केस पिकले म्हणून काय झालं?; मिलिंद सोमनकडून घ्या फॅशन अ‍ॅन्ड ब्युटी टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 04:45 PM2019-09-25T16:45:24+5:302019-09-25T16:48:58+5:30

भारतातील सर्वात प्रसिद्ध मॉडल्सपैकी एक म्हणजे, मिलिंद सोमन. वयाची पन्नाशी पार केल्यानंतरही भल्या भल्या नवख्या मॉडल्सलाही मिलिंद आपल्या पर्सनॅलिटिने फक्त महिलाच नाहीतर तरूणींनाही भूरळ पाडतो. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे, फिटनेस, त्याती एथलेटिक बॉडी, फिजीक आणि त्याची स्टाइल. अशातच जर तुमचे केस आणि दाढी थोडी-थोडी पांढरी होत असेल तर तिला अजिबात कलर करू नका. आपल्या काळ्या आणि पांढऱ्या मिक्स्ड सॉल्ट अॅन्ड पेपर लूक असणारे केस आणि दाढीसोबत कसा लूक कॅरी करायचा हे मिलिंद सोमनकडून शिकू शकता.

सध्या मेसी लूक फार ट्रेन्डमध्ये आहे. फक्त मुलीच मेसी चोटी किंवा मेसी बन हेअर स्टाइल फॉलो करत नाहीत तर मुलं आणि पुरूषही मेसी आणि स्पाइक्स असणारा लूक ट्राय करू शकतात. यासाठी तुम्ही मिलिंद सोमनकडून टिप्स घेऊ शकता. आपल्या स्टाइलला पूर्ण कॉन्फिडन्ससोबत कॅरी करावं. त्यामुळे लूक आणखी क्लासी दिसतो.

आपल्या पांढरी आणि काळी मिक्स्ड केसं अन् दाढीसोबत तुम्हाला आणखी स्मार्ट आणि हॅन्डसम हंक दिसण्याची इच्छा असेल तर शेड्ससोबतही एक्सपरिमेंट करू शकता. ट्रान्सपरंट चश्मा असो किंवा ब्लॅक शेड्स किंवा मग रेड शेड्स तिनही लूक मिलिंद सोमनवर फार सुंदर दिसतात.

तुम्हाला गरज असेल तर मेसी केस असणाऱ्या लूकला स्टायलिश ज्यूट हॅट सोबत टिमअप करू शकता. त्यामुळे लूक आणखी स्मार्ट दिसेल.

जर केसांसोबत दाढीही पांढरी दिसत असेल तर दररोज शेव्ह करून क्लीन शेव्ह लूक ट्राय करण्याऐवजी मिलिंद सोमनला फॉलो करू शकता. हा लूकही फार ट्रेन्डमध्ये असून तुम्ही फुल बियर्ड ठेवू शकता.

जर तुम्हाला मोठे केस आवडत नसतील तर तुम्ही मिलिंद सोमनकडून टिप्स घेऊन बज कट हेयर स्टाइल लूक ट्राय करू शकता. छोटे केस असणाऱ्या या सॉल्ट अॅन्ड पेपर लूकमध्येही फार हॅन्डसम लूक मिळण्यास मदत होते.

जर तुम्हाला बियर्ड लूक आवडत नसेल आणि क्लीन शेव्ह लूक कॅरी करायचा असेल तर तुम्ही मिलिंद सोमनप्रमाणे केस सॉल्ट अॅन्ड पेपर लूकमध्ये ठेवा आणि दाढी-मिशा काढून टाका. हा लूकही फार क्लासी दिसतो.