Mercedes-Benz EQS 580: १५ मिनिटांत चार्ज करून ३०० किमी रेंज, मसाज सीट्स; लाँच झाली लक्झरी Electric Car

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2022 01:55 PM2022-10-01T13:55:14+5:302022-10-01T13:59:30+5:30

Mercedes-Benz EQS 580: पुण्यात ही कार तयार होणे ही देशासाठी सन्मानाची बाब आहे. अधिकाधिक कंपन्या कार बनवण्यासाठी आणि या हरित क्रांतीचा एक भाग बनण्यासाठी येथे येत असल्याचं मत गडकरी यांनी व्यक्त केलं.

जर्मनीची लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेंझने मेक इन इंडिया योजनेअंतर्गत पुण्यात (भारत) बनवलेली पहिली सर्वात आलिशान लक्झरी इलेक्ट्रीक कार सादर केली आहे. या कारची खास गोष्ट म्हणजे ही कार पुण्यातच तयार करण्यात आली असून जर्मनीबाहेर हे पहिले ठिकाण आहे जिथे कारचं उत्पादन करण्यात आले आहे.

भारतीय बनावटीच्या या लक्झरी इलेक्ट्रीक कारमध्ये (EQS 580) ड्युअल इलेक्ट्रीक मोटर्ससह 107.8kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. हे इंजिन 523 पीएस पॉवर आणि 855 एनएम टॉर्क जनरेट करते.

EQS 580 फक्त 15 मिनिटांच्या जलद चार्जमध्ये जवळपास 300 किमी पर्यंती रेंज देते. तर फुल चार्जवर ही कार 857 किमी (ARAI प्रमाणित) इतकी रेज देते. त्याच वेळी, ही कार केवळ 4.3 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग पकडण्यास सक्षम आहे.

याशिवाय ही कार ताशी 210 किमी वेगाने धावू शकते. मर्सिडीज-बेंझ लक्झरी इलेक्ट्रीक कारमध्ये कंपनीने सुरक्षेकडे विशेष लक्ष देत 9 एअरबॅग्ज दिल्या आहेत. या मर्सिडीज-बेंझ लक्झरी इलेक्ट्रिक कारमध्ये कंपनीने सुरक्षेकडे विशेष लक्ष देत 9 एअरबॅग्ज दिल्या आहेत.

या कारची किंमत 1.55 कोटी (एक्स-शोरूम) आहे. ही कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत लाँच करण्यात आली. "पुण्यात या कारची निर्मिती होणे हा देशासाठी सन्मान आहे आणि अधिकाधिक कंपन्यांनी कारच्या उत्पादनासाठी येथे यावे आणि या ग्रीन रेव्होल्यूशनचा एक भाग व्हावे अशी आमची इच्छा आहे," असे गडकरी म्हणाले.

या इलेक्ट्रीक कारच्या फीचर्समध्ये ड्रायव्हर आणि प्रवासी यांच्यासाठी स्क्रीनसोबत एक सेंट्रल डिस्प्ले स्क्रीन देण्यात आला आहे. यात एक हेड अप डिस्प्ले, बुर्मेस्टर ऑडिओ सिस्टम आणि लक्झरी कार असल्यामुळे मसाज सीटसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

मर्सिडिज बेंझची ही चौदावी कार आहे ज्याचं उत्पादन भारतात करण्यात आलं आहे. भारतात याच्याशिवाय Maybach आणि S-Class luxury limousines, GLS, GLE आणि GLA SUVs, C-, E- आणि S-Class sedans, आणि AMGs या कार्सचं उत्पादन करण्यात आलंय.