'या' चुका कराल तर ड्रायव्हिंग लायसन्स होईल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 16:15 IST2019-07-23T16:02:38+5:302019-07-23T16:15:25+5:30

वाहन चालवताना काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. काही जण वाहतुकीच्या नियमांचे पालन करत नाहीत. मात्र अशा काही चुका या महागात पडू शकतात. ड्रायव्हिंग लायसन्स जप्त होऊ शकतं.
मोठ्या आवाजात म्युझिक
गाडीमध्ये मोठ्या आवाजात म्युझिक लावल्यास दंड होऊ शकतो. आवाजाचा त्रास इतर वाहन चालकांना झाल्यास लायसन्स जप्त होऊ शकतं.
स्पीड लिमिट
रस्त्यावर अनेकजण वेगाने गाड्या चालवतात. यामुळे अपघातही होतात. काही ठिकाणी स्पीड लिमिटचा बोर्डही लावण्यात आलेला आहे. वेग मर्यादा ओलांडल्यास लायसन्स जप्त होऊ शकतं.
गाडी चालवताना फोनचा वापर
गाडी चालवताना फोनचा वापर केल्यास दंड भरावा लागतो. कायद्यानुसार चालक नेव्हिगेशन सर्व्हिसशिवाय इतर कोणत्याही कामासाठी मोबाईलचा वापर करू शकत नाही.
ब्लूट्थच्या माध्यमातून बोलणे
अनेकजण कार चालवताना ब्लूट्थच्या माध्यमातून संवाद साधत असतात. मात्र असं केल्यास दंडासोबतच ड्रायव्हिंग लायसन्सही जप्त होऊ शकतं.
फुटपाथवर गाडी चालवणे
ट्रॅफिक असल्यास अनेकजण फुटपाथवर गाडी चालवतात. मात्र असं केल्यास वाहतुकीच्या नियमांचा भंग आहे. फुटपाथवर गाडी चालवल्यास लायसन्स जप्त होऊ शकतं.
सार्वजनिक रस्त्यावर रेस
सार्वजनिक रस्त्यावर रेस चालवल्यास ड्रायव्हिंग लायसन्स जप्त होऊ शकतं.
रुग्णवाहिकेला रस्ता न दिल्यास
रुग्णवाहिकेतून प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांना नेण्यात येते. त्यामुळे रुग्णवाहिकेला रस्ता न दिल्यास ड्रायव्हिंग लायसन्स जप्त होऊ शकतं.