सध्या Bikes मध्ये Diesel Engine का वापरले जात नाही? 'हे' आहे कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 05:48 PM2023-10-03T17:48:32+5:302023-10-03T17:53:49+5:30

Motorcycles: पूर्वी काही बाईकमध्ये डिझेल इंजिन दिले जायचे, पण आता फक्त पेट्रोल इंजिन दिले जाते.

Why Bike Does Not Use Diesel Engine: बाईक-मोपेडमध्ये पेट्रोल इंजिन असते. यात डिझेल इंजिन का दिले जात नाही, याचा तुम्ही कधी विचार तुम्ही कधी केला आहे का? एक काळ असा होता, जेव्हा डिझेल इंजिन बाईक बाजारात उपलब्ध होत्या. पण, नंतर बाईकमधून डिझेल इंजिन काढून टाकण्यात आले आणि फक्त पेट्रोल इंजिनच्या बाईक बनवल्या जाऊ लागल्या. बाईकमध्ये डिझेल इंजिन न वापरण्याची अनेक कारणे आहेत.

आकार आणि वजन-डिझेल इंजिन, पेट्रोल इंजिनपेक्षा आकारने मोठे असतात. बाईक छोटे वाहन आहे. त्यामुळे बाईकमध्ये डिझेल इंजिन योग्य प्रकारे बसवणेही एक आव्हान आहे. याव्यतिरिक्त, डिझेल इंजिन पेट्रोल इंजिनपेक्षा जड असतात, ज्यामुळे बाइकच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

निर्मिती आणि कॉम्प्रेशन-पेट्रोल इंजिनपेक्षा डिझेल इंजिन अधिक जटिल आहेत. त्यांना बनवण्याचा खर्चही जास्त आहे, त्यामुळे बाइकची किंमतही वाढणार. याशिवाय, डिझेल इंजिनचे कॉम्प्रेशन रेशो जास्त आहे, ज्यामुळे ते अधिक कंपन आणि अधिक आवाज निर्माण होतो.

देखभाल-डिझेल इंजिन जास्त दाबाने काम करते, त्यामुळे डिझेल इंजिनमध्ये बिघाड होण्याचा धोका जास्त असतो. अशा स्थितीत पेट्रोल इंजिनच्या तुलनेत डिझेल इंजिनला जास्त देखभाल करावी लागते. यामुळे बाइकचा मेंटेनन्स खर्च वाढू शकतो.

परफॉरमन्स-डिझेल इंजिन पेट्रोल इंजिनपेक्षा जास्त टॉर्क जनरेट करतात, परंतु त्यांचा आरपीएम कमी असतो. त्यामुळे ज्या बाईकमध्ये हाय स्पीड किंवा जास्त परफॉर्मन्स आवश्यक आहे, जास्त RPM आणि पॉवर आवश्यक आहे, अशा स्थितीत डिझेल इंजिने चांगली कामगिरी करू शकत नाही.

प्रदूषण-डिझेल इंजिन पेट्रोल इंजिनपेक्षा जास्त प्रदूषण करते, ज्यामुळे हे इंजिन पर्यावरणासाठी हानिकारक आहे. त्यामुळेच आताच्या गाड्यांमध्ये डिझेल इंजिन वापरले जात नाही.