Mahindra XUV700 चे दोन नवीन व्हेरिएंट आले समोर, 7 ऑक्टोबरपासून होणार बुकिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 09:21 PM2021-10-05T21:21:04+5:302021-10-05T21:27:09+5:30

Mahindra XUV700 : महिंद्रा XUV700 मध्ये कंपनीने 2.0 लिटर mStallion पेट्रोल इंजिन दिले आहे.

Mahindra ने आपल्या आगामी SUV महिंद्रा XUV700 चे दोन नवीन व्हेरिएंट लाँच केले आहेत. हे व्हेरिएंट कंपनीने डिझेल इंजिन ऑप्शनसह लक्झरी सेगमेंटमध्ये आणले आहेत. याबद्दल जाणून घ्या ...

कंपनीने डिझेल इंजिनमध्ये महिंद्रा XUV700 AX7 Luxury आणली आहे. हे महिंद्रा XUV700 चे 7-सीटर मॉडेल असणार आहे आणि कंपनीने ते मॅन्युअल ट्रान्समिशन आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन या दोन्ही व्हेरिएंटमध्ये ऑफर केले आहे. त्याचे ऑटोमेटिक ट्रांसमिशन मॉडेल AWD (All Wheel Drive) सह येईल.

महिंद्रा XUV700 च्या या मॉडेल्समध्ये AX7 च्या स्टँडर्ड फीचर्ससह फीचर्सचा एक लक्झरी पॅक मिळेल. जसे की यात सोनीचा 3D साउंड, इलेक्ट्रिकल डोअर हँडल, 360-डिग्री साराऊंड व्ह्यू, ड्रायव्हरसाठी गुडघ्याचे एअर बॅग आणि डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डिंग सारखी अनेक फीचर्स असतील.

कंपनीने गेल्याच आठवड्यात महिंद्रा XUV700 च्या विविध व्हेरिएंट आणि मॉडेल्सच्या किंमती जाहीर केल्या होत्या. आता डिझेल इंजिन महिंद्रा XUV700 AX7 Luxury MT आणि महिंद्रा XUV700 AX7 Luxury AT ची किंमत अनुक्रमे 19.99 लाख आणि 22.89 लाख रुपये असणार आहे.

महिंद्रा XUV700 चे बुकिंग 7 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. कंपनीने 14 ऑगस्ट रोजी आपली एसयूव्ही रिव्हिल केली आणि लवकरच त्याची अधिकृत लॉन्चिंग केली जाईल. सणासुदीच्या काळात कंपनीला सर्वोत्तम बुकिंग मिळण्याची अपेक्षा आहे.

महिंद्रा XUV700 मध्ये कंपनीने 2.0 लिटर mStallion पेट्रोल इंजिन दिले आहे. हे जास्तीत जास्त 197bhp ची पॉवर आणि 380Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. तसेच, यामध्ये 2.0 लीटर mHawk डिझेल इंजिन पर्याय देखील आहे. हे जास्तीत जास्त 153bhp ची पॉवर आणि 420Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.