणून घेऊया...

मेष: मंगळ आणि गुरु ग्रहाच्या शुभ संयोगामुळे कौटुंबिक जीवनात शांती आणि सौहार्द येईल. या काळात आर्थिक परिस्थिती सुधारेल. वाहन किंवा घर खरेदी करण्याची शक्यता आहे. नवीन लोक भेटतील आणि त्यांच्याकडून फायदा होण्याची शक्यता आहे. घरात आनंद येईल. या काळात विद्यार्थ्यांनाही यश मिळेल.

मिथुन: या काळात वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी प्रभाव वाढेल. आर्थिक लाभाची संधी मिळेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. वैवाहिक जीवन आनंदी राहू शकेल. जोडीदाराचीही प्रगती होऊ शकते. या काळात अधिक लोकप्रिय व्हाल. वडिलोपार्जित व्यवसायातून नफा मिळण्याची शक्यता आहे. मेहनतीचे फळ मिळेल. नवीन संधी उपलब्ध होतील.

कर्क: महालक्ष्मी राजयोग अनुकूल ठरू शकतो. सुखसोयी आणि विलासिता वाढू शकते. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. पदोन्नती किंवा पगारवाढीची संधी मिळू शकते. कुटुंबासोबत संस्मरणीय वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल, ज्यामुळे बचत वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता असेल.

कन्या: या काळात वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतात. आर्थिक परिस्थिती सुधारेल. कामातील अडथळे दूर होतील. कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची योजना आखू शकता. व्यावसायिकांना त्यांचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. या काळात पैसे कमविण्याच्या नवीन संधी निर्माण होतील.

वृश्चिक: व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल राहील. कठोर परिश्रम योग्य परिणाम देतील. लॉटरीपासून दूर राहावे. परंतु शेअर बाजारातील गुंतवणूक लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. मान-सन्मान वाढू शकेल. संशोधन क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ चांगला ठरू शकतो.

धनु: या काळात उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत सापडू शकतात. आर्थिक परिस्थिती सुधारेल. गुंतवणुकीमुळे फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. भांडवली गुंतवणुकीमुळे नफा मिळू शकतो. संधींचा फायदा घेण्यात यशस्वी व्हाल. शेअर बाजार, आणि लॉटरीमधून फायदा होऊ शकतो.

मकर: काम आणि व्यवसायात लक्षणीय प्रगती होऊ शकते. नवी नोकरी मिळू शकते. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. शेअर बाजार किंवा मालमत्तेशी संबंधित निर्णय फायदेशीर ठरतील. समाजात तुमचा आदर वाढेल. दीर्घकाळापासून रखडलेले काम पुन्हा एकदा वेग घेऊ शकेल. परदेशी व्यापार, नोकरी किंवा गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. अचानक आर्थिक लाभ शक्य आहे. आत्मविश्वास आणि ऊर्जा वाढेल. कौटुंबिक जीवन आनंदी होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ मोठा नफा मिळवून देऊ शकतो.

मीन: धार्मिक कार्यात आवड वाढू शकेल. मानसिक शांतता लाभू शकेल. संपत्ती वाढेल. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. जे लोक बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना यश मिळू शकते. जीवनाच्या अनेक क्षेत्रात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन समस्या सोडवल्या जातील. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि उत्साही वाटेल. मन आनंदी असेल आणि सामाजिक आदर, मान-सन्मान वाढेल. परंतु, कोणत्याही गोष्टीत घाई करणे टाळणे महत्त्वाचे आहे. अन्यथा नुकसान होऊ शकते.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.