शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आश्चर्य...या आगळ्या वेगळ्या विमानाच्या पंखांमध्ये बसून करता येणार हवाई सफर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2019 9:06 AM

1 / 6
डच एअरलाईन्स केएलएमने डेल्फ युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीसोबत मिळून एक व्ही आकाराचे विमान तयार केले आहे. हे विमान दिसायला जवळपास गिब्सन गिटारसारखे दिसते. या विमानाला फ्लाईंग व्ही असे नाव देण्यात आले आहे. या विमानाची खास बाब म्हणजे प्रवासी विमानाच्या पंखांमध्ये बसून प्रवास करू शकणार आहेत.
2 / 6
या विमानाचा आकार पारंपरिक विमानांपेक्षा वेगळा आहे. यामुळे हे विमान मोठ्या प्रमाणावर इंधन बचत करते. वजनाने हलके आणि एरोडायनामिक आकारामुळे लांब पल्ल्याचा प्रवास कमी खर्चात करता येणार आहे. हे विमान 20 टक्के इंधन वाचविते.
3 / 6
या फ्लाईंग व्ही विमानाच्या आराखड्यामागे टीयू बर्लिनचा विद्यार्थी जस्टस बेनाड याची कल्पना आहे. त्याने 2015 मध्ये या विमानाचे डिझाईन तयार केले होते.
4 / 6
केएलएम एअरलाईन्सनुसार हे विमान आकाराने भलेही एअरबस ए 350-900 छोटे आणि हलके असले तरीही हे विमान ए 350 एवढेच सामान आणि प्रवासी घेऊन जाऊ शकते. आतील डिझाईन जसे की सीट, बाथरूम आणि अन्य वस्तू वजनाने हलक्या बनविण्यात आल्या आहेत.
5 / 6
या विमानामध्ये एयरबस ए350 ची झलक पाहायला मिळते. या विमानामध्येही 213 फूट लांब पंख आहेत. मात्र, त्यांची जाडी जास्त आहे. यामुळे या पंखामध्ये बसायला जागा दिलेली आहे. व्ही शेप असला तरीही हे विमान कोणत्याही विमानतळाची धावपट्टी, जागा सहज वापरू शकते.
6 / 6

टॅग्स :airplaneविमान