उन्हाळ्यात रात्री अशी घ्या तुमच्या त्वचेची काळजी By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 6:04 PM
1 / 6 आपण उन्हाळ्यात दिवसा त्वचेची काळजी घेतोच, पण रात्रीही त्वचेची काळजी घेणं तितकंच महत्वाचं असतं. उन्हाळ्यात त्वचेला जास्त हानी होते म्हणून रात्रीच्या वेळी काळजी घेणं महत्वाचं असतं. 2 / 6 १) चेहरा साबणाने धुण्यापेक्षा फेसवॉशने धुवा. त्यामुळे चेहरा टवटवीत दिसेल. 3 / 6 २) चेहऱ्यावर मुरूमं असल्यास बेसनाचं पीठ किंवा लिंबू चोळा. जेणेकरून उष्णतेचा त्रास होणार नाही. 4 / 6 ३) रात्री झोपताना किमान एक ग्लास पाणी किंवा लिंबू सरबत प्या. जेणेकरून तुम्हाला झोपही व्यवस्थित लागेल व सकाळी उत्साह राहील. 5 / 6 ४) उष्णतेचा त्रास जास्त होत असल्यास रात्री झोपताना फळे खा. 6 / 6 ५) त्वचेवर कमीत कमी क्रिम्स लावा, जेणेकरून तुमच्या त्वचेला हानी होणार नाही. आणखी वाचा