दमदार इंजिन अन् डॅशिंग लुक; Royal Enfield ची बहुचर्चित 'शॉटगन 650' लॉन्च, पाहा Photos...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 06:09 PM2023-12-13T18:09:25+5:302023-12-13T18:18:18+5:30

Royal Enfield ने त्यांची बहुचर्चित-बहुप्रतिक्षित Shotgun 650 बाईक विक्रीसाठी लॉन्च केली आहे.

Royal Enfield Shotgun: देशातील तरुणांमध्ये Royal Enfield च्या गाड्यांची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळते. आता कंपनीने त्यांची बहुचर्चित Shotgun 650 बाईक लॉन्च केली आहे. यापूर्वी कंपनीने लिमिटेड मोटोव्हर्स एडिशन लॉन्च केले होते. आता कंपनीने याचे इतर एडिशनही विक्रीसाठी लॉन्च केले आहे. या दोन्ही बाईकमध्ये फक्त कलरचा फरक होता.

कंपनीची ही दमदार शॉटगन 650 cc बाईक कंपनीच्या इंटरसेप्टर 650, कॉन्टिनेंटल जीटी 650 आणि सुपर मेटिअर 650 लाइन-अपमध्ये सामील झाली आहे. या बाईकसह 650 सीसी सेगमेंटमधील हे कंपनीचे चौथे मॉडेल ठरले आहे. शॉटगन 650 आणि Super Meteor 650 मध्ये काही बाबींमध्ये साम्य असले तरी या बाईक अगदी वेगळ्या दिसतात.

कंपनीने 2021 मध्ये EICMA मोटर शोमध्ये 'SG65' नावाने या बाईकचे कॉन्सेप्ट मॉडेल दाखवले होते. तेव्हापासून प्रॉडक्शन रेडी मॉडेल बनण्यापर्यंत बाईकमध्ये बरेच बदल झाले आहेत. मात्र, बाईकची फ्रेम, लूक आणि डिझाइन बऱ्याच अंशी सारखेच आहे. सिंगल सीट बॉबर स्टाइल बाईक म्हणून ही बाईक लॉन्च करण्यात आली आहे. या बाईकला डबल सीटमध्येही बदलले जाऊ शकते.

240 kg शॉटगन 650 वजनाच्या बाबतीत सुपर मेटियर पेक्षा जवळपास 1 किलो हलकी आहे. याशिवाय ही बाईक Meteor पेक्षा थोडी लहानदेखील आहे. सीटची उंची जास्त असली तरी, सुपर मेटिअरमध्ये तुम्हाला सीटची उंची 740 मिमी मिळते, तर शॉटगनमध्ये सीटची उंची 795 मिमी आहे. याशिवाय, याचे फुट पेग्स मधोमध दिले आहेत, ज्यामुळे चालकाला एक चांगली रायडिंग पोझिशन मिळते.

कंपनीने Shotgun 650 मध्ये पॅरलल-ट्विन 648 cc इंजिन वापरले आहे, जे 47hp पॉवर आणि 52.3Nm टॉर्क जनरेट करते. यात समोर 320 mm डिस्क ब्रेक आणि मागील चाकात 300 mm डिस्क ब्रेक आहे. याशिवाय, अप-साइड-डाऊन (USD) फोर्क सस्पेन्शन आणि प्री-लोडेड अॅडजस्टेबल ड्युअल शॉक सस्पेन्शनदेखील मिळतात.

या बाइकमध्ये एलईडी हेडलाइट, ट्रिपर नेव्हिगेशन आणि ड्युअल-चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) आहे. रॉयल एनफील्ड लॉन्चच्या वेळी शॉटगन 650 चार रंगांच्या पर्यायांमध्ये मिळेल. यात स्टॅन्सिल व्हाइट, प्लाझ्मा ब्लू, ड्रिल ग्रीन आणि शीटमेटल ग्रेचा समावेश आहे. यामध्ये तुम्हाला 13.8 लीटरची इंधन टाकी मिळेल, जी सुपर मेटिअरपेक्षा जवळपास 2 लीटर लहान आहे.

कंपनीने अद्याप या बाईकची किंमत जाहीर केली नाही, पण ही बाईक जवळपास 3.4-3.5 लाख रुपये (एक्स-शोरूम) च्या बेस प्राईसवर लॉन्च केली जाऊ शकते. याची किंमत Super Meteor 650 पेक्षा कमी असेल, अशी अपेक्षा आहे. Shotgun 650 च्या Motoverse Edition ची सुरुवातीची किंमत 4.35 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे, ज्याची डिलिव्हरी जानेवारी 2024 पासून सुरू होईल.