Royal Enfield Himalayan 2021 भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि डिटेल्स
Published: February 17, 2021 11:24 AM | Updated: February 17, 2021 11:29 AM
भारतातील डिलर्सकडे Royal Enfield Himalayan उपलब्ध करण्यात आली आहे. ही बाइक ६ रंगात उपलब्ध करण्यात आली असून, रंगांच्या वैशिष्ट्यांनुसार याची किंमत ठरवण्यात आली आहे. रॉयल एनफिल्ड या आघाडीच्या बाइक निर्माता कंपनीने हिमालयन श्रेणीतील दमदार बाइक सन २०१६ मध्ये प्रथम लॉन्च केली होती. गेल्या ५ वर्षांत मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे आता अद्ययावत, अधिक सक्षम आणि आरामदायी सुविधांसह नवीन मॉडेल लॉन्च करण्यात आले आहे. (royal enfield himalayan launched in india)