सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 12:07 IST2025-06-19T12:01:30+5:302025-06-19T12:07:45+5:30

Vida VX2 Electric Scooter: लवकरच हीरो मोटोकॉर्पची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर Vida VX2 लॉन्च होणार आहे.

Vida VX2 Electric Scooter Features: हीरो मोटोकॉर्पचा इलेक्ट्रिक ब्रँड Vida पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याचे कारण म्हणजे कंपनीची नवीन बजेट इलेक्ट्रिक स्कूटर- Vida VX2, जी 1 जुलै 2025 ला लॉन्च होणार आहे. विशेष म्हणजे, या स्कूटरला नवीन सब्सक्रिप्शन मॉडेल, Battery-as-a-Service (BaaS) सोबत आणले जाईल.

काय आहे BaaS मॉडेल? Battery-as-a-Service (BaaS) मॉडेल एक अशी सिस्टीम आहे, ज्यामध्ये ग्राहक स्कूटरची बॅटरी खरेदी करण्याऐवजी भाड्याने घेऊ शकतात. हे मोबाईल डेटा किंवा गॅस सिलेंडर रिफिल करण्यासारखे आहे. या मॉडेलचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, यामुळे Vida VX2 स्कूटरची किंमत लक्षणीयरीत्या कमी होईल आणि ग्राहक त्यांच्या गरजेनुसार अनेक बॅटरी सबस्क्रिप्शन प्लॅनपैकी कोणताही एक निवडू शकतील.

संभाव्य प्लॅन्स- Vida VX2 च्या संभाव्य सबस्क्रिप्शन प्लॅनमध्ये दररोज ऑफिस किंवा कामावर जाणाऱ्यांसाठी "डेली कम्युटर प्लॅन", अधूनमधून स्कूटर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी "वीकेंड प्लॅन" आणि दररोज लांब अंतराचा प्रवास करणाऱ्या आणि जास्त मायलेजची आवश्यकता असलेल्या रायडर्ससाठी "अनलिमिटेड प्लॅन"चा समावेश असेल.

डिझाइन आणि फिचर्स- Vida VX2 चे डिझाइन आणि फिचर्स Vida Z कॉन्सेप्टवर आधारित आहेत. याला पहिल्यांदाच EICMAयेथे सादर करण्यात आली होती. VX2 ही विडा V2 पेक्षा स्वस्त आहे. ही विशेषतः बजेट फ्रेंडली ग्राहकांसाठी डिझाइन केलेली आहे. यात अनेक रंग पर्याय, हलकी आणि कार्यक्षम बॅटरी पॅक असेल.

याची बॉडी डिझाइन साधी पण आकर्षक असेल. तसेच, त्यात एक मिनी टीएफटी डिस्प्ले असेल, जो स्कूटरला स्मार्ट टच देईल. ही विडाची आतापर्यंतची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर असेल.

बुकिंग आणि डिलिव्हरी- बुकिंग आणि डिलिव्हरीबद्दल Hero MotoCorp ने सांगितले की, Vida VX2 ची बुकिंग आणि डिलिव्हरी लॉन्च झाल्यानंतर सुरू होईल. लॉन्च झाल्यानंतर याला देशातील प्रमुख शहरांमध्ये उपलब्ध केले जाईल.

किससे होगा मुकाबला? Vida VX2 ची स्पर्धा बजाज चेतक 3001, ओला S1 एअर, एथर 450S आणि TVS iQube (बेस वर्जन) सारख्या लोकप्रिय बजेट इलेक्ट्रिक स्कूटर्ससोबत असेल. ही स्कूटर ग्राहकांना परवडणारी किंमत, बॅटरी सबस्क्रिप्शन सुविधा आणि हिरो ब्रँडची विश्वासार्हता यामुळे एक उत्तम पर्याय असेल.