टूरिंग प्रेमींसाठी Royal Enfield आणतेय नवीन ‘पॉवर बीस्ट’, मिळणार तब्बल 750cc चे इंजिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 19:47 IST2025-10-11T19:44:15+5:302025-10-11T19:47:11+5:30

पुढील महिन्यात होणाऱ्या EICMA 2025 मध्ये या बाईकचे सादरीकरण होईल.

रॉयल एनफिल्डच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. कंपनीची बहुप्रतिक्षित हिमालयन 750 लॉन्चसाठी सज्ज झाली आहे. सध्या या बाईकचे टेस्टिंग सुरू असून, टेस्टिंगदरम्यान अनेकदा ही बाईक स्पॉट झाली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रॉयल एनफिल्ड येत्या EICMA 2025 (6 ते 9 नोव्हेंबर, मिलान, इटली) मध्ये हिमालयन 750 सादर करणार आहे. याआधीच्या EICMA 2024 मध्ये कंपनीने क्लासिक 650, बिअर 650, आणि पहिली इलेक्ट्रिक बाईक फ्लाइंग फ्ली C6 दाखवली होती. EICMA नंतर, रॉयल एनफिल्ड गोवा मोटोवर्स (21-23 नोव्हेंबर) या इव्हेंटमध्येही या बाईकचे अनावरण करण्याची शक्यता आहे.

हिमालयन 750 ही सध्याच्या हिमालयन 450 चे अपग्रेडेड व्हर्जन असेल. या नवीन बाईकचा स्टान्स अधिक रुंद आणि एकूण डिझाईन अधिक “अॅडव्हेंचर टुरिंग” शैलीची असेल. याच्या प्रमुख डिझाईन हायलाइट्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात गोल एलईडी हेडलॅम्प, हाय वींडस्क्रीन, मोठा फ्युएल टँक, एडीव्ही-स्टाइल साइड पॅनेल्स, स्टेप्ड सीट आणि लगेज रॅक मिळेल. हे सर्व फीचर्स तिला एक प्रिमियम टूरिंग मशीन बनवतात.

रॉयल एनफिल्डने 650 ट्विन इंजिनवर आधारित 750 सीसी हाय-कॅपेसिटी मोटर विकसित केली आहे. या नव्या इंजिनमध्ये लाईट वेट कंपोनन्ट, उत्तम थर्मल मॅनेजमेंट आणि कमी वायब्रेशनवर भर देण्यात आला आहे. या इंजिनमध्ये 50 बीएचपी पर्यंतची शक्ती, 65 एनएम टॉर्क असून, ट्रान्समिशनसाठी 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात येईल.

हिमालयन 750 ला पूर्णतः नव्या चेसिसवर तयार केले असून, हे 650 ट्विन्सच्या स्ट्रक्चरवर आधारित असेल. पुढील बाजूस लाँग-ट्रॅव्हल USD फोर्क्स, मागील बाजूस प्रीलोड-ऍडजस्टेबल मोनोशॉक्स, ब्रेकिंगसाठी फ्रंट ट्विन डिस्क आणि रिअर सिंगल डिस्क सेटअप मिळेल. हिमालयन 450 पेक्षा हे सस्पेंशन अधिक ट्युन करण्यायोग्य आणि ऑफ-रोड फ्रेंडली असेल.