टुथपेस्टसोबत 'या' गोष्टी त्वचेवर लावाल, तर ब्लीच, फेशियल करणंच विसरून जाल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 11:43 IST2020-03-05T11:21:59+5:302020-03-05T11:43:56+5:30

सगळ्यांच्याच घरी टुथपेस्टचा वापर दात साफ करण्यासाठी केला जातो. त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी सुद्धा टुथपेस्टचा वापर केला जातो. तुम्ही युट्यूबवर अनेक असे व्हिडीओ पाहिले असतील ज्यात टुथपेस्टचा वापर करून चेहरा. आणि ओढ सुंदर करण्यासाठी प्रयत्न केले जातात.

आज आम्ही तुम्हाला त्वचेवरील डाग घालवण्यासाठी टुथपेस्टचा वापर कसा करायचा याबाबत सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया कसा करायचा टुथपेस्टचा वाप

सुरकुत्या घालवण्यासाठी- जर तुमच्या त्वचेवर सुरकुत्या असतील तर दोन चमचे दुधात टुथपेस्ट मिसळून त्वचेवर लावा. हा पॅक सुकल्यानंतर चेहरा धुवून टाका. असे केल्यास त्वचेत फरक दिसून येईल.

डार्क स्पॉट घालवण्यासाठी- जर तुमच्या त्वचेवर काळे डाग असतील तर १ चमचा टुथपेस्टमध्ये २ चमचे लिंबाचा रस घाला. मग आपल्या त्वचेला लावा. त्यानंतर काळीवेळानंतर धुवून टाका सतत दोन आठवडे हा प्रयोग केल्यास फरक दिसून येईल. पिंपल्सवर सुद्धा जर तुम्ही टुथपेस्टचा वापर केला तर त्वचा चांगली राहील.

त्वचा उजळदार होण्यासाठी- पैसे खर्च न करता जर तुम्हाला स्वतःचा चेहरा चांगला करायचा असेल तर टुथपेस्टमध्ये काही थेंब टॉमॅटोचा रस घालून मिसळा. नंतर आपल्या त्वचेला हे मिश्रण लावा. सुकल्यानंतर पाण्याने चेहरा धुवून टाका.

ज्या टुथपेस्टमध्ये triclosan नाही त्याचा वापर अॅक्नेवर केल्यास कोणताच परिणाम दिसणार नाही. म्हणून तपासून मगच अप्लाय करा.

किडा चावल्यानंतर -जळलेल्या स्कीन पासून वाचण्यासाठी किडा चावल्यानंतर आग होण्यापासून वाचण्यासाठी टुथपेस्टचा वापर करा.

ऑईली स्कीन- टुथपेस्ट तेलकट त्वचेला सुंदर बनवण्यासाठी फायदेशीर असतं. त्यासाठी टुथपेस्टमध्ये मीठं आणि पाणी घाला. मग चेहरा स्वच्छ धुवून टाका.

टुथपेस्टमध्ये triclosan हे अॅन्टी बॅक्टेरियल असतात. त्यामुळे अॅक्नेचा त्रास वाढवणार्या बॅक्टेरियांना नष्ट करण्यास मदत होते.

गुलाबी ओठांसाठी- जर तुमचे ओठ रोजच्या प्रदुषणामुळे आणि सतत लिपस्टिक लावल्यामुळे काळे झाले असतील तर टुथपेस्ट ओठांना घासा. त्यामुळे ओठांचा काळपटपणा दूर होईल.

















